Site icon InMarathi

हे १० ‘टॅलेंटेड खेळाडू’ भारतासाठी खेळले असते, तर रथी-महारथींच्या यादीत जरूर असते

padmakar shivalkar and amol muzumdar inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

भारत देश हा क्रिकेट खेळाडूंची खाण आहे याचा प्रत्यय आपल्याला नुकत्याच झालेल्या श्रीलंका आणि इंग्लंड दौऱ्यात आलाच आहे. एकाच वेळी आलेल्या दोन देशातील आमंत्रण स्वीकारून भारतीय क्रिकेट बोर्डने २ टीम तयार केल्या आणि वेगवेगळ्या देशात पाठवल्या, यावरून आपल्याकडील क्रिकेट टॅलेंटची कल्पना येते.

 

 

भारतीय क्रिकेट खेळाडूंना मैदानावरील आव्हानांपेक्षा ‘अंतिम ११ खेळाडूंमध्ये निवड होणे’ हेच मोठं आव्हान असतं. २९ राज्य, आयपीएल, रणजी ट्रॉफी, दुलीप करंडकसारख्या स्पर्धा यामुळे क्रिकेटची फॅक्टरी असल्याप्रमाणे आपल्याकडे नवीन खेळाडू सतत तयार होत असतात.

ज्या खेळाडूंना देशासाठी खेळायचा मान मिळतो त्यांना आपण ओळखतो आणि ज्यांना ही संधी काही कारणांमुळे मिळत नाही ते खेळाडू नेहमीच प्रसिद्धीपासून उपेक्षित राहतात ही वस्तुस्थिती आहे.

प्रचंड टॅलेंट असलेल्या, पण आपण टीव्हीवर, कोणत्या जाहिरातीत कधीच न बघितलेल्या १० क्रिकेट खेळाडूंची माहिती या लेखात जाणून घेऊयात:

१. अमोल मुझुमदार

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी जेव्हा शारदाश्रम शाळेसाठी ६६४ धावांची विक्रमी भागेदारी केली होती, तेव्हा त्या संघात अमोल मुझुमदार सुद्धा होते.

रणजी ट्रॉफीत या खेळाडूच्या नावावर ३० शतकं आहेत. ११,१६७ रन्स आणि ४८.१३ रन्स इतकी सरासरी असूनही अमोल मुझुमदार यांना कधीच भारतीय क्रिकेट टीममध्ये स्थान मिळालं नाही.

 

 

रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात या खेळाडूने २६० धावा केल्या होत्या. पण, तरीही त्या भारतीय क्रिकेट निवड समितीला त्यांना भारतीय क्रिकेट संघात स्थान देण्याची इच्छा झाली नाही, याची क्रिकेट चाहत्यांना कमाल वाटते.

२. श्रीधरन शरथ

५१.१७ च्या सरासरीने श्रीधरन शरथ याने तामिळनाडू खेळतांना १३९ सामन्यात ८७०० धावा केल्या आहेत. १०० सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा करणारा तो एकमेव खेळाडू आहे.

 

 

३. येरी गौद

कर्नाटकचा असलेल्या या खेळाडूने प्रथम श्रेणीतून फलंदाज म्हणून पदार्पण केलं आणि नंतर तो रेल्वेच्या टीममध्ये खेळत होता. कर्णधार म्हणून खेळतांना त्याने आपल्या संघाला ३ रणजी ट्रॉफी, ३ इराणी ट्रॉफी, १ दुलीप करंडक जिंकून दिले होते.

मानाची ‘रणजी कॅप’ ही येरी गौदला १०० वेळेस मिळाली होती. फलंदाज म्हणून त्याने ४५.५३ च्या सरासरीने ७६५० धावा केल्या होत्या, ज्यामध्ये १६ शतकांचा समावेश होता.

 

 

४. पद्माकर शिवलकर

पद्माकर अर्थात पॅडी शिवलकर हे नाव ऐकलं नाही, असा क्रिकेट चाहता सहसा सापडणार नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १९.६९ च्या सरासरीने ५८९ विकेट्स मिळवणारा हा डावखुरा स्पिनर कधीच भारतीय निवड समितीच्या पसंतीस मात्र पडला नाही.

