' समुद्रावर राज्य करणारी तरंगती स्वप्ननगरी : ‘हार्मनी ऑफ द सीज’! – InMarathi

समुद्रावर राज्य करणारी तरंगती स्वप्ननगरी : ‘हार्मनी ऑफ द सीज’!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

टायटॅनिक चित्रपट तुम्ही पहिला असेलच, या चित्रपटात सगळंच सुरेख आहे, पण सगळ्यात जास्त भाव खाऊन जातं- टायटॅनिक जहाज! काय ते त्याचं भव्य दिव्य रूप दाखवलंय, एकदा पाहिलं की विसरणं कठीण. अश्या अनेक हॉलीवूड चित्रपटांची नावं देता येईल ज्यांमध्ये भली मोठी जहाज दाखवण्यात आली आहेत. अशी हि प्रचंड मोठी कल्पनेहूनही रम्य जहाजे पाहिली की त्यांच्याबद्दल कधीही न संपणार आकर्षण निर्माण होतं. अश्याच जहाज लव्हर्सना आम्ही ओळख करून देणार आहोत जगातील सर्वात मोठ्या जहाजाबद्दल. या जहाजाचे नाव आहे- ‘हार्मनी ऑफ द सीज’!

HOS-marathipizza01
royalcaribbean.com

हार्मनी ऑफ द सीज जहाज नव्हे, तर एक तरंगतं शहरच आहे म्हणा ना! सुमारे एक अब्ज डॉलर्स खर्च करुन हे महाकाय जहाज तयार केलं गेलंय.

HOS-marathipizza02
royalcaribbean.com

फ्रान्सच्या अटलांटिकच्या किनाऱ्यावर हार्मनी तयार केलं गेलं. जेव्हा ‘हार्मनी ऑफ द सीज’ फ्रान्सच्या साँ नजेएरहून रवाना झालं, तेव्हा पाहण्यासाठी तब्बल ७० हजारहून अधिक लोकांची उपस्थिती होती.

HOS-marathipizza03
dailymail.co.uk

४० किमी प्रती तास असा या जहाजाचा वेग असून, यात १० स्टोरी स्लाईड, ट्रिओ ऑफ वॉटर स्लाइड्स, किड्स वॉटरपार्क, सेंट्रल पार्क, बोर्डवॉक, पूल एंड स्पोर्ट्स जोन, सी स्पा एंड फिटनेस सेंटर, एंटरटेनमेंट प्लेस, यूथ जोन या सुविधाही आहेत.

HOS-marathipizza04
royalcaribbeanblog.com

हार्मनी ऑफ द सीजची लांब ३६१ मीटर आहे. फुटबॉल मैदानाची लांबी ३६० मीटर असते. यावरुन तुम्ही या जहाजाच्या लांबीची कल्पना करा.

HOS-marathipizza05
cruisemapper.com

या जहाजाची रुंदी ६६ मीटर म्हणजे २१७  फूट असून, म्हणजेच तुमच्या एक ड्रॉईंगरुमची रुंदी सरासरी १२ फूट असते. याचा अर्थ १७ ते १८ ड्रॉईंगरुम्स मावतील एवढी प्रचंड रुंदी!

HOS-marathipizza07
travelforsenses.com

हार्मनी ऑफ द सीज नामक या तरंगत्या शहरात १६ मजले आहेत. यामध्ये ६,३६० प्रवाशांना राहण्याची व्यवस्था असून, प्रवाशांच्या देखभालीसाठी २,१०० क्रू मेंबर्स आहेत.

HOS-marathipizza06
dailymail.co.uk

जर कधी संधी चालून आली तर या तरंगत्या स्वप्ननगरीचा आस्वाद नक्की घ्या!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?