आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
लेखक : चेतन दीक्षित
===
स्थानिक, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय राजकारणात एक गोष्ट मात्र नेहमीच सिद्ध होत आली आहे, ज्यातून वातावरण खराब करायचा मक्ता घेणाऱ्यांनी फार काही बोध घेतला असल्याचे चित्र नाही. ती म्हणजे, भस्मासुरला जन्म घालणाऱ्यावरच भस्मासूर उलटलाय.
हिटलरला जन्माला घातलेल्या जर्मनीला दर्दनाक परिणामाला सामोरे जावे लागले. अमेरिकेनेच लादेन आणि जागतिक इस्लामिक दहशतवादाला खतपाणी घातले.
आज त्यांची नामुष्की ऐतिहासिकरीत्या जगजाहीर आहे. ज्या काँग्रेसने गांधींना डोक्यावर घेऊन काँग्रेसपक्ष गांधींनाच आंदण म्हणून दिला त्याच गांधी घराण्याचे राहुल गांधी त्याच काँग्रेसच्या मुळावर उठलेत. आता अशीच अवस्था पाकिस्तानची होण्याचा संभव आहे.
भारतापासून फुटल्यानंतरसुद्धा पाकिस्तानची हिरवी डुकरं सतत सीमेवरील आणि देशातील फुटीरतावादी लोकांना हाताशी धरून भारत तोडायचा अयशस्वी प्रयत्न करत असतात. तो पाकिस्तानच आता फुटतो आहे काय, अशी अवस्था आहे.
–
- तालिबानचा उदय! धोक्याची घंटा! भारतीयांनो सावध व्हा, अन्यथा…
- पाकिस्तानचं संविधान लिहिणाऱ्याचा गूढ अंत ठरला पाकिस्तानच्या भविष्याचा कर्दनकाळ!
–
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेला ड्युरँड रेषा म्हणतात, जी २६७० किलोमीटर लांब आहे. १८९३ साली सर हेन्री मोर्टिमर ड्युरँड आणि अफगाणिस्तानचा राजा अमीर अब्दुल रहमान ह्यांनी तत्कालीन ब्रिटिशव्याप्त भारत, अफगाणिस्तान आणि बलुचिस्तान यांच्या सीमारेषा निश्चित करण्यासाठी हा करार केला होता ज्यावर बलुचिस्तानची सहीच नाहीये. इथूनच जबरदस्त मनोरंजनास प्रारंभ होतो.
या सीमेच्या दोन्ही बाजूला पश्तून लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे. पश्तून म्हणजे अफगाणी लोकं. ज्याप्रमाणे भारतातील सीमेवर राहणारे पाकिस्तानी लोकं पाकिस्तान आणि काश्मीर मधली सीमा मानत नाहीत, त्याप्रमाणे हीच पश्तुनी लोकं ड्युरँड सीमा मानत नाहीत. आहे की नाही अजून गंमत?
ज्याप्रमाणे देशाच्या विभाजनाची कल्पना पाकिस्तानी हरामखोरांना मान्य नव्हती ज्यात काश्मीर भारतात राहिला, त्याप्रमाणे पश्तुनी लोकं मानतात की ब्रिटिशांनी मनमानी पद्धतीने ही सीमा आखली आहे.
त्यामुळे सत्तेत कोणीही असो, अफगाणीसत्तेने या रेषेचा मान कधीच ठेवला नाही. आणि त्यात जेंव्हापासून हक्कानींची नजर या भागावर पडली, पाकिस्तानचे मजबूत लागतील अशी आशा आहे.
आता हे हक्कानी कोण आहेत? अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी रशियाच्या विरोधात लढायला ज्या नेटवर्कला पाठिंबा आणि मदत दिली ते हे हक्कानी नेटवर्क. त्याच अमेरिकेच्या ओबामाने या समूहाला दहशतवादी म्हणून नंतरच्या काळात घोषित केले.
याच हक्कानी ग्रुपमुळे अमेरिकेची अफगाणिस्तानात कुठलीच डाळ शिजली नाही, अशीही एक वदंता आहे. तर याच दहशतवादी हक्कानी नेटवर्कला हाताशी धरून पाकिस्तानला अफगाणिस्तानावर वर्चस्व गाजवायचं होतं कारण या हक्कानी नेटवर्कची सर्व ट्रेनिंग सेंटर्स, महत्वाची कार्यालये पाकिस्तानात आहेत.
त्यांना पाकिस्तानचे सर्व बाजूने सहकार्य मिळत असते. थोडक्यात पाकिस्तानने त्यांना पोसलंय.
“जिथे पश्तुनी लोकसंख्या जास्त तिथे पश्तुनी लोकांचं वर्चस्व असायला पाहिजे”, तालिबान आणि हे हक्कानी नेटवर्क याच भावनेला खतपाणी घालत आहे. हक्कानी नेटवर्कचा सुद्धा या सीमारेषेला आणि पाकिस्तानने तिथे बांधलेल्या कुंपणाला विरोध आहे.
याच आठवड्यात तालिबानचा प्रवक्ता झबीउल्लाह मुजाहिदने हे स्पष्ट केले आहे की, ‘नवीन अफगाण सरकार या मुद्द्यांवर त्यांची भूमिका स्पष्ट करेल. पण त्यांची अशी धारणा आहे कि या रेषेमुळे बऱ्याच कुटुंबांमध्ये अंतर पडलं आहे आणि अश्या सीमेची त्यांना गरज वाटत नाही..’ त्यांचे हेतू स्पष्ट आहेत, एकदा का अफगाणिस्तानात सरकार स्थापन झाले की या ड्युरँड सीमेवरून एक रक्तरंजित खेला होबे निश्चित आहे.
नुसता हाच मुद्दा नाही तर या सीमेलगत असणारा वजिरीस्तान नावाचा डोंगराळ मुलुख, जो सध्या पाकिस्तानात आहे तो अफगाणिस्तानात न्यायचा हक्कानी नेटवर्कचा हेतू आहे.
भारतातील तुकडे तुकडे गॅंगला समर्थन आणि रसद पुरवता पुरवता खुद्द पाकिस्तानच पुन्हा एका फाळणीच्या उंबरठ्यावर आहे हे मात्र नक्की!
–
- तालिबान्यांच्या खुनशी प्रवृत्तीला चीन घालतंय खतपाणी, थरकाप उडवणारं वास्तव!
- तालिबानचं भारतीय कनेक्शन!
–
यात अजून एक मज्जा आहे. या ड्युरँड सीमेचा एक मोठा भाग बलुचिस्तानने सुद्धा व्यापला आहे, जो पाकिस्तानने बळकावलेला आहे आणि जिथे पाकिस्तानविरोधात मजबूत जनमत तयार होत आहे. हा बलुचिस्तानसुद्धा या ड्युरँड सीमेला समर्थन देत नाही, कारण त्या ड्युरँड करारात जरी त्यांच्या समावेश असला तरी त्यांना अजिबात विचारात घेतले गेले नव्हते आणि मुळात त्यांची यावर सहीच नाहीये.
त्यामुळे इकडून बलुचिस्तान आणि तिकडून हक्कानी प्रणित अफगाणिस्तान यांच्या संघर्षात पाकिस्तानचा तुकडा पडणार हे मात्र निश्चित..
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.