Site icon InMarathi

हिमालयाची उंची सतत का वाढते? हजार वर्षानंतर त्याची उंची असेल एवढी…

mount everest featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

जगातील सर्व देशांमध्ये असलेली भौतिक संपत्तीची स्पर्धा आपण सगळेच जाणतो. पण त्यासोबतच ‘सर्वात उंच पर्वत कोणत्या देशात आहे?’ ही एक भौगोलिक स्पर्धा सुद्धा भारत, चीन, नेपाळ या देशांमध्ये नेहमीच सुरू असते. निसर्गप्रेमींना याबद्दल माहीत असेलच.

हिमालयाचा भाग असलेल्या ‘माउंट एव्हरेस्ट’ने या स्पर्धेत जगातील इतर सर्व पर्वतांना मागे टाकलं आहे. समुद्र सपाटी पासून पर्वताची उंची कशी मोजली जाते? एव्हरेस्ट पर्वताची उंची ही वाढती कशी? असे प्रश्न सामान्य माणसांना नेहमीच पडत असतात.

 

 

नुकत्याच जाहीर झालेल्या एका अहवालात एव्हरेस्टची उंची वाढण्याचं कारण, पर्वताची उंची मोजण्याची पद्धत यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. काय आहे हे ही पद्धत? एक नवीन माहिती म्हणून जाणून घेऊयात.

नवी उंची…

चीन आणि नेपाळ या देशांनी जो अहवाल सादर केला त्यात असं सांगण्यात आलं आहे, की एव्हरेस्ट पर्वताची उंची ही आता समुद्रसपाटीपासून ८,८४८.८६ मीटर्स म्हणजेच २९,०३१.६९ फुट इतकी आहे हे प्रमाणित करण्यात आलं आहे.

एव्हरेस्ट पर्वताची उंची समोर आल्यानंतर ‘त्याची मोजणी कशी झाली?’ हा प्रश्न अर्थातच तज्ज्ञांनी विचारला होता. ही पद्धत जेव्हा सांगण्यात आली, तेव्हा हे खरंच सोपं काम नाहीये हे जगासमोर आलं आहे.

 

 

पर्वताच्या परिसरातील भूगर्भातील हालचालींमुळे पर्वताची उंची वाढते किंवा कमी होते हे सिद्ध झालं आहे. ‘टेक्टॉनिक प्लेट्स’ची संख्या वाढली, की पर्वताची उंची वाढते आणि भूकंपाचे सौम्य जरी झटके जाणवले तरी पर्वताची उंची कमी होते हे या अहवालात सांगण्यात आलं आहे.

कोणत्याही भौगोलिक अडचणींचा प्रतिकार करण्याची जशी शक्ती माणसांमध्ये असते, तशीच ती पर्वतांमध्ये सुद्धा असते हेसुद्धा या अभ्यासातून समोर आलं आहे. ‘काउंटर वेलींग फोर्स’ हा ज्या पर्वताची उंची समान राहते त्यासाठी कारणीभूत असतो.

निसर्गाकडून पर्वतांना नेहमीच आव्हानांना सामोरं जावं लागत असतं. चीनच्या एका पर्वत अभ्यासकाने हे सांगितलं आहे, की १९३४ मध्ये चीनमध्ये एक भूकंप झाला होता ज्यामुळे १५० वर्ष समान उंची राखणाऱ्या काही पर्वतांची उंची कमी झाली होती.

अनेक वर्ष हे पर्वत सतत आपली उंची वाढवत होते. पण, या एका भूकंपानंतर पर्वतांची बदललेली उंची हा प्रत्येक गोष्टीत पहिला क्रमांक असण्याची इच्छा असणाऱ्या चीनमध्ये हा चिंतेचा विषय झाला होता.

 

 

पर्वताची उंची मोजण्याची आधुनिक पद्धत:

नेपाळच्या एका संस्थेने २०१९ मध्ये एव्हरेस्ट पर्वतावर एक ‘सॅटेलाईट नॅव्हीगेशन मार्कर’ बसवला आहे. माणसाचं लोकेशन सहज सांगणाऱ्या GPS मुळे पर्वताची सुद्धा तंतोतंत माहिती समोर येऊ शकते हे या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या लक्षात आलं आहे.

नेपाळच्या या संस्थेने ‘थेऑडोलाईट्स’ नावाच्या लेझर तंत्रज्ञानाने पर्वतांच्या उंची मोजण्याचं काम केलं आहे असं सांगण्यात आलं आहे. नेपाळच्या संस्थेने याआधी १८५६ मध्ये हा प्रयत्न केला होता. तंत्रज्ञान आजच्याइतकं प्रगत नसल्याने त्या काळात पर्वतांच्या कडा आणि त्यांचे कोन यांच्याद्वारे उंची सादर करण्यात आली होती.

नेपाळच्या या पर्वत मोजणीच्या पद्धतीत पर्वतावरचा सर्वात उंच कडा आणि त्यावर साचलेला बर्फ ही सुद्धा माहिती लक्षात घेण्यात आली होती.

 

 

पर्वताची उंची मोजतांना समुद्रसपाटीची भरती, ओहोटीमुळे सतत बदलणारी पातळी ही सुद्धा आव्हानं असतात. समुद्राची सतत वाढत जाणारी उंची हे सुद्धा योग्य आकडा समोर येण्यात अडचणी निर्माण करत असतात.

हिमालय पर्वताव्यतिरिक्त एक्यूडोर येथील चिम्बरझो हा पर्वत भूगर्भापासून सर्वात उंच आहे असं सुद्धा अभ्यासकांनी सांगितलं आहे. हा पर्वत पृथ्वीच्या मध्यवर्ती भागात आहे. या भागातील जमीन खचलेली असल्याने ही उंची एव्हरेस्ट पर्वतापेक्षा २०७२ फुटांपेक्षा अधिक आहे ही माहिती समोर आली आहे.

 

 

हवाई येथील ‘मौना की’ हा पर्वत जमीनीपासून शिखरापर्यंत उंची मोजल्यास सर्वात उंच म्हणून गणला जातो. फक्त, फरक इतकाच आहे की, या पर्वताच्या पूर्ण उंचीच्या निम्म्याहून अधिक भाग हा समुद्रखाली आहे.

एक भौगोलिक स्पर्धा म्हणूनच नाही तर भारताची शान असलेल्या हिमालय पर्वताची उंची नेहमीच वाढत राहो अशी आशा करूयात.

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version