जगातलं एकमेव असं मंदिर जिथे सोंड नसलेल्या बाप्पाची मूर्ती आहे!!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
गणपती बाप्पाचे नाव घेतले की आपल्या डोळ्यांपुढे बाप्पाचे गोजिरवाणे साजिरे रूप उभे राहते. एकदंत लंबोदर पाश आणि परशु धारण केलेला सिंहासनावर विराजमान असा बाप्पा आपल्याला डोळ्यांपुढे दिसतो.
श्रीगणेशाची विविध रूपे आपण चित्रांमधून ,शिल्पांमधून बघतो. गोंडस, गोजिरवाणे, निरागस असे बालगणेश रूप, रुबाबदार आणि भक्तांना तारणारा अष्टभुजा असलेला विघ्नहर्ता गजानन, असुरांचा विनाश करणारा रौद्ररूपातील श्रीगणेश, उजव्या सोंडेचा गणपती, डाव्या सोंडेचा गणपती, गंडस्थल मदमस्तक रूपातील गणपतीबाप्पा अशी बाप्पाची अनेक रूपे आहेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
बाप्पा कुठल्याही रूपात असला तरीही भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटेल आणि मनात फक्त शुद्ध भक्तीची भावना जागृत होईल असे बाप्पाचे रूप असते.गणपतीबाप्पाचे एक वेगळे रूप मात्र तामिळनाडूमध्ये बघायला मिळते.
इतर सगळीकडेच आपल्याला उजव्या किंवा डाव्या सोंडेचा गणपतीबाप्पा दिसतो मात्र तामिळनाडू राज्यात कुथनूर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर तीलतर्पणपुरी या गावातील देवळात गणपतीबाप्पाचे नररूप बघायला मिळते. हे मंदिर अष्टविनायक मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. या देवळातील बाप्पाला सोंड नसून मानवी शीर आहे.
या देवळाला आदि विनायक मंदिर असेही म्हटले जाते. या देवळातील श्रीगणेशाची मूर्ती ही पारंपरिक स्वरूपातील नसून त्या मूर्तीला मानवी चेहेरा असल्यामुळे इथल्या श्रीगणेशाला नर-मुख विनायक असे म्हणतात. आपल्याकडील श्रीगणेशाच्या रूपात आणि दक्षिणेतील देवळांतील श्रीगणेशाच्या रूपात थोडा फरक आहे.
तिकडे श्रीगणेशाचे रूप हे त्याच्या भावाच्या म्हणजेच मुरुगन किंवा कार्तिकस्वामीच्या रूपाशी मिळतेजुळते साकारले जाते. जगात गणपतीबाप्पाचे असे रूप फक्त ह्याच देवळात बघायला मिळते. नर-मुख विनायकाचे हे जगातील एकमेव देऊळ आहे.
–
- पुण्यातले ५ मानाचे गणपती! त्यांचा हा शेकडो वर्षं जुना इतिहास माहित असायलाच हवा!
- उजव्या आणि डाव्या सोंडेच्या गणेशाच्या मूर्तींमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या!
–
विशेष म्हणजे या देवळात पितरांना शांती मिळावी म्हणून पूजा केली जाते. हे स्थान पितरांना उत्तम गती मिळावी, शांती मिळावी म्हणून पूजेसाठी प्रसिद्ध आहे. म्हणूनच ह्या स्थानाला तीलतर्पण असे नाव आहे.
तीलतर्पण म्हणजे पूर्वजांना समर्पित असे होय. यामागे देखील एक आख्यायिका सांगितली जाते. असे म्हणतात की, श्रीरामाने ह्याच ठिकाणी पितरांना शांती मिळावी म्हणून पूजा केली होती.
श्रीराम वनवासात असताना राजा दशरथाचा पुत्रवियोगाने मृत्यू झाला. त्यानंतर प्रभू श्रीराम पिता दशरथ यांचे श्राद्ध व पिंडदान करण्यासाठी म्हणून एके ठिकाणी गेले. परंतु पिंडदान केल्यानंतर त्या पिंडाच्या जागी त्यांना किडे दिसू लागले. श्रीरामांनी परत पिंडदान केले. परंतु पुन्हा तिथे किडेच दिसू लागले. असे अनेकदा घडल्यानंतर श्रीरामांनी भगवान महादेवाची आराधना केली.
श्रीरामांनी प्रार्थना केल्यानंतर भगवान शंकर तिथे प्रकट झाले आणि त्यांनी श्रीरामांना सांगितले की मंथरावन येथे जाऊन श्राद्ध करावे म्हणजे पित्याला योग्य गती प्राप्त होईल. भगवान शंकराने सांगितल्यानुसार श्रीराम तात्काळ मंथरावनात गेले व तिथे पिंडदान केले.
आश्चर्य म्हणजे ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामांनी पिंडदान केले होते तिथे त्या चार पिंडांच्या जागी स्वयंभू चार शिवलिंगे प्रकट झाली. आजही त्या शिवलिंगांचे दर्शन घेता येते. हा भाग तिलतर्पणपुरी मधील थेथे मुक्तेश्वर म्हणून ओळखला जातो.
