Site icon InMarathi

व्यंगावरून पालकांनीही त्यागलं, तेच व्यंग ठरलं यशाचा मार्ग; वाचा या विनोदवीराचा प्रवास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

सर्कशीतला जोकर आठवतो? बरेच जोकर हे कमी उंचीचे असतात आणि त्यांच्या चित्रविचित्र हालचाली, करामती माणसांना हसायला लावतात.  सर्कस मध्ये ज्या तणावपूर्वक कसरती सुरू असतात त्यामध्ये जोकरच्या येण्याने माणसाला तणावाचा विसर पडतो.

बऱ्याचदा जोकर हे त्यांच्या शारीरिक व्यंगावरून आपल्याला हसवतात किंवा लक्षात राहतात. सर्कशीपुरते आपल्याला जोकर्स लक्षात राहतात. नंतर त्यांचं काय होतं हे आपल्याला माहितही नाही होत.

१९०० च्या शतकातील अमेरिकेतील साईड शो मधला प्रसिद्ध कलाकार श्र्लीटझी याची गोष्ट देखील वेगळी नाही. तो त्याच्या कामामुळे जितका प्रसिद्ध होता तितकाच त्याच्या व्यंगामुळे देखील.

 

 

कमी उंची, डोकं लहान, चेहरा मोठा, तीन ते चार वर्ष वयाची बुद्धिमत्ता आणि अगदीच काही शब्द किंवा एखाददुसरे वाक्य पूर्ण म्हणण्याची क्षमता इतकंच त्याचं भांडवल. याच गोष्टीवर तो स्टार झाला.

श्र्लीटझीचा जन्म १९०१ मधला, पण नक्की कधी झाला हे कोणालाच माहिती नाही. त्याच्या डेथ सर्टिफिकेटवर त्याचा उल्लेख आहे इतकंच. त्याला जन्मतःच किंवा जन्मानंतर मायक्रोसेफली या आजाराचा सामना करावा लागला.

हा असा छोटा मेंदू, छोटी कवटी आणि शरीरातील काही पूर्ण डेव्हलप न झालेले अवयव असा जन्मला. इतर सामान्य लोकांपेक्षा तो वेगळा दिसायचा.

हेच त्याच्या आयुष्याचे भाग झाले म्हणूनच कदाचित जन्मदात्यांनी देखील त्याचा त्याग केला.

श्र्लीटझी वयाने वाढत होता मात्र बुद्धीने नाही. शेवटपर्यंत त्याची बुद्धिमत्ता चार वर्षे वयाच्या मुलाच्या इतकीच होती. पूर्ण वाक्य देखील त्याला बोलता यायचं नाही.

पण त्याच्या व्यंगाचा आणि त्याच्या वागण्यात असणाऱ्या निरागसतेने त्याला परिपूर्ण परफॉर्मर बनवले.

 

===

===

श्र्लीटझी त्यानंतर सर्कस मध्ये गेला. अनेक अमेरिकन इंटरनॅशनल सर्कस मध्ये श्र्लीटझीने काम केले आहे. त्यात टॉम मिक्स सर्कस, रिंगलिंग ब्रदर्स आणि बारनम अँड बेली सर्कस, यांचा समावेश आहे.

पुरुष असूनही स्टेजवर त्याचा परफॉर्मन्स मात्र स्त्रीचा असायचा. स्त्रिया घालतात तसा तिथला लॉन्ग स्कर्ट तो घालायचा आणि परफॉर्म करायचा.

अर्थात हे त्याच्या पथ्यावरच पडलं, कारण नैसर्गिक विधिंवर त्याचा कंट्रोल नव्हता. त्याचे डायपर चेंज करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या स्कर्ट घालण्यामुळे ते साफ करायला सोप जायचं.

त्याचे स्टेज शो जसे प्रसिद्ध होत गेले तशी त्याला एका फिल्मची ऑफर आली. ज्या सिनेमाचं नाव होतं ” फ्रीक्स”. १९३२ मध्ये हा सिनेमा आला. यामध्ये प्रेमाची आणि त्याच्या विश्वासघाताची गोष्ट आहे.

ती साईड शो मध्ये नेहमी अनुभवली जायची. साईड शो हा एक अमेरिकेतला मोठा उत्पादक बिजनेस होता. ज्यामध्ये सर्कस, परफॉर्मन्सेस, कार्निवल इत्यादी गोष्टी केल्या जायच्या.

 

 

त्या सगळ्या वरतीच आधारित होता फ्रिक्स. त्यामध्ये साईड शो मधल्या कलाकारांचे जीवनच दाखवण्यात आलं होतं.

परंतु या सिनेमाला सुरुवातीपासूनच विरोध करण्यात आला. याचं कारण म्हणजे त्या सिनेमात भयंकररित्या दाखवण्यात आलेला. अत्यंत घृणास्पद लैंगिक सीन. त्यावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली.

