Site icon InMarathi

फक्त स्वादासाठी नव्हे तर आरोग्यासाठी गुणकारी आहे ‘केशर’! वाचा ७ फायदे

kesar final inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

‘पी हळद आणि हो गोरी’ ही म्हण आपल्या सगळ्यांना चांगलीच माहिती आहे. यातली हळद आपल्याला गोरेपणाबरोबरच आपल्या आरोग्याची देखील काळजी घेते. भारतीय खाद्यशास्त्रात असे अनेक पदार्थ आहेत जे आपल्याला सौंदर्याबरोबरच आरोग्यही प्रदान करतात.

हळद, दालचिनी , जायफळ या मसाल्यांबरोबर एक दुर्मिळ गोष्ट आपल्या स्वयंपाक घरात अशीही असते जी आपल्या सौंदर्याला आणि आरोग्याला झळाळी देते. ती वस्तू आहे कश्मीर की कली असलेले ‘केशर ‘ !

 

youtube.com

 

अनेक रुचकर पदार्थांमध्ये, दुध, लस्सी, श्रीखंडामध्ये आपण केशर वापरतो. भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये केशराला मानाचं स्थान देण्यात आले आहे. नैवेद्य शुद्ध करण्यासाठी त्यात आवर्जून केशर वापरलं जातं. शिवाय केशरामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, फॉलिक अॅसिड, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, कॉपर, झिंक, मॅग्नेशिअम असते. अनेक पोषक तत्वांमुळे अगदी लहान बाळापासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वांनाच केसर उपयुक्त आहे.

केशराचा उपयोग खर तर पदार्थाला सुवास देण्यासाठी आणि पदार्थाना रंग येण्यासाठी केला जातो. पण खास पदार्थांचा रंग आणि स्वाद वाढविण्याशिवाय केशराचा उपयोग त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठीही केला जातो. त्वचेचा रंग उजळवण्यासाठी त्याचप्रमाणे सतेज करण्यासाठी केशराचा वापर करण्यात येतो.

 

 

केशराच्या अनेक सौंदर्यवर्धक फायद्यांसोबतच आरोग्यदायी फायदेही आहेत. त्वचेवरील डाग घालवून त्वचा सुंदर बनविण्यासाठी केशराचा उपयोग प्राचीन काळापासून चालत आला आहे. केशराचे त्वचेसाठी असणारे फायदे अनेक आहेत. तसेच केशर हे अनेक आजारांवर गुणकारी देखील आहे. हे केशर, हे फक्त स्वादासाठीच वापरतात असं नाही, त्याचे हे ७ भन्नाट फायदे तुम्हाला माहिती आहेत का?नसतील तर चला जाणून घेऊयात त्याच्या आरोग्यदायी फायद्यांबाबत…

 

१. पिंपल्स कमी करण्यासाठी : –

त्वचा तेलकट असेल तर त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर मुरमं अथवा पिंपल्स दिसू लागतात. केशरामध्ये या मुरमांना कमी करण्याची शक्ती आहे. पिंपल्स कमी करण्यासाठी केशर आणि चंदन पावडरचा फेसपॅक तयार करून तुम्ही वापरू शकता. तसेच सनटॅन कमी करण्यासाठीदेखील तुम्ही हा फेसपॅक वापरू शकता.

 

 

२.नितळ आणि चमकदार त्वचेसाठी :-

केशर केवळ आरोग्यासाठीच नाही तर तुमचे सौंदर्य वाढविण्यासाठीदेखील तितकेच उपयुक्त आहे. चेहरा नितळ दिसण्यासाठी आणि त्वचेवरील ग्लो वाढविण्यासाठी केशराचा फेसपॅक वापरण्यात येतो.

केशरामधील अॅंटी ऑक्सिडंट गुणधर्मांमुळे तुमच्या चेहऱ्याचे योग्य पोषण होऊ शकते. यासाठी मध, बदाम आणि केशर एकत्र करून फेसपॅक तयार करा.

 

 

नियमित हा फेसपॅक लावल्यास तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या सुद्धा कमी होतील.. हा फेसपॅक नियमित अथवा आठवड्यातून दोनदा लावल्यास तुमच्या त्वचेवर नॅचरल ग्लो दिसू लागेल. याशिवाय जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग असतील तर तुम्ही तेही केशराच्या मदतीने कमी करू शकता.

३.गरोदरपणात महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर :-

वास्तविक गरोदर महिलांना केशर कमी प्रमाणात घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र प्रेगन्सीमध्ये थोड्याप्रमाणात केशर घेण्यास काहीच हरकत नाही. कारण केशरामुळे गरोदर महिलांना पोटातील गॅस आणि हातापायावर येणारी सूज कमी होण्यास मदत होऊ शकते.

