Site icon InMarathi

…म्हणून पुणे आहे मुंबई-बँगलोरपेक्षा वरचढ! कौशल इनामदारांनी सांगितली ‘चोरीची गोष्ट’!

kaushal inamdar featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

सोशल मीडियाच्या माध्यमातून कधी कुठल्या गोष्टी कशाप्रकारे समोर येतील याला काही नेम नाही. विशेषतः फेसबुक आणि ट्विटरवर आपले अनुभव सांगणारी अनेक मंडळी पाहायला मिळतात. ते वाचताना इतरांच्या सुद्धा काही आठवणी उफाळून येतात आणि मग सुरुवात होते आपले अनुभव सांगायला…

असंच काहीसं संगीतकार कौशल इनामदार यांच्या बाबतीत सुद्धा झालं आहे. ट्विटरवर पाहिलेलं एक ट्विट आणि त्यामुळे त्यांना आठवलेला हा किस्सा फारच मजेशीर आहे. ‘पुणे तिथे काय उणे’ ही उक्ती सार्थ ठरवणारी ही एका चोरीची गोष्ट तुम्ही वाचायलाच हवीत…

 

 

त्यांनी ही गोष्ट का सांगितली, त्याची पार्श्वभूमी काय, हे आधी आपण पाहुयात… तर, झालंय असं की मेहुल शर्मा नावाच्या एका व्यक्तीने एक ट्विट केलं. ज्याचा आशय साधारण असा होता, की स्विगीचे सीइओ ही अत्यंत नम्र व्यक्ती आहे.

 

 

हे असं फक्त बँगलोरमध्ये होऊ शकतं असं वाचल्यानंतर, मुंबईकरांचा इगो दुखावला गेला नसता तरच नवल! यावर उत्तर म्हणून एक मजेशीर किस्सा ट्विट केला गेला. तोही एकदा बघाच.

 

 

हे वाचल्यानंतर, कौशल इनामदार यांना ही ‘चोरीची गोष्ट’ आठवली जी त्यांनी ट्विटर थ्रेडच्या माध्यमातून सांगितली आहे. चला तर, बघुयात काय आहे ही गोष्ट!

 

 

ही गोष्ट पुण्यातली आहे. कौशल यांच्या भावाच्या मित्राच्या घरात चोरी झाली. रीतसर FIR केला गेला. आणि त्यानुसार काही दिवसांनी त्यांना कळवण्यात आलं, की चोर पकडला गेला आहे. त्यांनी पडताळणीसाठी पोलीस ठाण्यात उपस्थित राहावं.

 

===

===

त्या व्यक्तीचा उल्लेख कौशल इनामदार यांनी मित्र असाच केलाय बरं का!

तर मंडळी हा मित्र पोलीस स्टेशनला पोचला तेव्हा त्याला सांगण्यात आलं, की ‘मोठे साहेब’ येईपर्यंत त्याला वाट पाहावी लागेल. ते मुकाट्याने एका बाकावर जाऊन बसले, जिथे आधीच एक व्यक्ती बसली होती.

 

 

थोडा वेळ गेला आणि मग त्या व्यक्तीने संवाद सुरु केला. या संवादाचा रोख वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटणार आहे. थोडक्यात, दिल थाम कें बैठिये!

 

 

या सगळ्या औपचारिक प्रक्रियेसाठी पोलीस लावत असलेला वेळ त्रासदायक असतो, याविषयी मित्राच्या शेजारी बसणारी व्यक्ती तक्रार करत होती.

ही तक्रार अगदीच चुकीची होती अशातला भाग नाही, पण ती व्यक्ती नेमकी कोण होती आणि पुढे जे काही घडलं ते पुणं किती भन्नाट आहे, हे सांगण्यासाठी पुरेसं आहे असं म्हणता येईल.

 

 

“तुमच्याही घरी चोरी झाली आहे का?” असा प्रश्न मित्राने करताच, “नाही” असं उत्तर देणाऱ्या त्या व्यक्तीने “मीच तुमच्या घरी चोरी करणारी व्यक्ती आहे”, असं सांगितलं. बरं एवढं सांगून तो थांबला नाही बरं! “देवा शपथ या पोलिसांपेक्षा मीच तुम्हाला कमी वेळात तुमचं सामान परत केलं असतं. हे आपला खूपच वेळ घालवत आहेत.” असं बोलून मोकळा झाला.

===

===

 

यातही काहीसाच वेळ गेला असेल, आणि मित्र, चोर आणि तिथे उपस्थित असणारा कॉन्स्टेबल चक्क एकत्र चहा प्यायला बसले होते. थोडक्यात काय, तर पुणेकरांनी बँगलोर आणि मुंबईकरांवर कडी केली. म्हणूनच तर म्हणतात, “पुणे तिथे काय उणे?”

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version