आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
२०२० च्या सुरवातीपर्यंत सर्व काही आलबेल होतं, रोज सकाळी उठून लोक आपापल्या कामावर जायची, मुलं मुली शाळा कॉलेजेसमध्ये जायचे. मुंबईकर रोजच्या प्रमाणे लोकल पकडण्यासाठी घाई करायचे. आणि अचानक सगळं चक्रच बंद पडलं. कोरोना या साथीच्या आजाराने भारतात शिरकाव केला आणि तिकडे पंतप्रधानांनी लॉकडाऊन घोषित केला.
रोज कामासाठी, घरातल्या वस्तूंसाठी बाहेर पडावंच लागतं मात्र त्याकाळात पूर्णपणे बाहेर जाण्यास मज्जाव होता. लोकांचं धावत जीवन पूर्णपणे थांबलं.अनेकजण सुट्टीपासून वंचित होते त्यांनी या काळात पूर्णपणे आराम केला मात्र हे लॉकडाऊन जसे जसे वाढत गेले तसे सर्वचजण वैतागले होते. अनेकजण या काळात उत्तम शेफ बनले, पुरुषांनी घरगुती कामात हातभार लावला, घरच्या स्त्रीची किंमत कळली.
–
- धंदा बसायला लॉकडाऊन नव्हे, तुम्हीच कारणीभूत आहात का? वाचा
- लॉकडाऊनच्या काळात गुंतवणुकीशिवाय उत्पन्नाचा नवा मार्ग दाखवणारा लेख!
–
आजही अनेक उद्योगधंदे पूर्णपणे रुळावर आलेले नाहीत, अनेकांचा रोजगार गेला त्यातच आता फोर्डने पण आपला गाशा गुंडाळला आहे त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा येणार. ज्यांच्या हाती काम आहे असे लोक घरून काम करायला कंटाळले आहेत.
घरून काम करण्याचा परिणाम हा त्यांच्या रोजच्या जगण्यात देखील होत आहे. अशातच उद्योगपती हर्ष गोएंका यांना त्यांचाच एका कर्मचाऱ्याच्या पत्नीने पत्र लिहून आपलो व्यथा मांडली आहे. नेमकं काय म्हणाली आहे चला तर जाणून घेऊयात…
महिलेचं म्हणणं नेमकं काय?
हर्ष गोएंका यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर हे पत्र शेअर करत त्यावर आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे. पत्रामध्ये ती असं म्हणते की,
प्रिय सर मी तुमच्याच मनोज नावाच्या कर्मचाऱ्याची पत्नी आहे. मी तुम्हाला नम्र आवाहन करते की तुम्ही ऑफिसमधून काम करण्यास सुरवात करा. पतीचे लसींचे दोन्हो डोस झाले आहेत तसेच कोरोनाचे प्रोटोकॉल सांभाळत आहे. जर वर्क फ्रॉम होम असेच सुरु राहिले तर आमचं लग्न नक्की तुटणार.
ऑफिसमधून काम सुरु करा असे आवाहन तरी तिने केलेच पुढे तिने आपली व्यथा देखील मांडली आहे, ती पुढे असं म्हणाली की, ‘ माझा नवरा दिवसातून दहा वेळा कॉफी पितो. घरात वेगवेगळ्या जागी जाऊन काम करतो आणि घरातल्या सगळ्या गोष्टी इकडे तिकडे टाकून देतो. याव्यतिरिक्त सतत खायला मागत असतो, आणि कामाच्या वेळी मी त्याला झोपताना बघितले आहे. मला आधीच दोन मुले आहेत मला त्यांचा सांभाळ देखील करावा लागतो. त्यामुळे माझी मदत करा.
हर्ष गोएंका सुद्धा हे पत्रं बघून हतबल झाले. त्यांनी हे पत्रं ट्विट केल्यावर अनेकजणांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, काय म्हणाले आहेत लोकं चला बघुयात…
अनेकांनी आपल्या प्रतिक्रियांमधून त्या महिलांची बाजू मांडली आहे. खास करून ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांची जास्तच तारांबळ उडत आहे.
एकाने तर त्याच्या पत्नीलाच कामावर घ्या असा सल्ला दिला आहे तसेच ते पुढे म्हणाला की बायकांना कळू दे नवरा आपल्या कुटुंबासाठी करियरमध्ये किती मेहनत घेत आहे.
महिलांची बाजू मांडणारे काहीजण आहेत तर काहीजण या पत्रावरून तिची खिल्ली उडवत आहेत, खिल्ली उडवणाऱ्यांना एका महिलेनेच कडक शब्दात सुनावले आहेत.
–
- लॉकडाऊन ही संकल्पना जगासाठी नवीन नाही! चला थोडे इतिहासात डोकवूयात…
- लॉकडाऊनमध्ये हिट ल्युडो, आपल्या भरत-भूमीत जन्मलेल्या खेळावर बेतलाय! वाचा
–
आज ट्विटरवर अनेकजण सक्रिय असतात अगदी मोठमोठाल्या कंपन्यांचे सीईओ देखील आपापली मत व्यक्त करत असतात यात आनंद महिंद्रा, रतन टाटा ही मंडळी जास्त सक्रिय असतात.
गेल्या वर्षभरापासून अनेक स्तरातून सर्वे करण्यात आले होते ज्यात घरून काम करायला लोक जास्त कंटाळले आहेत असे दिसून आले तसेच अनेक पालक देखील मुलांच्या ऑनलाईन शिक्षणामुळे त्रस्त आहेत.
कंपनी ही कर्मचाऱ्यामुळे असते, कंपनीतले कर्मचारी हे माझ्या कुटुंसारखेच आहेत अनेक कंपन्यांचे सीईओ आपल्या भाषणात ही वाक्य हमखास टाकत असतात त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल देखील वाढते. मात्र सध्याच्या ओढवलेल्या परिस्थितीवर कोणाकडेच उत्तर नाही.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.