 

marathi movie

 

गरोदरपणामध्ये चिंता काळजी केल्यामुळे अनेक महिलांना डिप्रेशनचा सामना करावा लागतो. नैराश्य गरोदर महिला आणि त्यांच्या पोटातील बाळासाठी घातक ठरू शकते. मात्र केशरामुळे गरोदर महिलांना शांत वाटू शकते. त्यामुळे झोप आणि आराम मिळण्यासाठी दूधातून थोड्याप्रमाणात केशर घेण्यास काहीच हरकत नाही. गरोदरपणी केशर खाल्यास बाळ गोरं होतं असाही एक समज आहे.

४.कर्करोगापासून दूर राहण्यास मदत : –

केशरामध्ये कर्करोगाला दूर ठेवण्याची ताकद असते. एका संशोधनानुसार केशर कर्करोगावर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे. कारण केशरातील क्रोसिनमुळे कर्करोगाच्या पेशी वाढत नाहीत. त्यामुळे स्तनांचा कर्करोग, त्वचेचा कर्करोग अथवा पोटाचा कर्करोग असल्यास त्या रूग्णाला केशर दिले जाते. रक्ताच्या कर्करोगावरही केशर फायदेशीर ठरते.

 

 

५. शांत झोप येण्यासाठी मदतगार : –

आजकालच्या धावपळीच्या काळात पुरेशी झोप मिळणं फारच कठीण झालं आहे. कामाचा ताण, दैनंदिन चिंता, सतत होणारा स्मार्टफोनचा वापर यामुळे निवांत झोप येत नाही. वास्तविक निरोगी जीवनासाठी प्रत्येकाने दररोज कमीतकमी आठ तास झोप घेणं गरजेचं असतं. मात्र आजकाल अनेकजण उशिरा झोपतात त्यामुळे त्यांना अपुऱ्या झोपेच्या समस्येला सामोरं जावं लागतं. शांत झोप लागण्यासाठी उपाय म्हणून रात्री झोपताना केशराचे दूध प्यायल्याने तुम्हाला शांत झोप लागू शकेल.

 

 

६.दम्याचा त्रास कमी होण्यासाठी उपयुक्त : –

प्राचीन काळी दम्याचा त्रास असलेल्या रूग्णांवर केशराचा उपचार केला जायचा. केशरामुळे श्वसनसंस्था सुधारते. वातावरणात बदल झाल्यास अस्थमाच्या रूग्णांना सर्वात जास्त त्रास होऊ लागतो. असे असल्यास नियमित केशराचे दूध प्या. ज्यामुळे तुम्हाला दम्याचा त्रासापासून आराम मिळेल. कारण केशरामुळे फुफ्फुसांमधील सूज आणि जळजळ कमी होते. योग्य वैद्यकीय सल्ल्याने केशराचे केलेले सेवन फायदेशीर ठरते.

 

NDTV doctor

 

७.स्मरणशक्ती वाढते व पचनसंस्थेचे काम सुधारायला मदत करते : –

केशरामुळे स्मरणशक्ती वाढते. कारण केशरामुळे मेंदूच्या कार्याला उत्तेजना मिळते. त्यामुळे लहान मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी आणि त्यांची अभ्यासातील एकाग्रता वाढण्यासाठी त्यांना नियमित केशर दिले जाते. शिवाय वयोमानानुसार वृद्धांमध्ये होणाऱ्या अल्झायमर आणि विस्मरणाच्या समस्येला दूर करण्यासाठी वृद्धांना देखील केशराचा चांगला फायदा होऊ शकतो.

 

harvard health

 

यासाठी घरातील सर्वांनी केशराचे दूध घेण्यास काहीच हरकत नाही.केशरामुळे पचनाच्या कार्यात देखील चांगली सुधारणा होऊ शकते. ज्यांना पोट दुखणे, अॅसिडिटी, अल्सर अथवा पचनासंबधीत अन्य समस्या असतील त्यांनी नियमित केशराचा वापर करावा. थोडक्यात पचनक्रिया सुधारण्यासाठी केशर एक उत्तम औषध आहे.

 

 

याशिवाय केशरामुळे रक्तातील गुड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. परिणामी हृदयविकाराला आळा बसतो. तसंच उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. त्याचबरोबर केशरामुळे हृदयाचे आरोग्य जपले जाते. वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे डोळ्यांच्या रँटीना खराब होऊन दृष्टीला इजा पोचू शकते. पण केशरामुळे कोलेस्ट्रॉल ची पातळी प्रमाणात राहते व नजर ही सुरक्षित राहते.

तेव्हा, केशराच्या या फायद्यांमुळे मित्रांनो आपल्या स्वयंपाकघरात हे बहुगुणी नाजूक फुलांचे केशर/केसर हवेच! केशर खा,स्वस्थ रहा! मस्त रहा!

===

 

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version