Site icon InMarathi

शाळा, शिक्षण, मार्क्स हे केवळ माध्यम, उद्दिष्ट नाही; ३ मित्रांची गोष्ट

3 Friends IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ही आहे तीन मित्रांची गोष्ट. तिघेही लहानपणापासून एकमेकांचे पक्के दोस्त!

पहिला मित्र अतिशय हुशार, शाळेत पहिला नंबर कधीही न सोडणारा आणि अगदी प्रत्येकच गोष्टीत अव्वल… दुसरा मित्र आपला सर्व सामान्य, अगदीच हुशार नाही पण नापास वागैरे न होणारा. नियमितपणे पुढच्या वर्गात न ढकलता जाणारा.

तिसरा मित्र, अतिशय मस्तीखोर, टग्या, अभ्यासात दुर्लक्ष, शाळेत बारा भानगडी करणारा. पण तिघांची मैत्री मात्र घनिष्ठ. एकमेकांचे जिगरी दोस्त.

 

 

पुढे शाळा संपली. जो हुशार मित्र होता, त्याने अपेक्षेप्रमाणेच इंजिनिअरिंग केलं, मग तिथेही अव्वल ठरला. पुढे Indian Engineering Services ची परीक्षा दिली आणि Class 1 अधिकारी या पदावर त्याची नियुक्ती झाली. पुढे हा अधिकारी, Chief Of Indian Railway झाला.

दुसरा मित्र होता, त्याने शाळेनंतर Physics मध्ये पदवी पूर्ण केली. पुढे काय करायचं हा प्रश्न होता. प्रशासकिय सेवेत शिरण्याचा प्रयत्न करायचा होता. IAS ची परीक्षा दिली, पास झाला, मुलाखत पास झाला, आणि निवडलाही गेला. पुढे हा मुलगा, पहिला मित्र ज्या विभागात खाली कुठेतरी अधिकारी होता त्या खात्याचा सर्वोच्च म्हणजे सचिव झाला.

 

===

===

तिसरा मित्र, तर शाळा संपल्यानंतर पुढच्या शिक्षणाच्या वगैरे जास्त भानगडीत पडला नाही. पुढे त्याने योग्य वेळी, योग्य पक्षाकडून निवडणूक लढवली, खासदार झाला. आणि त्यानंतर तर पहिले २ मित्र ज्या खात्यात अधिकारी होते त्याच खात्याचा कॅबिनेट मिनिस्टर झाला.

ही काही काल्पनिक गोष्ट नाही, बरं का मंडळी; सत्य कथा आहे.

पहिला मित्र, अतिशय हुशार, तो म्हणजे, कोकण रेल्वेचे शिल्पकार, E. Shridharan. त्यांना Metro Man, म्हणूनही संबोधतात. दिल्ली मेट्रोचे ते CEO होते.

 

 

दुसरा मित्र म्हणजे, T. N. Sheshan. अतिशय कठोर आणि शिस्तप्रिय IAS Officer. भारतीय निवडणुक आयोगाचा दर्जा आणि प्रतिष्ठा उंचावण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे.

 

 

तिसरा मित्र म्हणजे, K. P. Unnikrishnan. लोकसभेवर सलग ५ वेळा निवडून गेले. पंतप्रधान V.P.Singh यांच्या मंत्रीमंडळात ते मंत्री होते.

 

 

तात्पर्य

शाळा, शिक्षण, मार्क्स ही फक्त अनेक माध्यमांपैकी काही माध्यमं आहेत, उद्दिष्ट नाहीत. उद्दिष्ट तर खूप मोठीच असावीत. आपल्या मुलांना या माध्यमांचे गुलाम होऊ देऊ नका. त्यांना त्यांची उद्दिष्ट उंच ठेवायला सांगा आणि जीवनाचा आस्वाद मुक्तपणाने घेऊ द्या.

===

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version