Site icon InMarathi

‘मराठी’ इंडियन आयडॉलमध्ये हिंदीसारखाच ‘ढोंगीपणा'(!) बघायला मिळणार का? वाचा

indian idol marathi featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

सध्या सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमावरून सगळीकडेच उलट सुलट चर्चा घडताना आपण बघतो आहोत. एकंदरच सारगेमपच्या या नवीन पर्वाचे सादरीकरण, अपरिपक्व मुलांची जज म्हणून झालेली निवड आणि एकंदरच शोमध्ये चालणारी नौटंकी बऱ्याच लोकांना खटकत आहे.

गाणारी सगळी मुलं उत्कृष्ट आहेत, त्यांच्यात टॅलेंटपण भरपूर आहे पण त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांची निवड झालेली आहे तीच लोकं अजून स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी धडपड करत असल्याने हा सगळा पब्लिसिटी स्टंट असल्याचंसुद्धा म्हंटलं जातंय!

 

आता नुकतीच सोनी मराठी या नवीन वाहिनीने इंडियन आयडॉल मराठीची घोषणा केली असल्याने या सगळ्याच रिऍलिटी शोवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहणार हे निश्चित आहे.

निश्चितच या शोमुळे मराठी गायकांना एक नवा मंच आणि नवी संधी मिळणार असून महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात हा कार्यक्रम पोहोचणार आहे हे नक्कीच पण आता या शोची तुलना आधीची हिंदी इंडियन आयडॉलशी केली जाणार हे देखील तितकंच खरं आहे.

 

 

हिंदी इंडियन आयडॉलचं १२ वं पर्व नुकतंच संपलं आणि पवनदीप राजन याला विजेता म्हणून घोषित केलं गेलं, शिवाय भारताचा पहिला इंडियन आयडॉलसुद्धा आपला मराठमोळा अभिजीत सावंतच होता.

इंडियन आयडॉल हे जेव्हा पहिल्यांदा आपल्याइथे सुरू झालं तेव्हा रिऍलिटी शोजचा एवढा सुळसुळाट नव्हता, काही मोजकीच चॅनल्स आणि मोजकेच शोज फेमस होते त्यामुळे सुरुवातीला त्या शोचं अप्रूप वाटत होतं.

आता तर ढीगभर चॅनल्स आणि त्यावर येणारे खंडिभर शोजमुळे त्यांची खरी मजा हरवून गेली ती कायमचीच. शिवाय सुरुवातीला जेव्हा इंडियन आयडॉल सुरू झालं तेव्हा त्यातले स्पर्धक आणि जजेससुद्धा त्या लेवलचे होते.

सध्यातर एकंदरच संगीताचा आणि रिऍलिटी शोजचा घसरलेला दर्जा बघता पुन्हा जुना इंडियन आयडॉल अनुभवायला मिळणं मुश्किल आहे. खरंतर कित्येकवेळा या शोजचा मुखवटा आपल्यासमोर उतरवला गेला आहे तरी त्यांची संख्या दिवसागणिक वाढतीच आहे.

 प्रत्येक शोमधून महानायक, महागायक निर्माण करणाऱ्या या शोजचा मुखवटा सोनू निगमसारख्या गुणी कलाकाराने टराटरा फाडला होता, मध्यंतरी एका मुलाखतीत सोनूने आधीचं इंडियन आयडॉल आणि आताचं पर्व यांच्यातला फरक सांगून कशाप्रकारे लोकांची फसवणूक होते हे उघडकीस आणलं होतं.

 

 

हे सगळे शो अरेंज करणारे प्रोड्यूसर कशाप्रकारे स्क्रिप्ट लिहितात, कशाप्रकारे त्यातल्या स्पर्धकांना सादर केलं जातं, त्यांच्या आर्थिक परिस्थितिचं भांडवल केलं जातं, त्यांच्याविषयी कशाप्रकारे सहानुभूती मिळवून त्यांनाच वोट देण्यासाठी लोकांना प्रवृत्त केलं जातं हे सगळं सोनूने त्या व्हीडियोमध्ये सांगितलं होतं.

सध्याच्या इंडियन आयडॉलचे जज ज्याप्रकारे वागतात, बोलतात, रडतात, कौतूक करतात ते किती बेगडी असतं, ते सगळं ठरलेलं असतं. शिवाय त्यात म्हंटली जाणारी गाणी ही लाईव्ह नसून रेकॉर्डेड असतात असे आरोप बऱ्याचदा झालेले आपण बघितले आहे.

आता मराठीत इंडियन आयडॉल सुरू होणार म्हणजे त्यातही असंच स्क्रिप्ट केलेलं बघायला मिळणार का? त्यातही हे असे अपरिपक्व लोकं परीक्षक म्हणून बसवणार का? त्यातही स्पर्धकांची आर्थिक बाजू बघून त्याला ग्लोरिफाय केलं जाणार का? यातही उगाच डोळ्यातून पाणी काढणाऱ्या जजेस बघायला मिळणार का?

 

 

अशाच अनेक शंका सध्या सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात आहेत. खरंतर हा असला प्रकार या मराठी इंडियन आयडॉलमध्ये यायला नको!

कारण आधीच डेली सोपमधल्या ड्रामाला लोकं कंटाळले आहेत, आणि जर या अशा शोजमध्येसुद्धा पुन्हा तसलीच नौटंकी बघायला मिळाली तर यावरचा लोकांचा होता नव्हता तेवढा सगळा विश्वासही  उडून जाईल हे मात्र नक्की.

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version