Site icon InMarathi

सलमानने चिडून, पुण्यातील एका गेमिंग कंपनीला थेट कोर्टात का खेचलय? जाणून घ्या

salman court inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

तीन वर्षांपूर्वी प्रवीण तरडे यांचा मुळशी पॅटर्न सिनेमा येऊन गेला, सिनेमाला अ दर्जा मिळून सुद्धा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता याच चित्रपटाचा हिंदी रिमेक येत आहे, नुकताच सिनेमाचा ट्रेलर कालंच लाँच झाला. तो ट्रेलर बघून अनेकांनी टीकात्मक  प्रतिक्रिया व्यक्त करायला सुरवात केली आहे.

 

 

तद्दन व्यावसायिक सिनेमाला हवे तसे संवाद, कलाकारांची चोख कामे, समाजातील ज्वलंत विषयाला हात घालणे या सगळ्यांची उत्तम सांगड असलेला मुळशी पॅटर्न आता हिंदीत अंतिम या नावाने येत आहे. महत्वाचे म्हणजे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे सलमान खान. त्यामुळे साहजिकच प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे. पण सध्या सलमान एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

 

 

सलमानच आयुष्य तसं वादग्रस्त आहेच, अनेक समाजमाध्यमांनी त्याची प्रेमप्रकरणं छान फुलवून दाखवली होती. आता तीच प्रकरण एका गेममध्ये आली आहेत काय आहे नक्की प्रकरण जाणून घेउयात..

नक्की काय आहे प्रकरण? 

सोशल मिडीयावर अगदी मोदींपासून ते सलमान खान पर्यंत सगळ्यांची खिल्ली उडवली जाते. सलमानला सोशल मीडियावर सेलोमन भाई या नावाने सुद्धा बोलले जाते. याच नावाचा फायदा घेऊन पुण्याच्या पॅरोडी स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने सेलोमन भाई नावाचा गेम तयार केला, ज्यात सल्लू भाईच्या आयुष्यातील ज्या महत्वाच्या घटना आहेत जस की, दारू पिऊन गाडी  पादचाऱ्यांना उडवणे, हरणाची शिकार, ऐश्वर्यासोबतच प्रेमप्रकरण या सर्व गोष्टी गेममध्ये काही लेव्हल मध्ये समाविष्ट केल्या होत्या. 

 

 

 

आज सोशल मीडियावरून काही नामंकित व्यक्तींना कायमच ट्रोल केले जाते, त्या व्यक्ती अशा ट्रोलिंगला भीक देखील घालत नाही मात्र आपल्या खाजगी आयुष्याचे असे वाभाडे काढणाऱ्या खेळाबद्दल आपला दबंग सल्लू भाई शांत कसा बसेल, त्याने लगेचच कोर्टात धाव घेतली आणि गेम बनवणाऱ्या कंपनी विरोधात केस दाखल केली.

 

 

कोर्टाचे काय म्हणणं आहे? 

‘प्रथमदर्शी या खेळाचे एकूण स्वरूप बघता हा सलमान खान यांच्या आयुष्याशी निगडित आहे असं दिसून येत आहे. यात सलमानच्या हिट अँड रन या केसचा देखील उल्लेख आहे’. तसेच सलमान खानने या गेमच्या निर्मितीसाठी कोणतीच परवानगी दिली नव्हती त्यामुळे गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन झालं आहे, त्याचबरोबरीने त्यांची प्रतिमा देखील खराब झाली आहे.

 

 

कोर्ट पुढे असेही म्हणाले, ‘कंपनीने सलमानच्या लोकप्रियतेचा आणि ओळखीचा वापर हा आर्थिक फायद्यसाठी केला गेला आहे. तसेच कंपनीने या संबंधित कोणत्याही प्रकारचं प्रसारण अथवा पुनरुत्पादन करू नये. हा गेम प्ले स्टोअरवरून काढून टाकण्याचे आदेश देखील दिले आहेत’. 

 

 

आज लोकांना काय आवडतं यावरून निर्माते आपलं प्रॉडक्ट बाजारात आणतात. लोकांना साधं सरळ सोप्या गोष्टी आवडत नाहीत तर लोकांना मसाला लागतो, असा मसाला मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे बॉलीवूड सेलिब्रिटी. सलमान खान संजय दत्त ही नावं तर अगदी कायमच चर्चेत येत असतात. त्यांच्या आयुष्यातील चढउतार बघायला लोकांना आवडतं आणि एकीकडे सामाजिक विषयांना हात घालणारे सिनेमे मात्र मागेच पडत राहतात.

मध्यंतरी मराठीतल्या उमेश कामात या अभिनेत्याने देखील एका हिंदी चॅनेलच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. ‘आपल्या नावाचा आणि ओळखीचा चुकीचा वापर केला गेला आहे ज्यातून आपली प्रतिमा मालिन झाली आहे’, असे थेट आरोप त्याने केले होते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version