Site icon InMarathi

बॉलिवूडच्या या ८ गाण्यांशिवाय गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा होतच नाही!

bollywood songs inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

गणेशोत्सव म्हंटले की आपल्या सर्वांच्या मनात अमाप उत्साह दाटून येतो. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी आपण उत्सुक असतो. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असा हा गणपती! मग त्याचे स्वागत ही असेच धुमधडाक्यात व्हायला हवे.

आपल्याकडच्या चित्रपटसृष्टीने देखील वेळोवेळी आपले बाप्पा प्रेम दाखवले आहे. अनेक हिंदी मराठी चित्रपटात बाप्पावरील गाणी चित्रित झाली आहेत. निरनिराळ्या गणपती मंडळांच्या मंडपात वाजणारी ही गाणी दर्शनासाठी येणार्‍या भक्तांना ताल धरायला लावतात.

अनेक प्रसंगातून, कथेला पुढे येणारे वळण या गणेश गीतांमधून समोर आले आहे. बोलीवूडच्या सलमान खान पासून हृतिक रोशन पर्यंत आणि शाहरुख खानपासून संजय दत्त ते वरुण धवन असे अनेक आघाडीचे नायक या गणेश गीतांमध्ये दिसले आहेत.

 

 

शब्द, संगीत आणि चित्रपटातील सिच्युएशन यांमुळे ही गाणी गणेशोत्सवात चार चाँद लावतात आणि आपला फेस्टिव मूड द्विगुणित करतात. हा उत्साह वाढवण्यास बॉलिवूडमधील काही गाणी कारणीभूत आहेत.

१९७८ साली आलेल्या ‘अष्टविनायक’ या सिनेमातील ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ हे गाणे आजही या गणेश गीतांमध्ये ‘एक’ नंबरला आहे. अवधूत गुप्ते यांच्या ‘मोरया’ चित्रपटातील ‘हे लंबोदर गजमुख मेरे मोरया’ ही कव्वाली असो की ‘उलाढाल’ चित्रपटातील ‘मोरया मोरया ‘ या सगळ्या गाण्यांवर पाऊले थीरकणार नाहीत असे होणारच नाही.

 

हिंदी सिनेमाही याला अपवाद नाही. अनेक सिनेमांमधून बाप्पाची गाणी आपल्या भेटीला येतात. १९५१ सालचा ‘गणेशजन्म’ हा चित्रपट असो की की १९७९ साली आलेला ‘हमसे बढकर कौन’ या सिनेमातील ‘देवा हो देवा गणपति देवा’ हे गाणे या सार्‍याच गणेशगीतांनी आपले उत्सवाचे रंग खुलवले आहेत.

आजही सिनेमामधील काही गाण्यांची गणेश उत्सवात धूम असते त्यात प्रामुख्याने ही गाणी आहेत.

१. ढगाला लागली कळ – ड्रीम गर्ल :

 

 

ढगाला लागली कळ या मूळच्या मराठी गाण्याची प्रेरणा घेऊन आयुष्मान खुराना, नुशरत बारूचा, रितेश देशमुख यांच्यावर चित्रित ड्रीम गर्ल सिनेमातील हे गाणे ऐकल्यावर तुम्हाला देखील या बीटवर नाचण्याचा मोह आवरणार नाही.

मीत ब्रदर्स, मिका सिंग, ज्योतिका तांग्री यांनी गायलेले हे गाणे गणेश उत्सवात लोकप्रिय ठरले आहे.

२. गणपती बाप्पा मोरया – दर्द का रिश्ता :

 

 

आजच नाही तर गणेश चतुर्थीचा उत्सव बॉलीवूडमध्येही ७० च्या दशकापासून प्रिय आहे. १९८२ साली अभिनेता सुनील दत्त यांच्या सिनेमातील ‘गणपती बाप्पा मोरया’ हे गाणे आजही मनाला भिडते. हरीहरन यांनी गायलेले हे गाणे सुनील दत्त यांच्यावर चित्रित झाले होते.

कॅन्सरशी लढणार्‍या आपल्या आजारी मुलीच्या भवितव्याच्या चिंतेने घेरलेला पिता विसर्जनासाठी घेवून जाणार्‍या गणेशाला आपल्या मुलीच्या आयुष्यासाठी साकडे घालतो.

अतिशय हृदय हेलावून सोडणार्‍या या कथेतील ‘ गणपती बाप्पा मोरया’ हे गाणे आजवरच्या गणेश गीतांमध्ये वेगळे ठरले आहे.

३. देवा श्रीगणेशा – अग्निपथ :

 

 

संगीतकार अजय-अतुल यांनी कंपोज केलेले, अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिलेले अग्निपथ चित्रपटातील ‘देवा श्रीगणेशा’ हे गाणे गणेश भक्तांच्या पसंतीचे गाणे अजय गोगावले याने गायले आहे आणि हृतिक रोशन या अभिनेत्यावर चित्रित केलेले आहे, जे अतिशय श्रवणीय आणि थक्क करायला लावणारे आहे.

४. साड्डा दिल वी तू – ABCD :

 

 

एनी बडी कॅन डांस या सिनेमातील हे गाणे एक प्यूअर डांस नंबर आहे. सिनेमाचा क्लायमॅक्स असलेले हे गाणे ऐकताना कधी पावले ताल धरतात कळतच नाही. गायीका हार्ड कौर हिने गायलेले हे गाणे, गणपती आरतीच्या फ्यूजनमुळे अतिशय उत्साहवर्धक झाले आहे. जे गणेशाला समर्पित आहे.

५. तेरा ही जलवा – वॉन्टेड :

 

 

जवळपास सगळ्याच गणपती मंडपात वाजवले जाणारे हे गाणे जरी भक्तीगीत नसले तरी पावले थीरकायला लावणारे नक्कीच आहे. वॉन्टेड सिनेमातील गणेश विसर्जनाच्या गाण्यात आपल्याला अभिनेता सलमान खान या गाण्यावर आपल्या युनिक डांस स्टेपवर थीरकताना दिसतो.

६. गजानना – बाजीराव मस्तानी :

 

 

गिनेज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवले गेलेले हे गणेश गीत खूपच रोमांचक आहे. हे गाणे लाँच करताना चित्रपटाच्या निर्मात्यांनी मानवी साखळीद्वारे गणेशाचे प्रचंड मोठी मोझ्येक इमेज साकारली होती.

७. बाप्पा – बेंजो :

 

 

रितेश देशमुख याच्या बेंजो या सिनेमातील विशाल ददलानी याने गायलेले गाणे उत्कृष्टरित्या चित्रित झाले आहे. रितेशचा लुक आणि त्याच्या हातांवर साकारलेली गणेश आकृती यांमुळे गाणे चर्चेत आहे.

रॉक आणि गणेश आरती यांचे फ्यूजन असलेले हे गाणे तुम्हाला त्याच्या तालावर नक्कीच नाचवेल.

८. मोरया रे – डॉन :

 

 

डॉन चित्रपटातील डॉन शाहरुख खान याच्यावर चित्रित गाणे फेस्टिव्हल मूड वाढवणारे आहे. गणपती विसर्जनाच्या वेळचे हे गाणे भक्तांना उत्साहित करणारे आहे.

शंकर महादेवन यांनी गायलेले आणि मुंबईच्या विसर्जन मिरवणुकीत चित्रित झालेले हे गाणे प्रत्येकाच्या मनातील बाप्पा विषयीचे प्रेम दाखवते आणि एकतेची भावना वाढवते.

मित्रांनो येत्या गणेशोत्सवात ही गाणी ऐका, पहा आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या सोबतीत हा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version