Site icon InMarathi

“या प्रश्नाचं उत्तर माझा ड्रायव्हर सुद्धा देईल” – आईन्स्टाईनच्या जीवनातील विनोदी प्रसंग…

einstein driver inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

सायन्स म्हटलं, की न्यूटन, गॅलिलिओ, हॉकिंग, डार्विन अशी नावं अगदी हमखास आठवतात. याच यादीमधील आणखी एक महत्त्वाचं नाव म्हणजे सर अल्बर्ट आईन्स्टाईन!

E = mc^2 हे जगप्रसिद्ध समीकरण असो, किंवा रिलेटिव्हिटी अल्बर्ट आईन्स्टाईन नसता तर हे सत्यात उतरलं असतं का असा प्रश्न आजही कुणीही उपस्थित करत असेल. या प्रश्नाला कितपत अर्थ आहे, हा भाग वेगळा पण यातून आईन्स्टाईनची म्हणता नक्कीच सिद्ध होते.

 

 

याच आईन्स्टाईनच्या आयुष्यात एक अगदीच गमतीशीर किस्सा घडल्याचं म्हटलं जातं. तोच आज जाणून घेऊयात.

आईन्स्टाईनची रिलेटिव्हिटी थियरी समजून घेताना आजही अनेकांची फॅफॅ उडत असेल. हिच थियरी जेव्हा नवी होती, त्यावेळी ती समजून घेणं किती कठीण जात असेल, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, नाही का?

रिलेटिव्हिटी थियरीबद्दल लेक्चर देण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेहमीच बोलावणे येत असे. अगदी आनंदाने ते अशी लेक्चर देण्यासाठी जात असत. आता आईन्स्टाईनसारखा मोठा माणूस, तो कुठेही जाताना असाच थोडी जाणार! त्यांना सगळीकडे घेऊन जाण्यासाठी त्यांचा ड्रायव्हर त्यांच्या सोबत असे.

 

हा ड्रायव्हर अनेकदा प्रेक्षकांच्यात बसून आईन्स्टाईनचं लेक्चर ऐकत असे. नेहमी नवनवीन लोकांसमोर लेक्चर देणार म्हटल्यावर, आईन्स्टाईनने एक मसुदाच तयार केला होता म्हणा ना… त्यामुळे त्याचा ड्रायव्हर मात्र सतत तेच तेच लेक्चर ऐकत असायचा, हे वेगळं सांगायला हवं का?

भाषण पाठ झालंय…

आईन्स्टाईनचं लेक्चर सतत ऐकून ऐकून त्याला अगदी तोंडपाठ झालं आहे, असा दावा ड्रायव्हरने केला. एवढंच नाही, तर पुढच्यावेळी हे लेक्चर जसंच्या तसं मीही देऊ शकतो असंही त्याने मोठ्या तोऱ्यात सांगितलं.

हे ऐकल्यावर आईन्स्टाईनने सुद्धा ड्रायव्हरची फिरकी घ्यायचं ठरवलं. आईन्स्टाईनने त्याची मागणी मान्य केली आणि स्वतः प्रेक्षकांमध्ये बसायचं ठरवलं.

 

 

हे असं कसं होऊ शकतं असं तुम्ही विचाराल ना? तर हे शक्य झालं होतं कारण, आईन्स्टाईनला फारसं कुणी पाहिलेलं नव्हतं. त्यावेळी फार प्रगत नसलेलं तंत्रज्ञान हे याचं कारण आहे, हे तर अगदीच स्पष्ट आहे. याचाच फायदा घेऊन आईन्स्टाईन आणि त्याच्या ड्रायव्हरने जागा बदलल्या आणि स्टेजवर ड्रायव्हर अवतरला.

पाठांतर उत्तम होतं पण…

सतत लेक्चर ऐकलं असल्यामुळे ड्रायव्हरला ते तोंडपाठ होतंच. त्याने अगदी न चुकता खडा न् खडा भाषण केलं. लोकांनी ते आवडीने ऐकलं सुद्धा… पण त्यांनतर भलतंच काहीतरी घडलं, ज्याची ड्रायव्हरला कल्पना नव्हती.

लेक्चर संपलं आणि प्रेक्षकांमधून एकाने थेट प्रश्नच विचारला की राव… भाषण तर पाठ होतं, पण प्रश्नाचं उत्तर देणार कसं…

 

 

यावर त्याने उत्तम शक्कल लढवली, हे मात्र खरं… त्याने थोडासा पॉझ घेतला आणि एकदम कडक उत्तर दिलं; “अरे हा तर अगदी सोप्पा प्रश्न आहे… याचं उत्तर तर माझा ड्रायव्हर सुद्धा देईल.” असं म्हणत ड्रायव्हरने प्रेक्षकांमध्ये बसलेल्या आईन्स्टाईनकडे बोट दाखवलं.

आईन्स्टाईनसाठी तर हा अगदीच डाव्या हाताचा खेळ होता, त्याने पटकन प्रश्नकर्त्याचं शंकानिरसन केलं आणि विषय संपवला.

हा किस्सा खरंच घडला होता का, घडला असेल तर आईन्स्टाईनच्याच आयुष्यात घडला होता का, याबद्दल अनेक मतमतांतरं आहेत. अर्थात, हे खरंच घडलं असो किंवा नसो, यातून बोध घेणं नक्कीच शक्य आहे.

ज्याचं काम त्यानेच करावं, आणि अर्धवट ज्ञानाच्या जोरावर कुठेही पुढे पुढे करायला जाऊ नये. हा बोध यातून तुम्ही सुद्धा घेतला असेल. मग मंडळी, हा मजेशीर किस्सा तुम्ही तुमच्या मित्रमंडळींमध्येही शेअर करणार ना?

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version