मोदींना ७१ व्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, बघा हे १८ धमाल फोटो
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ७२ व्या वर्षात पदार्पण केलं. काल देशभर मोदीजींना भरभरून शुभेच्छा दिल्या गेल्या.
मोदीभक्तांनी शुभेच्छा देण्यासाठी आपली सगळी कल्पनाशक्ती पणाला लावली तर विरोधकांनी मात्र कालचा दिवस ‘बेरोजगारी दिन’, ‘महागाई दिन’ अशा वेगवेगळ्या बिरुदांनी साजरा केला. एकूणच काय तर कौतुक असो वा टिका, कालचा दिवस सोशल मिडीयावर ख-याअर्थाने मोदीमय झाला.
धडाकेबाज निर्णयांसाठी प्रसिद्ध असलेल्या मोदींची प्रत्येक स्टाइल हटके असते असं म्हणायला हरकत नाही. आपली प्रत्येक कृती, प्रत्येक निर्णय एव्हेंट म्हणून साजरा करण्याच्या त्यांच्या याच कौशल्यामुळे सात वर्षांपुर्वी आलेली मोदी लाट सध्या सरली असली तरी ओसरलेली नक्कीच नाही.
कधी त्यांनी नोटबंदीचा धक्का देत भारत दाणाणून सोडला तर कधी सर्जिकल स्ट्राईकची गुडन्यूज देत कौतुकाचा वर्षावही स्विकारला. कोरोनाच्या संकटात थाळीवादन, दिवे लावून संकटातून मार्ग काढण्याचा त्यांचा मंत्र काहींनी टिका करत तर काहींना अभिमानाने स्विकारला.
मोदीभक्तांकडून होणारे कौतुक असो वा टिकाकारांची जहाल निंदा, मोदींनी आपली स्टाइल कधीही सोडली नाही हेच खरं.
तर सात वर्षापासून देशाच्या पंतप्रधानपदाची सुत्र सांभाळणा-या या बहुरंगी व्यक्तीमत्वाला इनमराठीनेही हटके स्वरुपात शुभेच्छा दिला. एकंदरित त्यांच्या व्यक्तीमत्वाला साजेशा अशा गीतांच्या ओळीतून सुरेल शुभेच्छा देण्याचा हा एक अनोखा प्रयत्न….
१. मायलेकारांचं नातं
मोदी आणि त्यांच्या मातोश्री यांच्यातील प्रेम सगळ्या देशानी अनुभवलंय. त्यांच्या या नात्यासाठी या गीताच्या दोन ओळी चपखल बसतात.
२. प्रेरणादायी मोदी
कुणी निंदा अथवा वंदा…मोदींच्या व्यक्तीमत्वाची भुरळ सगळ्यांनाच आहे. सैनिकांच्या वेषात जेंव्हा मोदी सीमेवरील जवानांच्या भेटीसाठी जातात, तेंव्हा याच गीताचे सुर सर्वांच्याच मनात निनादतात.
३. प्रसिद्धीसाठी कायपण…
थांबा, गैरसमज करून घेऊ नका, ही टिका मुळीच नाही. मात्र प्रत्येक गोष्टीला एव्हेंट करून तो कॅमे-यात कैद करण्याची मोदींचीही ही सवय आहे हे मात्र नक्की.
४. जगभ्रमंती
जगभ्रमंती करण्याची आवड असलेले मोदी कधी लोकसभेत दिसतात, कधी जवानांसह सीमेवर तर कधी जंगलात…
५. मोदी जेंव्हा चिडतात…
प्रेमळ, हसरे मोदी जेंव्हा संतापतात, तेंव्हा याच गीताच्या ओठी गुणगुणाव्यासा वाटतात.
६. आम्ही मनाचे राजे
टिका करणा-यांची संख्या काही कमतरता नाही, मात्र त्या सगळ्यांनाच उत्तर देताना मोदी कदाचित हेच गाणंं म्हणत असतील.
७. भावा-बहिणीची जोडी
दिदी, ओ दिदी…. आठवली ना बंगाल निवडणूक? टिका, विनोद, वाद आणि बरंच काही…
८. चला, हवा येऊ द्या…
निवडणूक असो, रॅली वा फोटोसेशन, हव्वा फक्त मोदींचीच!
९. जगन्मित्र
देशातच नव्हे तर परदेशातही मोदींचे मित्र आहेत. हाऊडी मोदी म्हणून मोदींचं स्वागत झालं, तितक्याच थाटामाटात मोदींनी लाडक्या ट्रम्प यांचंही स्वागत केलं.
१०. धागा धागा विणूयात
कधी मोदी राजकारणात रमतात तर कधी एखाद्या छंदात…
११. दोन मित्र
राजकारणात मैत्रीची अनेक उदाहरणं सापडतात, मात्र ही जोडगोळी काही औरच!
१२. भावना अनावर होतात तेंव्हा…
मोदींच्या अनेक भावना आपण पाहिल्या आहेत, मात्र जेंव्हा मोदींच्या भावना अनावर होतात, तेंव्हा अनेक मोदीभक्तांच्या डोळ्यातही पाणी येतं.
१३. ट्रोल झालो पण…
या फोटोवर टिका झाली मात्र आजही लोकं आवडीने पाहतात आणि हे गाणंही गुणगुणतात.
१४. गल्ली ते दिल्ली…
आधी मित्र, मग विरोधी आणि कदाचित भावी सहकारी ?….
१५. सेलिब्रिटी विथ मोदी
राजकारणात रमणारे मोदी बॉलिवूड स्टार्ससहही धमाल करतात.
१६. आला रे आला राजा
कुणी काहीही म्हणा, या गीताच्या ओळी ओठी आल्या की मोदीच आठवतात.
१७. नाद करायचा नाय…
मोदींचा नाद करायचा नाही हेच खऱं.
१८. ग्रेट भेट
राजकाराणील कट्टर शत्रुंनी एकमेकांना मिठी का बरं मारली असावी?
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.