कोवॅक्सिन – कोविशिल्ड यापैकी कोणते वॅक्सिन देते जास्त काळ सुरक्षा?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
काय रे पहिला की दुसरा डोस? असा प्रश्न आजकाल लोक एकमेकांना विचारत असतात. आजकाल खुशाली विचारणारे कमी झाले असून लसीकरण झाले आहे की नाही हे विचारणारे लोक जास्त झाले आहेत. मागच्या वर्षी आलेल्या कोरोनामुळे साऱ्या जगाचे तीन तेरा वाजले.
जगभरातील सगळ्याच देशातील आरोग्य व्यवस्थेवर ताण पडला होता. जागतिक आरोग्य संघटना यावर अनेक दिवस चर्चा करत होती. चर्चेतून असे निष्पन्न झाले की संपूर्ण जगावर ओढवलेल्या या साथीच्या रोगावर उपाय म्हणजे लसीकरण!
प्रगत देशातील फार्मा कंपन्या लसी बनवायच्या कामाला लागल्या तर इकडे आपला देश जो विकसनशील देश म्हणून ओळखला जातो, त्या देशाने स्वदेशी लसी तयार करून साऱ्या जगाला हे दाखवून दिले. आपण अनेक देशांना लसी पुरवल्या त्याबदल्यात परराष्ट्रीय संबंध सुधारले.
लसीच्या बाबतीत सुरवातीला लोकांचा फारसा प्रतिसाद नव्हता, मात्र खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी लस घेतली, त्यानंतर लोकांचा हळूहळू विश्वास बसू लागला. त्याकाळात लसीबद्दल अनेक गैरसमज फिरत होते, तरीदेखील अनेकजणांनी लस घेण्यास सुरवात केली. बघता बघता करोडो लोक रोज लस घेऊ लागले.
आज देशात लसीकरणाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. मध्यंतरी सिरमच्या व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावाला यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, ‘कोविशिल्डचे दोन्हो डोस ज्यांनी घेतले आहेत अशा लोकांनी सहा महिन्यांनंतर पुन्हा केदा बुस्टर डोस घ्यावा. यावरून लसीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आणि लोक देखील संभ्रमांत पडले’.
- लसीकरणाच्या सर्टिफिकेटमध्ये घोळ झालाय? आता फिकर नॉट… अशी करता येणार दुरुस्ती..
- मोदी लसीकरणाबद्दल मौन का पाळून आहेत? वाचा या उत्तरात लपलेलं आंतरराष्ट्रीय षडयंत्र!
–
लसीच्या सुरक्षेवरून होणाऱ्या उलटसुलट चर्चाना आता पुन्हा एकदा एक नवे वळण लागण्याची शक्यता आहे. कारण आयसीएमरने जाहीर केलेल्या लसीच्या सुरक्षेचा अहवाल पुन्हा एकदा आपल्याला चिंतेत टाकतो. काय आहे तो अहवाल जाणून घेऊयात…
आयसीएमर नक्की काय म्हणालं आहे?
ICMR- RMRC ( regional medical research center) भुवनेश्वर, यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की, कोवॅक्सिन लस घेतलेल्या लोकांच्या शरीरातील अँटीबॉडीजची पातळी दोन महिन्यांनी कमी होणार तर ज्यांनी कोविशिल्ड लस घेतली आहे त्यांच्या शरीरातली अँटीबॉडीजचीपातळी तीन महिन्यांनंतर कमी होणार. हा निष्कर्ष त्यांनी एका सर्व्हे मधून केला..
सर्व्हेमधून काय निष्कर्ष निघाले?
आयसीएमरचे शास्त्रज्ञ देवदत्त भट्टाचार्य इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले, आम्ही अभ्यासासाठी एकूण ६१४ लोकांचे नमुने गोळा केले. यात ५०% लोक हे कोविशिल्ड लस घेतलेले होते तर बाकीचे कोवॅक्सिनवाले होते. ६१४ मधील ८१ अशा केसेस होत्या ज्यांना लसीकरणानंतर कोरोना संसर्ग झाला होता त्यांच्या शरीरात तो बुस्टर डोस म्हणून काम करत होता.
ज्यांना लसीकरणानंतर कोणताही संसर्ग झाला नाही असे उर्वरित ५३३ लोकांच्या शरीरातील अँटोबॉडीजमध्ये लक्षणीय प्रमाणात घट झाल्याचे सर्व्हेमधून आढळून आले.
डॉ. देवदत्त यांच्या मते, कोरोना लसीच्या पहिल्या डोस घेतलेल्या लोकांच्या शरीरातील अँटीबॉडीजचा अभ्यास करण्यासाठी हा सर्व्हे करण्यात आला होता. तसेच आयसीएमरच्या संचालिका संघमित्रा पाटी यांनी अँटीबॉडीज संदर्भात माहिती दिली की, ‘जरी शरीरातील अँटीबॉडीज कमी होत असतील तरी याचा पाठपुरावा आम्ही करत राहू. सहा महिने यावर आणखीन अभ्यास करून सांगू की बूस्टर डोसची गरज आहे किंवा नाही’
- कोव्हीशील्ड आणि कोवॅक्सीन लशींचे कॉकटेल अधिक प्रभावी आहे का? वाचा
- ‘हातात लशीचा कंटेनर पाठीवर मूल’, वाचा लढाई आधुनिक झाशीच्या राणीची!
–
आयसीएमआरचा बूस्टर डोस वरील अभ्यासावरचा निष्कर्ष काही दिवसात कळेलच त्यामुळे आपल्यापुढे बूस्टर डोसबद्दलच चित्र स्पष्ट होईल. आज सर्वच ठिकाणी लसीकरण हे बंधनकारक केले आहे. ज्यांचं लसीकरण झालं आहे अशा लोकांना बँकांपासून ते खाजगी कंपन्या विविध ऑफर्स देत आहेत. त्यामुळे भविष्यात ज्यांचं लसीकरण झालं आहे अशाच लोकांना संधी मिळणार का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.