आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
मराठी भाषा आणि भाषेचा गोडवा याविषयी आपण नेहमीच ऐकतो, बोलतो, वाचतही असतो. मराठी भाषा वळवावी तशी वळते, असं म्हणतात. मग दादा कोंडकेंसारखी एखादी व्यक्ती त्याचा वापर द्व्यर्थी संवाद आणि गाणी लिहिण्यासाठी करते, किंवा ‘चला हवा येऊ द्या’सारख्या एखाद्या कार्यक्रमात बाष्कळ विनोद करण्यासाठी त्याचा वापर होतो!
शब्दांपेक्षा चित्र अधिक बोलकी असतात असंही म्हणतात. यातही खोटं किंवा चुकीचं असं काहीच नाही. एखादा फोटो किंवा पेंटिंग, साधंसं चित्र सुद्धा अनेकदा फार संवाद साधून जातं.
हीच कशीही वळणारी मराठी भाषा आणि चित्र, फोटो यांचा अप्रतिम वापर करून सध्या काही धमाल इमेजेस बनवण्यात येत आहेत. चित्रांचा गमतीशीर वापर करून विनोदी पद्धतीने सांगितले किंवा ‘दाखवले’ जाणारे हे ‘मराठी वाक्प्रचार’ सध्या तुफान व्हायरल झाले आहेत.
चला तर मग असेच काही जबरदस्त वाक्प्रचार चित्ररूपात बघुयात…
फोटो पाहून बुचकळ्यात पडलात ना? अहो हेच तर सांगायचं आहे या इमेजला, ‘बूच कळ्यात पडणे’… आहे की नाही मंडळी गंमत!
काय म्हणताय परिस्थिती ‘बिकट’ आहे? मग हा खालचा फोटो सुद्धा बघाच!
याच बिकट परिस्थितीत आणखी काही गंमती शिकुयात… हे खालचे दोन फोटोज पहा, आणि बघा बरं काही अंदाज बांधता येतोय का?
हे वरचे दोन वाक्प्रचार कळले का मंडळी? नाही? मग खाजवा की जरा डोकं… तरीही नाही? मग ऐका;
त्या भांड्यात आहे ताक, थोडक्यात ‘ताकास तूर लागू न देणे’! दुसऱ्या इमेजमध्ये ‘हातावर तुरी देणे’ असं म्हटलं गेलंय. तूर वापरून तयार केले गेलेले वाक्प्रचार, खूप असतील. तशाच इमेज सुद्धा खूप बनल्यात… त्यातलीच ही एक झलक होती. अशाच अजून गंमती बघूया.
या creativity बद्दल वेगळं सांगायची गरज आहे का? असेल तर तुम्ही साधे-सुधे नाही आणि वीट आणणारे आहात.
व्हायोलिन कानाखाली ठेऊन वाजवलं जातंय आणि म्हणतायत काय, तर कानाखाली वाजवणे. आहे की नाही हे भन्नाट!
यात हा खास बॉलिवूडचा टच सुद्धा दिला गेलाय. जुन्या चित्रपटांचे आणि अभिनेत्यांचे फॅन्स असाल, तर ‘प्राण कंठाशी येणे’ हा वाक्प्रचार तुम्ही नक्कीच वाचलं असेल.
‘स्त्री दोन जीवांची असणं’ हे तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. पण दोन जीवांच्या स्त्रीचा फोटो, ‘जीवात जीव येणे’ अशा अर्थाने वापरला जाऊ शकतो, असा विचार तुम्ही कधी केला होतात का?
ही अशी कल्पनाशक्ती बघून त्यांचं कौतुक करायचं, की ‘उचलबांगडी करायची’ हे आता तुम्हीच ठरवा!
हा फोटो बघून CID च्या चाहत्यांवर तुम्हाला ‘दया आली’ असेल नाही का?
हे दोन वाक्प्रचार पाहून तुम्हाला गहिवरून आलंय की वैतागाने नाकी नऊ आलेत, सांगा बरं?
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.