Site icon InMarathi

चक्क एका ‘माकडाने’ तब्बल ९ वर्षं, रेल्वे सिग्नल ऑपरेटर म्हणून काम केलं होतं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

मनुष्य हा जगातील सगळ्यात हुशार प्राणी बनण्याआधी माकडांसारखाच होता. जंगलात राहणे, शिकार करून खाणे, गुहेत राहणे हे माणसाचं जीवन होतं. मनुष्य काळानुसार वर्तन बदलत गेलं तसंच त्याचं शरीरही बदलत गेलं.

काही सशोधकांच्या अभ्यासानुसार मनुष्य हा माकडांचाच वंशज आहे, त्यांचच पुढरलेलं रूप आहे, आणि त्यामुळे त्यांची बुद्धी सुद्धा सामान आहे असं आपल्याला कळून येतं.

अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यात माकड, हे मनुष्यासोबत मिळून मिसळून राहताना आढळतं. असच एक अनोखं उदाहरण आहे साऊथ आफ्रिकेतील एका रेल्वे स्टेशनवर काम करणाऱ्या सिग्नल गार्डचं.

 

 

गोष्ट १८०० मधील आहे. ज्या काळी रेल्वेत रूळ बदलण्यासाठी किंवा रेल्वेला दुसऱ्या रूट वर नेण्यासाठी लोकांना प्रत्यक्ष खाली उतरून रूट बदलावा लागत असे. त्याकाळी रेल्वेला सिग्नल दाखवण्यासाठीसुद्धा वेगवेगळ्या लिव्हर्सचा वापर केला जात असे.

साऊथ आफ्रिकेच्या केप टाऊन वरून पोर्ट एलीझाबेथला पोहोचण्यासाठी एक रेल्वे लाईन टाकण्यात आली होती. या प्रोजेक्टमध्ये, जेम्स वाईड नावाच्या एका व्यक्तीला एका स्टेशनचा गार्ड म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं.

जेम्स हा स्वभावाने फार डेयरिंगबाज होता. त्याला धावत्या रेल्वे गाडीत वेगवेगळ्या डब्यावर उड्या मारायला फार आवडत असे. त्याचा वेग, उडी मारण्याची जागा हे सगळं अगदी व्यवस्थित मोजलेलं असायचं. त्याचा अंदाज कधीच चुकायचा नाही आणि तो ठरवलेल्या जागी व्यवस्थित उडी मारू शकत होता.

त्यामुळे, जेम्सला आता लोक जम्पिंग गार्ड म्हणून ओळखू लागली होती. पण एकदा अशीच गंम्मत करता करता त्याचा अंदाज चुकला आणि त्याने उडी मारताच, दुसऱ्या डब्यावर जाण्याऐवजी तो सरळ खाली पडला आणि सरळ रुळावर पडून धावत्या रेल्वेचं चाक त्याच्या पायावरून गेलं. त्याच्या या अपघातामुळे त्याला त्याचे दोन्ही पाय कायमचे गमवावे लागले.

 

रेल्वेने त्याला काढून न टाकता स्टेशन गार्डची सोप्या प्रकारातील नोकरी दिली. त्याला आता रुळावर उतरून गाडीची दिशा बदलण्याचं काम दिलं नसून, गाडीला लिव्हरच्या मदतीनं त्यांना सिग्नल दाखवण्याचं काम दिलं.

हे काम करताना सुद्धा त्याला त्रास होतच होता. त्याने आपल्यासोयी साठी एक लोटगाडी सुद्धा बनवली पण ती लोटायलासुद्धा ताकद लागायची.

एकदा बाजारात फिरता फिरता त्याला जॅक नावाचं एक अत्यंत हुशार माकड दिसलं. जॅक आपल्या ताकदीने एक लोटगाडी लोटत होता. माकडाची ही हुशारी पाहून त्याने त्या माकडाला विकत घ्यायचं ठरवलं. त्याच्या मालका कडून त्याला मागून घेतलं.

