Site icon InMarathi

ख्रिस्चन मुलींभोवती लव्ह आणि नार्कोटिक जिहादचं जाळं : कॅथलिक बिशपचा आरोप

jihad inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

नुकतंच प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी एका इंग्रजी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असे म्हंटले की ‘तालिबानी आणि आरएसएस यांची विचारसरणी सारखीच’. त्यांच्या या वादग्रस्त विधानाने पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम या अनंतकाळ सुरु असलेल्या वादाला तोंड फुटले.

 

 

 

जावेद अख्तर यांनी माफी मागवावी अशी मागणी अनेक हिंदू संस्थांनी केली. हिंदू मुस्लिम हा वाद सुरु असतानाच आता यात ख्रिश्चन धर्माच्या एका धर्मगुरूने देखील उडी घेतली आहे. कॅथलिक धर्मगुरू पाला बिशप यांनी एका कार्यक्रमात वादग्रस्त विधाने केली आहेत, नक्की काय म्हणाले जाणून घेऊयात…

पाला बीशोप नक्की काय म्हणाले?

‘केरळसारख्या राज्यात आज मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन मुलींना लव्ह आणि नार्कोटिकस जिहादच्या जाळ्यात अडकवले जात आहे. बिगर मुस्लिम मुली त्यात विशेष करून ख्रिश्चन मुलींना विशेष टार्गेट करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लव्ह जिहादचा भाग बनवत आहेत. तसेच अशा मुलींना दहशतवादासारख्या विध्वंसक कारवायांमध्ये वापरून त्यांचे शोषण केले जात आहे. कुरवीलिंगड येथील एका चर्चमध्ये भरलेल्या एका उत्सवात त्यांनी आपले मत मांडले.

 

Mathurbhumi

 

बिशप पुढे असेही म्हणाले की ‘इतर धर्मांचा सर्वनाश करण्यासाठी जिहादी लोक वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग वापरत आहे. भारतासारख्या लोकशाही देशात जिथे शस्त्रांनी इतर धर्मातील लोकांना मारू शकत नाही तिथे अशा माध्यमातून जिहादी लोक आपले लक्ष पूर्ण करत आहेत’.

केरळ राज्याचा इतिहास बघितला तर अनेक अरब व्यापारी मसाल्यांचा शोधात केरळच्या किनाऱ्यावर आले होते, काही तिथेच स्थायिक झाले तर काहीजण तिकडच्या महिलांसोबत लग्न करून त्यांना आखात देशात नेले. त्यामुळे धर्मांतराचा इतिहास तसा जुनाच आहे. त्यांनतर पोर्तुगीज,इंग्रज आले त्यांनी देखील ख्रिस्तधर्माचा प्रसार करून अनेक कुटुंबाना बाटवले.

 

 

आज केरळ राज्याला कोरोनासारख्या साथीच्या आजाराने आधीच पिडले आहे त्यातच अधूनमधून सुरु असणाऱ्या धर्मांतराच्या मुद्द्यानेसमाज विघातक गोष्टी घडत असतात. आज केरळमधील काही भाग प्रामुख्याने मुस्लिम बहूसंख्य आहे तर काही भाग हा ख्रिश्चन बहू संख्य आहे. मल्याळम  सिनेमामध्येदेखील अनेकदा असे विषय हाताळले जातात.

 

The News Minute

 

फॅमिली मॅन या सिरीजच्या पहिल्या भागात सुद्धा हेच दाखवले आहे. एक मुस्लिम अतिरेकी हॉस्पिटलमधील एका नर्सला प्रेमाच्या जाळयात अडकवतो आणि नंतर पसार होतो. आज केरळमधील तरुणांना जिहादच्या नावावर भडकवून दहशतवादाकडे वळवले जात आहे.

लव्ह जिहाद या विषय गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. अगदी बॉलीवूड सेलिब्रेटींपासून ते अगदी सामान्य लोकपर्यंत अनेकांना या लव्ह जिहादचा सामना करावा लागला आहे. मध्यंतरी युपीमधल्या एका व्यक्तीला लोकांचे जबरदस्ती धर्मांतर केले म्हणून अटक करण्यात आली होती, त्याच्या अटकेनंतर असेही समोर आले की ती व्यक्ती लव्ह जिहादसाठी अनेक व्यक्तींचे धर्मांतर करत होती.

 

 

योगी सरकारने तातडीने लव्ह जिहाद कायद्यातील तरतुदी आणखीनच कडक केल्या आहेत. आज कोरोनासारखे संकट पूर्णपणे टळले नाही याचाच फायदा घेऊन धार्मिक मुद्द्यांवरून काहीजण वेगळेच राजकरण करत आहेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version