अनेक लोक याच श्रद्धेने पितरांना मुक्ती मिळावी म्हणून तिलतर्पणपुरीला जाऊन श्राद्ध करतात. याच ठिकाणी शीरभंग होण्यापूर्वीचा असा आद्य गणेश किंवा आदि गणेश नर-मुख रूपात विराजमान आहे.या बाप्पाचे मुख त्याचे ज्येष्ठ बंधू कार्तिकस्वामींशी मिळतेजुळते आहे. या रूपातील बाप्पा उजवा पाय खाली सोडून ध्यानस्त बसलेला आहे. श्रीगणेशाला हत्तीचे शीर कसे मिळाले ही कथा तर आपल्याला ठाऊक आहेच.
भगवान शंकराने श्रीगणेशाचे त्रिशुळाने शीर धडावेगळे केले व नंतर त्याला हत्तीचे शीर लावण्यात आले. या देवळातील श्रीगणेशाचे रूप हे त्या घटनेच्या आधीचे म्हणजेच मानवरुपातील आहे म्हणूनच येथे गणपती बाप्पाला सोंड नसून नर-मुख आहे. या श्रीगणेशाचे पूजन अगस्ती ऋषी दर संकष्टी चतुर्थीला करत असत असे म्हणतात.
गणपतीबाप्पाची अशी विविध रूपे जगभरात बघायला मिळतात. अगदी जपानपासून ते अफगाणिस्तानमध्ये देखील श्रीगणेशाची प्राचीन मंदिरे आहेत. हजारो वर्षांपासून तिथे श्रीगणेशाचे पूजन केले जाते. असे जगात अनेक ठिकाणी गणपतीबाप्पा विविध रूपात भक्तांना दर्शन देतो.
स्त्रीपुरुष एकत्र रूपातील गणपतीबाप्पा जपानमध्ये कांगितेन या नावाने पुजला जातो तर थायलंडमध्ये गणपतीबाप्पाला फिकानेत म्हणतात. अगदी इराण, म्यानमार, श्रीलंका, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, चीन, मंगोलिया, ब्रुनेई, बल्गेरिया ते पार मेक्सिको आणि लॅटिन अमेरिकन देशांत सुद्धा श्रीगणेशाच्या प्राचीन मूर्ती सापडल्या आहेत.
इंडोनेशिया मुस्लिम देश असून देखील त्यांच्या नोटांवर गणपतीबाप्पाचे चित्र आहे. असे म्हणतात की इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून इंडोनेशियामध्ये हिंदू धर्माचा प्रभाव होता.आपण जसे बुद्धीची देवता म्हणून तसेच १४ विद्या व ६४ कलांचा अधिपती म्हणून गणपतीबाप्पाची पूजा करतो तसेच इंडोनेशियात सुद्धा श्रीगणेशाला ज्ञानाचे प्रतीक मानले जाते.
जपानमध्ये द्विमुखी श्रीगणेशाची कांगितेन म्हणून पूजा केली जाते. काही ठिकाणी चतुर्भुज गणेशाचे वर्णन देखील बघायला मिळते. श्रीलंकेत भगवान पिल्लयार म्हणून गणपतीबाप्पाचे पूजन केले जाते. या ठिकाणी गणपतीबाप्पाची मूर्ती काळ्या पाषाणाची असते. कोलंबोजवळ केल्याना गंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या केल्यानामध्ये अनेक प्रसिद्ध बौद्ध मंदिरात श्रीगणेशाच्या मूर्ती बघायला मिळतात.
–
- गणपती बाप्पाच्या नामस्मरणात ‘मोरया’ हा शब्द नेमका आला कुठून? वाचा
- शंकराने गणपतीचे उडवलेले शीर आजही भारताच्या या गुहेत पहायला मिळते
–
आपण जसे गणपतीबाप्पाला विघ्नहर्ता म्हणून पुजतो तसेच थायलंडमध्ये गणपतीबापाला ‘फ्ररा फिकानेत’ म्हणून पूजतात. आपण जसे “निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा” म्हणत गणपतीबाप्पाची प्रार्थना करतो तशीच प्रार्थना थायलंड मध्ये देखील केली जाते.
श्रीगणेश सगळ्या बाधांचे हरण करून सर्व कार्यात यश देतो अशी त्यांचीही धारणा आहे. म्हणूनच आपल्याप्रमाणेच ते देखील नवा व्यवसाय सुरु करताना किंवा लग्न किंवा मंगल प्रसंगी प्रामुख्याने गणपतीची पूजा करतात आणि गणेशोत्सव व श्रीगणेश जन्म देखील इथले काही लोक साजरा करतात.
तर असा हा गणपतीबाप्पा सर्वांनाच चांगली बुद्धी देवो, सगळ्यांचे संकटांतून रक्षण करो आणि सगळ्यांना चांगल्या कार्यात यश देवो अशी या गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया.
रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्ष त्रैलोक्यरक्षकं|
भक्तानामभयं कर्ता त्राता भव भवार्णवात् ||
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.