Site icon InMarathi

भारताच्या मदतीने अमेरिकेमध्ये उभा राहतोय जगातील सर्वात मोठा टेलीस्कोप!

tmt-marathipizza00

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

अमेरिका म्हणजे तंत्रज्ञानदृष्ट्या जगातील सर्वात प्रगत देश! जगातील कोणताही काम असो मग ते या देशासाठी अशक्य आहे असे होणे नाही. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल आणि अभिमान देखील वाटेल की जगातील सरत मोठा टेलिस्कोप याच अमेरिकेमध्ये उभा राहतोय आणि हा प्रकल्प पूर्ण करण्यात भारताचे योगदान मोलाचे ठरणार आहे.

en.wikipedia.org

अमेरिकेच्या हवाई मध्ये तब्बल ३० मीटर उंच हा जगातील सर्वात मोठा टेलिस्कोप स्थानापन्न होणार आहे. म्हणूनच या टेलिस्कोपला Thirty Meter Telescope (TMT) असे नाव देण्यात आले आहे.

सध्याचा जगातील सर्वात मोठा टेलिस्कोप १० मीटरचा आहे. सामान्य टेलिस्कोपच्या तुलनेमध्ये हा टेलिस्कोप तीन पट जास्त कार्यक्षम असून हा टेलिस्कोप लावण्यासाठी हवाई मधील Mauna Kea या जागेची निवड करण्यात आली आहे.

adaptiveoptics.org

हा टेलिस्कोप लावण्यासाठी अश्या डोंगराचा शोध घेतला जात होता ज्याच्या माथ्यावर ढग जमा होत नाही. २१७ फुटाचा खंदक खणून त्यामध्ये हा टेलिस्कोप बसवला जाईल.

फक्त भारत आणि अमेरिकाच नाही, तर चीन, कॅनडा आणि जपान या देशांनी देखील या प्रकल्पामध्ये आपला खारीचा वाटा उचलला आहे. या टेलिस्कोपच्या उभारणीसाठी आणि संपूर्ण प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी १.४२ बिलियन डॉलरचा खर्च अपेक्षित आहे. भारताच्या योगदानाशिवाय हा प्रकल्प पूर्ण करणे अशक्य असल्याचे म्हणणे प्रकल्पाशी निगडीत सर्वच अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. भारत या जगातील सर्वात मोठ्या टेलिस्कोपमधील सर्वात महत्त्वपूर्ण भागाची निर्मिती करणार आहे.

tmt.org

येणाऱ्या काळात हा Thirty Meter Telescope (TMT) ऑनलाईन आणण्याचा भारताचा मानस असून त्यासाठी भारतातील तब्बल ३०० खगोलशास्त्रज्ञांची मेहनत कामाला येणार आहे.

या संपूर्ण प्रकल्पाची माहिती देणारा हा व्हिडियो हौश्यांनी नक्की पहा!

येणाऱ्या काळात अवकाश संशोधनामध्ये नव नवीन रहस्यांची उकल करण्यामध्ये हा टेलिस्कोप महत्त्वपूर्ण कामगिरी बजावण्याची आशा आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version