Site icon InMarathi

साकीनाका प्रकरणावर हेमांगी कवीची सडेतोड पोस्ट- वाचा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

hemnagi final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

काही वर्षांपूर्वी दिल्लीमधील एका तरुणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार झाला होता, तिच्यावर अत्याचार करण्यात आले, उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. मग त्यावरून सुरु झालेले राजकारण, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न यावरून समाजमाध्यमात अनेक दिवस चर्चा सुरु होती. काही आरोपींना कायद्यातील काही तरतुदींमुळे सोडण्यात आले यावरून देखील अनेकांनी आपल्याच कायद्याची खिल्ली उडवली होती.

 

 

देशाच्या राजधानीत घडलेल्या या घटनेची पुनरावृत्ती देशाच्या आर्थिक राजधानीत देखील झाली. मुंबईच्या साकीनाका या गजबजलेल्या परिसरात एका महिलेवर बलात्कार करण्यात आला तसेच तिच्या अमानवी अत्याचार देखील केले यातच तिचा मृत्यू देखील झाला.

२४ तास सुरु असणाऱ्या मुंबईत पोलिसांचा कडक पहारा तरीदेखील या गजबजलेल्या शहरात एका तरुणीवर बलात्कार होऊ शकतो, हेच मुळात धक्कादायक आहे. यावरून विरोधकांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेतच, सरकारने देखील ठोस पाऊले उचलायला सुरवात केली आहे.

इतकी मोठी घटना घडल्यावर साहजिकच जनमानसातून प्रतिक्रिया येणारच, त्यात कलाकार देखील आजकाल पुढे असतात. मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने सोशल मीडियावर आपली खंत व्यक्त केली आहे. पोस्टमधून तिने उपरोधिकपणे ‘त्या’ स्त्रिला जबाबदार ठरवले आहे. तिच्या पोस्टवर अनेकजण आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत, नेमकं काय म्हणाली आहे ती चला तर मग जाऊन घेऊयात…

 

 

हेमांगीने टाकलेल्या या पोस्टमध्ये स्त्रियांची कशी दरवेळी चूक असते किंवा स्त्रीच दोषी असते या अनुषंगाने आपले मत मांडले आहे.

 

 

 

स्वरा भास्कर, कंगना राणावत यासारख्या बॉलीवूडच्या अभिनेत्रीदेखील कायम फेमिनिझम या विषयावर आपापली मत मांडतात, घडलेल्या प्रकारावरुन आणि हेमांगीच्या पोस्टवरून तिला नेटकरी फेमिनिझमवरून बोलत आहेत. लोकांच्या प्रतिक्रियांना तिने देखील स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे.

 

 

एकीकडे फेमिनीजमवरून पुरुषमंडळी ट्रोल करत आहेत तर दुसरीकडे काहीजण हेमांगीला पाठिंबा देत आहेत. तर काहीजण स्त्रियांनी शस्त्र वापरली पाहिजे असे आव्हानच करत आहेत.

 

 

काहींनी झालेल्या बलात्काराला थेट जातीयतेचे वळण देत आहेत तर काहीजण हेमांगीच्या पोस्टला पाठिंबा देत आहेत.

 

 

हेमांगी कवी गेल्या काही वर्षांपासून महिलांच्या समस्येवरून आपली मतं मांडत असते, ज्यावरून तीच ट्रोल होत असते. तिला पोस्ट करण्यासाठी हे कारण मिळालं असं एकजण म्हणतात तर इतरजण तिलाच पाठिंबा देत आहेत.

 

स्त्रीवर बलात्कार झाला की त्याची वेगवेगळी कारणं शोधली जातात, एकाने तर थेट सिनेमातील लोकांवर टीका केली आहे त्यांचं असं मत आहे की सिनेमातील अभिनेत्रींच्या नग्न दृश्यांमुळे आणि लैंगिक शिक्षणाचा अभावामुळे अशा गोष्टी घडतात. कुणी एकाने हेमांगीलाच सल्ला देत, ‘केवळ महिलांच्या प्रश्नांची पोस्ट न टाकता पुरुषांच्या प्रश्नांना वाचा फोडा’, असं मत मांडलं आहे.

घडलेला प्रकार अत्यंत भीषण आणि समाजाला काळिमा फासणारा आहे. आरोपीला तातडीने फाशी द्यावी अशी मागणी अनेकांना कडून होत आहे, पोलिसांनी काही तासातच आरोपाला अटक केली आहे. पुढे केस चाललेच आरोपीला काय शिक्षा होतेय याकडे सर्वजण डोळे लावून बसले आहेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version