आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
दरवर्षी गणपती आले की सर्वांनाच उत्सुकता असते की, “यावर्षी ‘लालबागचा राजा’ ची मूर्ती कशी असेल ?” पिवळा पितांबर, भव्य बैठक आणि २० फूट उंच मूर्ती हे आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वरूप सर्वांच्या मनावर कोरलं गेलं आहे. तो दरवर्षी येतो, आपल्यालाला आनंद देतो आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याच्या आश्वासनासह आपला निरोप घेतो.
आबालवृद्ध व्यक्तींपासून सेलिब्रिटींपर्यंत आकर्षण असलेल्या ‘लालबागचा राजा’ ची स्थापना कधी झाली ? सुरुवात कशी होती ? जाणून घेऊयात.
सुरुवात :
१९३४ मध्ये ‘लालबागचा राजा’ ची स्थापना झाली होती. लालबाग मार्केट भागातील ‘सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ या नावाने या उत्सवाचा श्रीगणेशा करण्यात आला होता. मुंबईचा इतिहास वाचला तर लक्षात येतं की, दादर-परळ लगतच्या भागात आधी ‘पेरू चाळ’ होती. १९३२ मध्ये काही कारणास्तव ‘पेरू चाळ’ बंद करण्याचे आदेश ब्रिटिशांनी काढले होते.
या आदेशामुळे त्या भागात राहणाऱ्या कोळीबांधव आणि इतर दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली होती. परिस्थिती बदलावी, या जागेत आपल्यासाठी हक्काचं ‘मार्केट’ तयार व्हावं यासाठी इथले स्थानिक लोक एकत्र येऊन गणपतीची प्रार्थना करायचे.
१९३४ मध्ये ‘विघ्नहर्ता’ बाप्पा लोकांच्या मदतीसाठी धावून आला आणि त्याने या जागेच्या मालकाला अशी बुद्धी दिली की, त्याने ‘पेरू चाळ’ च्या प्लॉटवर स्थानिक विक्रेत्यांसाठी एक बाजारपेठ उभी करायचं ठरवलं. लोकांच्या मनासारखं झालं होतं.
१९३४ मध्ये सर्वात पहिल्यांदा साजरा झालेला गणेशोत्सव हा प्रचंड उत्साहाने आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला होता. आपल्या लाडक्या बाप्पाला कोळीबांधवांनी त्यांचा पारंपारिक पोशाख घालून सजवलं होतं. १२ सप्टेंबर १९३४ हा तो दिवस होता जेव्हा या जागेत सर्वप्रथम गणेशमूर्ती ची स्थापना करण्यात आली होती.
- शंकराने गणपतीचे उडवलेले शीर आजही भारताच्या या गुहेत पहायला मिळते
- ८७.३% मुस्लिम असलेल्या देशाच्या नोटेवर गणरायाची प्रतिमा आली कुठून? वाचा…
–
कालांतराने, मुंबईसोबतच इतर शहरातील लोक गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘लालबागचा राजा’ च्या दर्शनसाठी येऊ लागले. दरवर्षी नव्याने स्थापन केली जाणारी मूर्ती, लोकांचा सळसळता उत्साह त्यामुळे इथे येणारा प्रत्येक भाविक हा भारावून गेल्याशिवाय राहत नव्हता. भक्तांना गणेशाच्या कृपेची प्रचिती येऊ लागली आणि हळूहळू ‘लालबागचा राजा’ ची ओळख ही ‘लोकांच्या मनातील ओळखणारा’, ‘इच्छापूर्ती करणारा बाप्पा’अशी होण्यास सुरुवात झाली.
भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न सुरू असलेल्या त्या काळात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरा व्हावा आणि त्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्यक्रम सादर व्हावेत अशी साद दिली होती.
ब्रिटिशांची जुलमी वागणूक लोकांपर्यंत पोहोचावी, भारत स्वतंत्र होणं किती गरजेचं आहे हे लोकांना एकत्र करून सांगता यावं म्हणून सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती.
लोकांचा वाढता प्रतिसाद:
१९५८ पासून ‘लालबागचा राजा’ गणपतीचे भक्तगण मोठ्या प्रमाणात वाढले. गणपतीसमोर देखावे, चलचित्र ही पद्धत सुद्धा याच दरम्यान सुरू झाली. मनोरंजन क्षेत्रातील लोकांनी या काळातच ‘लालबागचा राजा’ च्या दर्शनासाठी येण्याची सुरुवात केली आणि प्रसारमध्यमांनी या पवित्र वास्तूची दखल घेण्यास सुरुवात केली.
मूर्तिकारांची माहिती :
‘लालबागचा राजा’ चं अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे १९३४ पासून २०२१ पर्यंत दरवर्षी नव्याने तयार करण्यात येणारी मूर्ती ही ‘कांबळी’ कुटुंबाने तयार केलेल्या आहेत. जवळपास ८० वर्षांपासून सुरू असलेली ही मूर्ती तयार करण्याची ही प्रथा आता कांबळी कुटुंबाची तिसरी पिढी आता सांभाळत आहे.
कांबळी कुटुंबातील सर्वात वरिष्ठ व्यक्ती ‘७३ वर्षीय रत्नाकर कांबळी’ हे आहेत. त्यांचे वडील हे मूर्तिकार होते. लालबागला राहण्या आधी ते महाराष्ट्रभर फिरून आपण तयार केलेल्या मूर्ती विकायचे. ते लालबागला आले आणि इथलेच झाले. कांबळी कुटुंबीय ‘लालबागचा राजा चा दरबार’ ही संकल्पना ही कांबळी कुटुंबीयांचीच होती.
सामाजिक योगदान:
‘लालबागचा राजा’ ची महानता ही फक्त भव्य मूर्तीमुळे नसून त्या मंडळाने केलेल्या समाजोपयोगी कामांमुळे सुद्धा आहे. प्रत्येक वेळी देशावर आलेल्या संकटातून बाहेर काढण्यासाठी ‘लालबागचा राजा’ मंडळाने आर्थिक मदत केलेली आहे.
फाळणीच्या वेळेस बेघर झालेले लोक असतील किंवा १९५९ मध्ये बिहार मध्ये आलेला महापूर असेल किंवा १९६५ मध्ये चीन सोबत झालेलं युद्ध असेल ‘लालबागचा राजा’ मंडळाने नेहमीच देशाला संकटातून बाहेर पडण्यास मदत केली आहे.
- धर्म वाचवणाऱ्या, नवसाला पावणाऱ्या ‘बाप्पाचा’ पेशवेकालीन इतिहास वाचायलाच हवा!
- पुण्यातले ५ मानाचे गणपती! त्यांचा हा शेकडो वर्षं जुना इतिहास माहित असायलाच हवा!
–
‘लालबागचा राजा’ ची भव्यता ही शब्दांपेक्षाही प्रत्यक्ष बघण्याची गोष्ट आहे. त्याला आपली इच्छा व्यक्त करून त्याचा आशीर्वाद ही प्रत्येकाने अनुभवायची गोष्ट आहे. बाप्पाच्या कृपेने आपण कोरोनावर तर बऱ्यापैकी मात केली आहे, आता येणाऱ्या वर्षात ‘मास्क’ पासून सुद्धा मुक्ती मिळावी अशी त्याच्या चरणी प्रार्थना करूयात.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.