या मराठमोळ्या व्यावसायिकाची गगनभरारी, खुद्द फोर्ब्सने घेतली दखल!!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
‘मराठी माणसू धंदा करू शकत नाही’, त्यातल्या त्यात तुम्ही जर सर्वसामान्य घरातून आले असाल तर मग शिक्षण झाल्या झाल्या थेट नोकरी हाच एका पर्याय समोर असतो. मोदींनी काही वर्षांपूर्वी मेक इन इंडियाचा नारा दिला, त्यानंतर अनेकजण सुखावह असलेली नोकरी सोडून धंद्यात आले, नुकतेच पास आऊट झालेले विद्यार्थ्यांनी आपापल्या करियरनुसार नवे नवे स्टार्टअप्स सुरु केले.
मागच्या वर्षी आलेल्या कोरोनामुळे तर अनेक मोठमोठाले उद्योगधंदे बंद पडले, पर्यटन, चित्रपटसृष्टी, मॉल, दुकाने या सगळ्या घटकांवर याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर झाला. आता हळूहळू हे घटक रुळावर येत आहे तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती आहेच…
सध्या एकूणच महाराष्ट्र्रातील वातावरण बघता एका सुखद बातमी आपण सगळ्यांनीच ऐकली असेल ती म्हणजे पुण्यातील आनंद देशपांडे या व्यावसायिकाची दखल चक्क फोर्ब्सने घेतली आहे, चला तर मग जाणून घेऊयात त्यांचा प्रवास…
कोण आहेत आनंद देशपांडे :
मूळचे भोपळचे असलेले आनंद, पेशाने इंजिनियर आहेत. आयआयटी सारख्या नामांकित कॉलेजमधून त्यांनी इंजिनीरिंगची पदवी मिळवली आज भारतातून अनेक विद्यार्थी जसे परदेशात नोकरी किंवा पुढील शिक्षणासाठी जातात तसेच आनंद यांनी देखील शिक्षणानंतर थेट परदेशात नोकरी करण्याचा निर्धार केला होता.
तो काळ होता ऐंशी, नव्वदच्या दशकातला, त्याकाळात महाराष्ट्रातून, भारतातून अनेक तरुण विद्यार्थी ‘आपल्या कुवतीचा योग्य वापर केला गेला नाही’ या कारणामुळे परदेशात निघून गेले, काही तरुण असेही होते ज्यांना पाहिल्यापासूनच परदेशात जायची इच्छा होती.
आयआयटीमधून पास आउट झाल्यानंतर चांगल्या पगाराची अपेक्षा ठेवणे हे साहजिकच आहे. परदेशात उत्तम पगाराची नोकरी मिळेल या आशेवर आनंद अमेरिकेत गेले. तिथे त्यांना एचपी कंपनीत नोकरी देखील मिळाली, मात्र ते वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी पुन्हा एकदा मायदेशी परतले.
पर्सिस्टंन्सची सुरवात :
आज कोणत्याही सामान्य घरात मुलाने जर नोकरी सोडून व्यवसाय करतो असे बोलून जरी दाखवले तरी त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करतील. त्याकाळात तर नक्कीच झाले असतील, नव्वदच्या दशकात व्यवसाय करण्याचं धाडस दाखवणे हे ही कौतुकास्पद आहे.
–
- बहुतेक मराठी नव-उद्योजक फक्त ह्या एका कारणामुळे अपयशी होतो…
- एका मारवाडी कुटुंबाने सुरु केला अस्सल मराठी मसाल्यांचा व्यवसाय…
–
१९९० साली त्यांनी पुण्यात पर्सिस्टंन्स नावाने कंपनीचा श्रीगणेशा केला. सुरवातीला कंपनीला आर्थिक पाठबळ पुरवले ते आनंद यांच्या वडिलांनी आणि मित्रांनी तसेच त्यांनी अमेरिकेत कमावलेल्या रकमेतून, एकूण २१ हजार डॉलर्स उभे केले.
पर्सिस्टंन्स नेमकं काय करते?
आज तंत्रज्ञान दिवसेंदिवस बदलत आहे, डिजिटल क्रांतीमुळे तर आजकाल रोजची कामं देखील सोपी झाली आहेत. आनंद यांची कंपनी डेटा मॅनेजमेंट, आयटी क्षेत्रातील कामे, आर्टिफिशयल इंटीलिजन्स इत्यादी क्षेत्रातील कामे करते.
सुरवातीला पाच सहकार्यांना घेऊन त्यांनी कंपनीची सुरवात केली होती. आता याच कंपनीत १४ हजारांहून अधिक इंजिनियर काम करत आहेत तसेच जगभरातील ४५ देशांमधले कर्मचारी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या कंपनीचा भाग आहेत.
टर्नओव्हर किती?
२१ हजार डॉलर्सच्या भांडवलावर सुरु झालेल्या कंपनीचा प्रवास आता तब्बल ५६.५ कोटी डॉलर्सपर्यंत पोहचला आहे. अर्थातच हा प्रवास तब्बल ३० वर्षांचा आहे ज्यात अनेक चढ उतार आले असतील, अनेक अडचणींना सामोरे जावे लागले असेल.
समाजउपयोगी कामं :
व्यवसाय म्हंटल की माणूस त्यात २४ तास गुंतला जातो इतका की स्वतःच्या कुटुंबाला देखील वेळ देता येत नाही. मात्र आनंद आपल्या कामातून वेळ काढत समाजउपयोगी काम करत असतात.
- मुंबईची जान असलेला मरीन ड्राईव्ह चक्क एका मराठी माणसाने बांधलाय!!
- IT तील मराठी तरुण चक्क पाणीपुरीचा ब्रँड तयार करू शकतो? वाचा!
सहा वर्षांपूर्वी ‘दे आसरा’ नावाने एका फाऊंडेशनची स्थापना केली त्या फाउंडेशन अंतर्गत अनेक तरुणांना व्यवसाय करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.
‘मराठी माणूस एकमेकांचे पाय खेचतो, मराठी माणसाला भाऊबंदकीचा शाप आहे’ असे समज वर्षनुवर्षं आपण ऐकत आलो आहोत. या सगळ्यांना छेद देत आज अनेक मराठी तरुण व्यवसायात उतरून यशस्वी होत आहेत. त्यात आनंद यांसारख्या व्यक्तींची दखल फोर्ब्स घेत आहे, ही बाब नक्कीच मराठी जनतेसाठी अभिमानस्पद आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.