रणजी ट्रॉफीमध्ये जेव्हा कठीण काळात कर्णधाराने त्यांच्यावर विश्वास टाकला, तेव्हा त्यांनी तो सार्थ ठरवला. धावगती मंद करणे, ठराविक अंतराने विकेट्स घेणे ही कला अवगत असलेला हा खेळाडू कधीच भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीपर्यंत पोहोचू शकला नाही.

 

 

५. राजिंदर गोयल

सुनील गावस्कर यांनी सर्वात चांगला डावखुरा स्पिनर गोलंदाज म्हणून कौतुक करूनही राजिंदर गोयलची क्रिकेट निवड समितीने कधीच दखल घेतली नाही. हरियाणाकडून रणजी सामन्यात खेळतांना त्याने १८.५८ च्या सरासरीने ७५० विकेट्स घेतल्या होत्या.

 

newsx.com

 

६. मिथुन मन्हास

प्रथम श्रेणीत १५७ सामने खेळत मिथुनने ९,७१४ धावा केल्या होत्या ज्यामध्ये २००७-२००८ च्या रणजी स्पर्धेतील ५९८ धावांचा समावेश आहे.

मिथुन हा ऑफ-ब्रेक गोलंदाज सुद्धा होता. ‘ऑल राउंडर’ म्हणून टीममध्ये सामावून घेतलेला हा खेळाडू विकेट किपर म्हणून सुद्धा योगदान द्यायचा. आयपीएलमध्ये मिथुनला चेन्नई सुपरकिंग्ज, दिल्ली आणि पुणे संघात स्थान मिळालं होतं.

 

 

७. देवेंद्र बुंदेला

१९९५-९६ पासून रणजी क्रिकेट खेळणाऱ्या देवेंद्र यांनी ९६५४ धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणीत सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम देवेंद्र बुंदेलाच्या नावावर आहे. पण, पांढरा टी शर्ट ते निळा टी शर्ट प्रवास सध्या वयाच्या चाळीशीत असलेल्या देवेंद्र यांना कधीच सर करता आला नाही.

 

 

८. आशिष झैदी

१८ वर्षांच्या प्रथम श्रेणी क्रिकेटच्या कारकिर्दीत आशिष झैदी यांनी ११० सामन्यात ३७८ विकेट्स घेतल्या आहेत. वेगवान गोलंदाज असूनही सलग १८ रणजी सिझन्स खेळणारा हा एकमेव गोलंदाज आहे. पण, जवागल श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद यांच्या काळातील या गोलंदाजाला कधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळता आला नाही.

 

 

९. अमरजीत कायपी

‘मोठ्या सामन्यांचा खेळाडू’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अमरजीत कायपीने रणजी ट्रॉफीत ७,८९४ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये २७ शतकांचा समावेश आहे. रणजी सामन्याच्या दोन्ही इनिंगमध्ये १५० धावा करण्याचा विक्रम अमरजीत कायपी याच्या नावावर आहे.

तरीही त्याला एकाही आंतरराष्ट्रीय सामन्यात क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. कमालीची आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे इंटरनेटवर अमरजित कायपी यांचे फारसे फोटो सुद्धा उपलब्ध नाहीत.

१०. रश्मी रंजन परिदा

प्रथम श्रेणीत या खेळाडूने १३९ सामने खेळले आहेत आणि ८३१७ धावा केल्या आहेत. राजस्थानकडून खेळतांना २०१०-११ च्या अंतिम सामन्यात ५६ आणि ८९ धावा करून राजस्थानला जिंकून दिला होता. २००१ मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाविरुद्ध भारत ‘अ’कडून फक्त एक सराव सामना खेळला होता.

 

 

चांगलं क्रिकेट खेळण्यात यशस्वी झालेल्या या खेळाडूंना भारतीय संघात सामील होण्याचं सौभाग्य का मिळालं नाही? हा प्रश्न मात्र नेहमीच अनुत्तरित असेल. हे त्या खेळाडूंचं दुर्दैवच म्हणावं लागेल.

यातले किती खेळाडू तुम्हाला माहित होते? असे आणखीही कुणी खेळाडू तुम्हाला ठाऊक आहेत का? याबद्दल कमेंटमधून नक्की कळवा. तुमच्या ओळखीतील क्रिकेट चाहत्यांपर्यंत ही माहिती सुद्धा नक्की पोचवा. काय, मग करताय ना लेख शेअर…!!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version