त्या मालकाने एक गोष्ट सांगितली ती म्हणजे जॅकला रोज बियर पिण्याची सवय होती. त्याला ती मिळाली नाही तर तो चिडचिड करतो आणि आपली आज्ञा पाळत नाही. जेम्सनं हे नीट लक्षात ठेवलं आणि जॅकला आपल्यासोबत घेऊन आला.

जॅक आणि जेम्स आता एकत्र राहू लागले आणि जेम्स जॅकला हळू हळू आपली गाडी कशी लोटावी हे शिकवू लागला. गाडी लोटण्यासाठी ठेवलेला असिस्टंट हा जेम्सचं बरचसं काम सोपं करू लागला आणि हळू हळू त्याची इतर कामं सुद्धा पाहून पाहूनच शिकू लागला.

जेम्सचं काम असं होतं, की गाडी जर येत असेल तर त्याला स्टेशनवर शिट्ट्या वाजवून आधी सतर्क केलं जायचं की कोणता ट्रॅक बदलायचा आहे, आणि गाड्यांची पुढील स्थिती पाहून जेम्स ते लिव्हर हलवून गाडीला योग्य त्या रुळावर टाकायचा.

 

 

जॅक हे सगळं बघून बघूनच शिकला. किती शिट्ट्या वाजल्या म्हणजे कोणतं लिव्हर ओढायचं हे त्याला बरोब्बर कळलं. एकदा जेम्सच्या आधी जॅकने जाऊन ते काम करूनही टाकलं.

अजून एक ड्युटी जी जेम्स आपसूकच शिकला होता ती होती गाडीच्या शिट्ट्या ऐकू येताच ट्रेनच्या ड्रायवरला किल्ल्या नेऊन देण्याची ड्युटी. जॅक तेही पटकन शिकला. किल्ल्या कुठे असतात, त्या कशा कशा नेऊन द्यायच्या हेसुद्धा त्याला पाहून पाहूनच आलं.

जेम्स आणि जॅक ही जोडी एकदम चर्चेत आली. जेम्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंतसुद्धा ही बातमी पोहोचली कि आपल्या एका कर्मचाऱ्याने, असिस्टंन्ट म्हनुज चक्क एक माकड पाळलं आहे.

अधिकारी संतापले, कारण हा केवळ त्या प्राण्याचा प्रश्न नसून रेल्वेशी संबंधित असलेल्या सगळ्यांच्या सुरक्षेचा किंवा जीवाचा प्रश्न होता. त्यांनी त्वरित जॅकला दुसरीकडे हलवण्याचे आदेश दिले. पण जेम्सने त्यांना खूप गया वया केली, जॅकला आपल्या मदतीला राहू देण्याची विनंती केली.

जेव्हा अधिकारी ऐकेनासे झाले तेव्हा जेम्स ने जॅकची परीक्षा घेण्याचे त्यांना सुचवले. अधिकारी सुद्धा ह्यासाठी तयार झाले आणि जॅकला खरंच किती कामं येत आहे आणि तो खरंच कोणाच्या जीवाला धोक्यात न टाकता ते कामं करू धाकतो का याची चाचणी घेण्याचे ठरले.

ज्यावेळी गाडीची शिट्टी वाजली कोणाचीही वाट नं पाहता ते माकड धावत गेले आणि त्याने योग्य ते लिव्हर बदलून रूळ बदलला.

 

 

जॅकच्या या हुशारीवर त्याचे वरिष्ठ अधिकारीसुद्धा प्रसन्न आणि अचंबित झाले. त्यांनी जॅकला २० सेंट्स इतक्या रोजप्रमाणे रेल्वेची नोकरी दिली.

जॅक आणि जेम्स आपलं कामं पुन्हा एकत्रपणे करू लागले. जॅकने तब्बल ९ वर्ष रेल्वेत एकही चूक न करता नोकरी केली. ९ वर्षांनी त्याला क्षय रोगाने ग्रासले. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

त्यामुळे आता कधीही माकडांना नावं ठेवण्याआधी जॅकची गोष्ट स्मरणात येऊ द्या. कारण पृथ्वीवर फक्त मनुष्यच नाही तर अनेक हुशार प्राणी सुद्धा आहेत.

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version