Site icon InMarathi

उजव्या आणि डाव्या सोंडेच्या गणेशाच्या मूर्तींमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या!

ujvi and davi sond inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

सर्व दु:ख, संकट निवारण करणारा श्री गजानन! सगळे जण भक्तीभावानं बाप्पाला घरी आणतात आणि त्याची मनोभावे पूजा करतात. महाष्ट्रातला हा उत्सव देशातल्या घरा घरात जाऊन पोहोचला आहे. यानिमित्तानं जाणून घेऊ गणपतीच्या मूर्तीची सोंड आणि त्यामागचं शास्त्र…

 

indiatv.in

 

गणपती हा सर्व दु:खांचा हर्ता मानलं जातं. कोणत्याही शुभकार्याच्या सुरवातीला, पूजेच्या प्रारंभी गणेश पूजनाचा रिवाज आहे. मात्र अनेकांच्या मनात गणेश मूर्तीच्या सोंडेच्या दिशेच्या संदर्भात काही शंका असतात यापैकी एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे गणपतीची सोंड कोणत्या बाजूला असावी?

साधारणपणे सर्व गणपती मूर्ती या डाव्या बाजूच्या सोंडेच्या असतात मात्र अपवादात्मक काही मूर्ती उजव्या सोंडेच्या असतात. याबाबतचे समज अणि शास्त्र यांची चर्चा करण्यापूर्वी या दोन्ही प्रकारचे विनायक कसे असतात याची माहिती घेऊ…

 

 

डाव्या सोंडेचा गणपती

मध्यापासून डावीकडे सोंड वळलेली असते. वाम अर्थात डाव्या बाजूला उत्तर दिशा असते ही बाजू चंद्रनाडीची असल्यानं शितलता देते. उत्तर दिशा अध्यात्माला पूरक आणि मन:शांती देणारी मानली जाते.

 

zeenews.india.com

उजव्या सोंडेचा गणपती

मध्यापासून उजवीकडे वळलेली सोंड असते. (बघणार्‍याच्या डाव्या बाजूला) उजवी बाजू दक्षिण दिशेची मानली जाते. सूर्य नाडी असलेल्या दक्षिण दिशेला यमलोक असतो अशी समजूत आहे.

 

 

असेही चार प्रकार…

सोंडेच्या बाजूनुसार गणेशाचे चार प्रकार ठरतात. गणपतीच्या सोंडेचे अग्र उजव्या त्याच्या उजव्या हाताकडे वळलेले असेल तर तो सिध्दीविनायक मानला जातो, तर सोंड जर डाव्या हाताकडे वळलेली असेल तर ऋध्दीविनायक आणि सोंडेचे टोक त्याच्या उजव्या हाताकडे खाली वळले असेल तर बुध्दीविनायक, डाव्या हाताकडे वळले असल्यास शक्तिविनायक मानला जातो.

सिध्दीविनायक मोक्षसिध्दीप्रद मानला जातो. म्हणूनच काही विशिष्ट सिध्दी किंवा मोक्षसिध्दीच्या हेतूने विनायकाची आराधना करायची असेल तर उजव्या सोंडेचा गणपती पूजला जातो. षोडोपचारे पूजा करत असताना नियम पाळावे लागतात असं मानलं जातं.

 

 

उजव्या सोंडेच्या गणपतीविषयी थोडंसं

उजव्या सोंडेच्या मूर्तीविषयी लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. उजव्या सोंडेचा गणपती कडक असतो का? तो जागृत मानला जातो का? अशी मूर्ती चुकून घरात आली तर तिची प्राणप्रतिष्ठापना करून पूजा करावी का? इत्यादी.

सर्वसाधारणपणे असा समज आहे की उजव्या सोंडेचा गणपती कडक शिस्तीचा असतो. त्याच्या पूजा अर्चनेत नियम न पाळल्यास त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात. ही मूर्ती पूजेत ठेवणार्‍याने विशेष काळजी घ्यायला हवी असं सांगितलं जातं.

-संपूर्णपणे सोवळ्यातच पूजा करावी

– गणेशाचा आवडता रंग लाल असल्याने पूजा करणार्‍यानं लाल वस्त्र परिधान करावे तसे लाल रंगाची फुले मूर्तीवर वाहावी.

 

 

-ज्या घरात उजव्या सोंडेचा गणपती आहे त्या घराचं दार कधीही बंद करु नये.

काही जाणकारांच्या मते, उजव्या सोंडेच्या मूर्तीबाबत भय बाळगू नये. मूर्तीची सोंड कोणत्याही बाजूला असली, तरीही विनायक हा मुळातच दु:खहर्ता असल्यानं तो क्षमाशील आणि दयाळू आहे. भक्तांना कधीच संकटात टाकत नाही, की दु:ख देत नाही.

गणपतीच्या डाव्या हातात मोदक असतो आणि तो खाण्यासाठी त्यानं सोंड डावीकडे केलेली असते तर उजवीकडची सोंड ही आशीर्वाद देत असते.

 

 

थोडक्यात चंद्र-सूर्य आणि अध्यात्म-भौतिक असा भेद सोंडेच्या डावीकडे किंवा उजवीकडे असल्यानं होतो. ज्यांना अध्यात्मिक प्रगती साधायची आहे अशांनी सूर्यप्रभावी प्रतिमेची पूजा करावी. तर ज्यांना भौतिक इच्छा आकांक्षा साध्य करायच्या आहेत अशांनी चंद्रप्रभावी मूर्तीचं पूजन करावं.

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version