Site icon InMarathi

आर.डींच वादग्रस्त ठरलेलं गाणं आज चक्क आयफोन१३ च्या प्रोमोमध्ये वापरलं आहे

r d inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

‘परदेशी गाण्यांची चाल चोरून त्यावर हिंदी गाणी बनवायची’ हा ठपका सर्वात जास्त कोणावर बसला असेल तर तो म्हणजे अनु मलिक. ऑलिम्पिकमध्ये इस्रायलच राष्ट्रगीत लागलं आणि इकडे आपले भारतीय ‘त्या’ राष्ट्रगीताच्या चालीवरच गाणं शोधायला लागले आणि ते गाणं अजय देवगण चित्रपटातले निघाले.

 

 

आज परदेशी गाण्यांची चाली चोरणं काही नवीन नाही. ही परंपरा आर. डी बर्मन यांनी सुरु केली ती आजही प्रीतमसारखे संगीतकार पुढे नेत आहेत. परदेशी गाण्यांची चाली चोरण्याचा पायंडा पाडणाऱ्या पंचमदांच्या एका गाण्याचा वापर चक्क आयफोनने आपल्या प्रोमोमध्ये वापरला आहे… काय आहे नेमकी भानगड चला तर मग जाऊन घेऊयात…

 

 

 

आयफोनच्या १३ व्या सीरिजचा लाँच सोहळा अमेरिकेत काल पार पडला. अँपलचा नव्या फोनचा लाँच सोहळा म्हणजे एक खास कार्यक्रम असतो. जगभरातून आयफोन प्रेमी हा सोहळा न चुकता बघत असतात. अमेरिकेत हा सोहळा सुरु असताना भारतात मात्र मध्यरात्र सुरु होती तरीदेखील कट्टर आयफोन प्रेमी हा सोहळा बघत होते.

जेव्हा या सोहळ्याचा प्रोमो लाँच झाला तेव्हा एक पार्श्व संगीत वाजवले, संगीत प्रेमींनी लगेचच हे संगीत ओळखले. ते संगीत दुसरे तिसरे कोणते नसून ते दम मारो दम या पंचमदांच्या आणि आशा ताईंच्या आवाजतले हे गाणे त्यांनी चोरले. भारतीयांनी लगेच आपापल्या सोशल अकॉऊंट्स वरून यावर प्रतिक्रिया द्यायला सुरवात केली.

 

 

दशकं जशी बदलत गेली तशी बॉलीवूडमधलं संगीत देखील बदलत गेलं. सुरवातीला सिनेमांमधील संगीत हे शांत होतं कालांतराने ते थोडं भडक आणि जलद होतं गेलं. काळाप्रमाणे संगीतकार बदलेले, प्रत्येकाने आपापल्या शैलीत संगीत तयार केलं. पंचमदांनी तर संगीतात अनेक प्रयोग केले. कधी मनाचं ठाव घेणारे संगीत तर कधी ताल धरायला लावणारं संगीत. वेगवेगळी वाद्य वाजवण्यात देखील ते तरबेज होते.

 

 

सत्तर ऐंशीच्या काळात तर हे गाणं वादग्रस्त ठरलं होतं. दम मारो दम या गाण्याची नशा अनेक शतकं बदलली तरी कमी झाली नाही. २०११ साली आलेल्या दम मारो दम या सिनेमात एका नव्या पद्धतीत हे गाणे आपल्या समोर आले. आणि आज पुन्हा एकदा १० वर्षांनी महाकाय आयफोन कंपनीने या गाण्याची धून चोरली आहे. २०१८ साली जेव्हा आयफोन एक्स लाँच करण्यात आला होता तेव्हा पंचमदांच्या द बर्निंग ट्रेन या सिनेमातील धून एका प्रोमोमध्ये वापरली होती.

 

 

धून का चोरली असावी?

आयफोन आणि तिचा जन्मदाता स्टीव्ह जॉब हा कायमच ग्राहकांना उत्तोमोत्तम देण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्याच्यानंतर दर्जा राहिला असला तरी वैविध्य असे राहिलेले नाही असे आयफोन वापरणाऱ्यांचे मत आहे. आयफोन वापरणारे आज जगभरात करोडो लोक आहेत तरीदेखील त्यातल्या त्यात भारतात आयफोनची क्रेझ जास्त आहे.

 

cnet.com

 

भारत हा देश उपकरणे, मोबाईल आदी वस्तूंसाठी मोठी मार्केट असल्याने भारतीयांच्या मानसकितेनुसार जर आपले प्रॉडक्ट विकले तर हमखास यश मिळणार अशीच युक्ती मोठमोठाले ब्रॅण्ड्स वापरतात आणि यशस्वी होतात. कदाचित हाच विचार आयफोनवाल्यांनी केला असू शकतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version