वर्तमानपत्रातून त्याचे परीक्षण केलं त्याच्यातूनही त्यावर टीका करण्यात आली. प्रेक्षकांच्या भावनांचा, विचारांचा, मेंदूचा काहीही विचार न करता काढलेला सिनेमा अशी त्याची संभावना करण्यात आली.

आणि अनेक शहरांमध्ये त्या सिनेमावर बंदी घालण्यात आली.

एका महिलेने तर तो सिनेमा, त्यातील ते भीतीदायक दृश्य पाहून माझा गर्भपात झाला, असा आरोप केला. त्यासाठी एमजीएम कंपनीला तिने जबाबदार धरलं.

नंतर एमजीएम कंपनीने त्या सिनेमातील ते दृश्य काढून टाकलं. नंतर रोड शो कंपनीने तो सिनेमा, त्या सिनेमाचे हक्क विकत घेतले आणि मग तो सगळ्या शहरांमधून प्रदर्शित करण्यात आला.

तो सिनेमा अनेक अर्थाने नकारात्मक असला तरी श्र्लीटझीने त्या सिनेमात आपली छाप मात्र सोडली. त्याचा अत्यंत निरागस आणि नैसर्गिक अभिनय सगळ्यांना आवडून गेला.

त्याचं अगदी लहान मुलासारखा वागणं,वावरणं सगळ्यांना आपलंसं करायचा. या सिनेमातील कलाकार तंत्रज्ञ याबरोबरच प्रेक्षकांचाही तो आवडता झाला.

 

===

===

तो कमी बोलायचा किंवा बोलायला अवघड जायचं तरीही त्याचं असणेच सगळ्यांना भावलं.

१९३६ मध्ये टॉम मिक्स सर्कस मधले ट्रेनर जॉर्ज सूर्ट्टीस हे त्याचे कायदेशीर सल्लागार झाले. त्यांना नेहमीच श्र्लीटझीविषयी लळा वाटायचा. त्यांनी त्याला मुलासारखा सांभाळला, त्याची सर्व काळजी घेतली अगदी स्वतःच्या मृत्यूपर्यंत.

१९६५ मध्ये सूर्ट्टीस यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांची मुलगी त्यांची वारसदार ठरली. परंतु तिला श्र्लीटझीमध्ये कोणताही इंटरेस्ट नव्हता. त्याचं पुढं काय होईल याच्याशी तिला देणंघेणं नव्हतं.

तिने श्र्लीटझीला लॉस एंजलिस मधल्या एका मानसिक आरोग्य केंद्रात ठेवलं.

श्र्लीटझी तिकडे तीन वर्ष एकटा राहिला. त्याला बोलता येत नसे. परंतु त्याच्या आवडत्या सर्कस पासून त्याच्या साईड शो पासून तो तिकडे वेगळा एकटा उदास राहिला.

पण नशीब कसं असतं बघा, एके दिवशी अचानक योगायोगाने त्याच्या साईड शो मधला तलवारबाज, ‘बिल उंक्स’ त्या मेंटल हिस्पिटलमध्ये काही सेवा देण्यासाठी अाला.

त्याने अचानक श्र्लीटझीला पाहिले. त्याने लगेच त्या मेंटल हॉस्पिटलला विनंती केली की, “मी याला ओळखतो आणि त्याला घेऊन जाईल याची काळजी घे घेईन.”

तोपर्यंत मेंटल हॉस्पिटल मधल्या लोकांनाही लक्षात आलं होतं की श्र्लीटझीला त्याचं तेच आयुष्य माहित आहे. इकडे तो फक्त शरीराने राहतो. म्हणून त्याला घेऊन जायची परवानगी मिळाली.

श्र्लीटझीने तिकडे जाऊन परत सर्कस जॉईन केली. आणि आपले आवडते परफॉर्मन्सेस परत द्यायला सुरुवात केली.

 

 

कबुतरांना दाणे खाऊ घालणे, आणि आपला परफॉर्मन्स सादर करणे हेच त्याचे मृत्युपर्यंतचे उद्योग होऊन बसले. १९७१ साली त्याचा मृत्यू झाला.

परंतु जेव्हा त्याला दफन करण्यात आलं त्या थडग्यावर देखील त्याचं नाव कुणी लिहिलं नाही. शेवटी २००७ मध्ये त्याच्या एका चाहत्याने त्याच्या थडग्यावर त्याचं नाव असलेला दगड लावण्यासाठी पैसे दिले.

श्र्लीटझी गेला. त्याला शेवटपर्यंत त्याचे स्वतःचे घर मात्र काही मिळवता आलं नाही. शेवटपर्यंत तो दुसऱ्यांवरतीच अवलंबून राहिला. पैसा, प्रसिद्धी त्याच्या वाट्याला आली पण त्याचा उपभोग कसा घ्यायचा आहे मात्र त्याला समजलं नाही.

परंतु आपल्याला जे आयुष्य मिळालं आहे ते मात्र लोकांना हसवत आणि आनंदाने जगायला हवं हे त्यानं शिकवलं. शेवटपर्यंत त्याचा निरागसपणा टिकून होता, आणि आज ही तो त्यासाठीच ओळखला जातो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version