नॅशनल हेराल्ड प्रकरण समजून घ्या – १० पॉईंट्स मध्ये!
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
काँग्रेस पक्षाचा गाजलेला घोटाळा म्हणजे नॅशनल हेराल्ड प्रकरण. भाजपचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी २०१६ च्या जूनमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि त्यांच्या कंपन्यातील अन्य अधिकाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल केला. त्यांचा आरोप असा होता की गांधी कुटुंब हेराल्डच्या संपत्तीचा गैरवापर करत आहे.
हा खटला अजूनही न्यायालयात प्रलंबित असला तरी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे भवितव्य या खटल्याच्या निकालावर अवलंबून आहे.
नॅशनल हेराल्ड हे प्रकरण नेमके काय आहे हे जाणून घेण्याच्या आधी काही महत्वाच्या गोष्टी समजावून घेऊयात.
काँग्रेस हा पक्ष गांधी परिवाराच्या मालकीचा नाही. सोनिया गांधी अध्यक्षा आहेत, मालकीण नाही. म्हणजेच काँग्रेस पक्षाची मालमत्ता ही गांधी परिवाराची नाही.
त्या मालमत्तेतून आलेलं उत्पन्न मग ते भाडेतत्वावर आलेलं असेल अथवा विक्रीतून, त्यावर काँग्रेस पक्षाचा अधिकार असेल, काँगेस अध्यक्षांचा नव्हे.
१) Associate Journal Limited (AJL) ही कंपनी नॅशनल हेराल्ड नावाच्या दैनिकाची मालक आहे.
२) दैनिकाला दैनंदिन कामासाठी काँग्रेस पक्षाने ९० कोटींचे कर्ज दिले होते.
३) दैनिक चालत नसल्या कारणाने AJL म्हणजेच नॅशनल हेराल्डला हे कर्ज चुकवता आले नाही.
4) म्हणजे एक दैनिक ज्याला काँग्रेस सरकार मध्ये असताना देशातील अतिशय उच्चभ्रू आणि महागड्या जागांवर ऑफिस जागा देण्यात आली. जसं की मुंबई, दिल्ली अशा ठिकाणी ज्या जागांचे भाडे तर दैनिकाला म्हणजे AJL मिळतेच, ह्या शिवाय ह्या जागांचे एकूण मूल्य 2000 कोटीच्या घरात असू शकते.
5) जर तुमच्यावर 90 कोटींचं कर्ज आहे, पण तुमच्याकडे 2000 कोटींची मालमत्ता आहे, अश्या परिस्थितीत तुम्ही काय केलं असतं? सोपे आहे, थोडीशी मालमत्ता विकली असती आणि कर्ज परतफेड केली असती.
6) सोनिया गांधी, राहुल गांधी आणि त्यांच्याशी प्रामाणिक असलेल्या गटाने यंग इंडिया नावाची एक कंपनी स्थापन केली आणि ते त्याचे मालक झाले.
7) काँग्रेस ज्याला आपले 90 कोटी हवे होते, त्याला ह्या यंग इंडिया कंपनी ने 50 लाख दिले आणि त्याबदल्यात AJL (नॅशनल हेराल्डचे मालक) हिचा 100% ताबा मिळवला.
8) यंग इंडिया कंपनी जी कुठलाही व्यवसाय करीत नाही, जी बनवताना फक्त 5 लाखच भांडवल होतं. ती कंपनी आता 50 लाखाच्या मोबदल्यात 2000 कोटींची मालक झाली असून आणि त्यातून येणाऱ्या भाडेउत्पन्न तिलाच मिळणार आहे.
9) नुकसान झालं ते AJL च्या आधीच्या शरेहोल्डर्सच आणि काँग्रेस पक्षाचं ज्याला आपल्या 90 कोटी मधल्या फक्त 50 लाखात समाधान मानावे लागेल.
10) फायदा झाला, मग भलेही तो कागदावरच असेल तो झाला यंग इंडियाच्या मालकांना!
50 लाखात 2000 कोटी – वॉरेन बुफ्फेट्ट ला जमली नाही अशा परताव्याची गुंतवणूक यंग इंडिया च्या सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल वोरा आणि ऑस्कर फर्नांडिस ह्यांनी केलीये.
ही केस सध्या कोर्टात आहे. पाहुयात पुढे काय होतंय ते!
आणि हो – जो पर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत गांधी परिवार innocent आहे हे विसरून चालणार नाही.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.