Site icon InMarathi

मृत व्यक्तीच्या फेसबुक, ट्विटर आणि गुगल अकाऊंटचं नेमकं काय होतं, वाचा

facebook inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्याच्या युगात प्रत्येक जण सोशल मिडीयाचा वापर करतो.

प्रत्येकाचं फेसबुक, ट्विटर आणि अश्या अनेक प्रकारच्या सोशल मिडिया साईट्सवर अकाऊंट असतं. या माध्यमातून आपण इतर जगाशी जोडले जातो. जगाच्या अधिक जवळ येतो.

केवळ ऑर्कुट साऱख्या साईटवरून गप्पा मारताना फेसबुक, व्हाट्सअप यांसारखी माध्यम आली, आणि त्यांनी आपली पकड मजबुत केली.

सध्या तर इन्स्टाग्राम, टिकटॉक यांसारख्या माध्यमांनी तर सर्वांना वेड लावलं आहे.

आपल्याही कुटुंबातील सदस्, नातेवाईक, मित्र या सगळ्यांचीच अकाऊंट्स सोशळ मिडीयावर असतात.

त्यांच्याशी चॅटिंग करणं, फोटोची देवाणघेवाण करणं हा आपला आवडीचा टाइमपास असतो.

पण तुमच्या मनात कधी विचार आलाय का की, “एखादी व्यक्ती हे जग सोडून गेल्यावर त्याच्या सोशल मिडिया वरील अकाऊंटचं काय होत असेल?”

काहींना वाटतं त्याचे कुटुंबिय ते अकाऊंट डिलीट करत असतील, तर काहींना वाटतं, की अकाऊंट वापरात नसल्याने ते अकाऊंट आपोआप बंद होतं.

मात्र असं असलं, तरी याबाबत नक्की ठोस उत्तर कुणालाही माहित नाही.

अजूनही या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधत असाल तर तो शोध आज येथे संपला असं समजा.

चला तर जाणून घेऊया या मागचं उत्तर!

 

gossipkatta.in

 

व्यक्तीच्या मृत्यूनंतर सोशल मिडियावरील त्याच्या अकाऊंट्सचा अॅक्सेस कोणालाही मिळत नाही. याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. त्यात त्याचे सर्व हक्क त्याची पत्नी, मुलगा यांना मिळायला हवेत का?

की अॅटोमॅटीक त्याच्या कुटुंबीयाकडे त्याचे अधिकार जावेत असा प्रश्न उपस्थित होतो. या सर्व प्रश्नांचे निरसन फेसबूक, ट्विटर आणि गूगल यांच्या ‘आफ्टर डेथ पॉलिसीज़’ करतात.

सध्या जगभरात व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या अकाऊंट्सचे अधिकार अॅटोमॅटीक त्याच्या जवळच्या व्यक्तीकडे देण्यासंबंधीचा कायदा करण्याचा विचार सुरू आहे.

गुगलची पॉलिसी:

 

 

abcnews.go.com

 

जी मेल आणि गूगल प्लस या इमेलच्या सेवा देणाऱ्या संस्था ‘इनअॅक्टीव अकाऊंट मॅनेजर’ नावाचा एक टूल उपलब्ध करून देत आहे. त्याच्या माध्यमातून एकप्रकारे नॉमिनेशन भरून आपल्या मृत्यूनंतर अकाऊंटचे काय करावं याबाबतची माहिती देण्यात येईल.

या अॅपमध्ये तुम्ही ६ महिने किंवा एक वर्षाचा वेळ निश्चित केलात की मृत्यूनंतर आपोआप अकाऊंट डिलीट होईल.

तसंच जर का तुम्ही बँक अकाऊंटप्रमाणे तुमच्या मेलचं नॉमीनेशन केले तर मृत व्यक्तीच्या ई-मेलवर येणारे सर्व मेल तुम्हाला येतात. या सर्व्हिसमध्ये तुम्ही केवळ जी मेल किंवा गूगलच्या यूजर्ससाठी ही सेवा आहे.

या लिंकवर Google Inactive Account Manager जाऊन आपण आपल्या अकाऊंटची सेटींग करू शकता.

 

ट्विटरची पॉलिसी:

 

samapplegate.co.uk

 

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्याशी संबंधित एकाद्या व्यक्तीने ट्विटरकडे त्याच्या मृत्यूची माहिती दिली तर, ट्विटर त्या व्यक्तीचे अकाऊंट बंद करते.

त्यासाठी त्या व्यक्तीचा मृत्यू दाखला सादर करणे गरजेचे असते. कारण अनेक ट्विटर अकाऊंट हे स्वत:च्या नावाचे नसतात.

याशिवाय कंपनी मृत व्यक्तीशी संबंधित आणखी काही माहिती मागू शकते. ही माहिती दिल्यानंतर ट्विटर त्याचे अकाऊंट ३० दिवसात कायमचे बंद करते.

तसंच अकाऊंट बंद करण्याची विनंती करणाऱ्या व्यक्तीच्या मागणीनुसार मृत व्यक्तीचे फोटोही काढून टाकले जातात.

जर तुम्हालाही जवळच्या एखाद्या मृत व्यक्तिचे ट्विटर अकाऊंट बंद करायचे असेल तर या लिंकवर क्लिक करा.

फेसबुकची पॉलिसी:

 

फेसबुक ही जगातील सर्वात मोठी ऑनलाईन सोशल नेटवर्किंगची साईट असून ‘इनअॅक्टीव अकाऊंट मॅनेजर’ सारखी सेवा देत नाही.

यामध्ये आपल्या आवडीच्या व्यक्तीला केवळ मेमोराईस करण्याची विनंती करू शकता.

त्यामुळे व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या अकाऊंटमध्ये कोणीही लॉग ईन करू शकणार नाही. तसंच तुमच्या अकाऊंटमध्ये कोणीही फेरफार करू शकणार नाही.

आपली प्रिय वक्ती या जगातून निघून गेल्याचं दुःख मोठं असतं यात शंका नाही.

मात्र त्या वक्तीचे सोशल मिडीयावरील अकाऊंट, त्यावरील फोटो, व्हिडिओ हे सर्व काही सुरक्षित रहावं यासाठी प्रयत्न करणं आपली जबाबदारी आहे.

यासाठी इंटरनेटने सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत.

मात्र त्याचा वापर तुम्ही कशापद्धतीने करता हे महत्वाचं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version