' अष्टविनायकांपैकी या एका मंदिरात तब्बल १८९२ पासून अखंड तेवणारा नंदादीप आहे! – InMarathi

अष्टविनायकांपैकी या एका मंदिरात तब्बल १८९२ पासून अखंड तेवणारा नंदादीप आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महाराष्ट्रासोबतच भारतात प्रसिद्ध असणारे अष्टविनायक ही भाविकांची श्रद्धास्थानं असून त्याला एक विशेष महत्व आहे. महाराष्ट्रातील या विशिष्ट ८ गणेश मूर्तींना ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. या अष्टविनायकांच्या इतिहास, आख्यायिका प्रसिद्ध आहेत. यातल्याच चौथा गणपती म्हणून ओळखला जाणाऱ्या महडचा वरदविनायकचा इतिहास जाणून घेऊया.

 

ashtvinayak inmarathi

 

अष्टविनायकांपैकी एक असणारे हे देऊळ रायगड जिल्ह्यात येते. या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा पेशवेकालीन असून तो हेमाडपंथी आहे. हा गणपती पुरातनकालीन आहे असे सांगितले जाते. येथील गणेशाचे असणारे रूप हे समृद्धी व यश देणारे आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

ही मूर्ती स्वयंभू असून ती धोंडू पौढकर यांना ती जवळच्याच तलावात १६९० साली सापडली. १७२५ साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी महड हे गाव वसवले आणि त्याठिकाही देऊळ उभारले. 

 

temple inmarathi 2

 

८ फूट बाय ८ फूट असलेल्या हा देवळाला २५ फूट उंचीचा कळस आहे. हा कळसाचा भाग सोन्याचा आहे. या मंदिराच्या चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्ती आहेत.  येथील पूर्वाभिमुख असलेल्या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो असे म्हणतात की हा दिवा १८९२ सालापासून तसाच पेटता आहे.

 

ganpati 1 inmarathi

 

 

पुरातन काळात महडचे नाव मणिभद्र किंवा मणिपूर होते. येथे एक अशी आख्यायिका सांगितली जाते की, गृत्समद ऋषींनी या गणपतीची स्थापना केली. वचकनवी नावाचे ऋषी होते. एकदा त्यांच्या आश्रमाला राजा रुक्मांगदाने भेट दिली. त्यावेळी ऋषीपत्नी त्याच्या रूपावर मोहित झाली. तिने त्याला आपल्या आश्रमात बोलावले मात्र त्याने तिकडे जाण्यास नकार दिला. हे जेव्हा इंद्रदेवाला कळले तेव्हा त्याने रुक्मांगदाचे रूप घेऊन तिचा उपभोग घेतला.  ऋषीपत्नी मुकुंदा हिला इंद्रापासून पुत्र झाला ज्याचे नाव गृत्समद.

 

ganpati 2 inmarathi

 

त्याला अनौरस पुत्र म्हणून हिणवले जाऊ लागले या रागातून त्याने आपल्या आईला ‘तू बोरीचे झाड होशील’ असा शाप दिला. परंतु आपण आपल्याच आईला शाप दिला याचा प्रायश्चित म्हणून गृत्समद ऋषींनी मणिभद्र येथील जंगलात ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राच्या जपाने अनेक वर्ष तपश्चर्या केली.

त्यांची ही तपश्चर्या पाहून गणपती प्रसन्न झाले आणि त्यांनी गुत्समद यांना वर मागायला सांगितले. त्यावर त्यांनी स्वतःची शुद्धी, आपल्या तपश्चर्येच्या स्थानी देवाने कायमचे वास्तव्य करावे असे सांगितले. त्यानुसार श्रीविनायकांनी हे दोन्ही वर मान्य केले व या अरण्यात स्थिर झाले. ते अरण्य म्हणजेच महड. त्यामुळे या स्थानाला फार महत्व आहे.

 

temple 3 inmarathi

 

या देवळाला पेशव्यांनी बरीच मदत केली आहे. या मंदिराच्या घुमटावर वरच्या बाजूस नागाची नक्षी आहे. पाठीमागे तळे आहे. आतील बाजूस सभामंडप आहे. दोन्ही बाजूस कोनाड्यात गणपतीच्या मूर्ती आहेत. प्रवेश करताना वरच्या बाजूलाही गणेशाची मूर्ती दिसते. ही मूर्ती दगडी महिरपी नक्षीदार सिंहासनावर

विराजमान झालेली आहे. या मूर्तीची सोंड डावीकडे झुकलेली आहे. इतर अष्टविनायक स्थानांप्रमाणेच येथेही उत्सव होतात. माघमधील चतुर्थीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात होतो.

 

ganpati 3 inmarathi

 

 

देवस्थानाकडून राहण्याची, भोजनाची व्यवस्था होते. देवस्थानाला प्रथम छत्रपती शाहू महाराजांनी पहिली सनद करून दिली. येथे येण्यासाठी मुंबई- पुणे रस्त्याने खोपोली एस. टी. स्थानकाच्या अलीकडे उजव्या हातास महडकडे जाण्याचा फाटा लागतो. एस.टी. ने गेल्यास पुणे- ठाणे गाडीने मुख्य रस्त्यावरच महडच्या फाट्यापाशी उतरावे. पुणे ते महड हे अंतर ८४ किलोमीटर आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?