दिग्दर्शक एस. राजामौली यांनी स्वत: बाहुबलीमध्ये काम केले आहे? तुम्ही त्यांना ओळखलं होतं का?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
आजकाल बघावं तिकडे जो तो बाहुबली, प्रभास आणि दिग्दर्शक एस. राजामौली यांचे गुणगान गातोय. त्यातल्या त्यात जास्तीत जास्त चर्चा ही बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक एस. राजामौली यांचीच आहे. काही जण तर आपण त्यांचे डायहार्ट फॅन असल्याचे सांगतात, बहुतके जण असंही सांगतात की, “त्यांनी निर्माण केलेली ही कलाकृती आम्ही असंख्य वेळा पहिली आहे”.
जर तुमच्याही फ्रेंड सर्कल मध्ये अशी कोणी मित्र मंडळी असतील आणि जे सारखे दिग्दर्शक एस. राजामौली आणि त्यांच्या बाहुबलीचे आपण सगळ्यात मोठे फॅन असल्याचे सांगत असतील तर त्यांना केवळ एकच प्रश्न विचारा,
बाहुबली बघितला ना? मग त्यात एस. राजामौली दिसले का नाही?
आम्ही तुम्हाला खात्रीशीर सांगतो ९९% लोक असंच म्हणतील की,
येडा बिडा झाला काय? एस. राजामौली कुठेत त्यात?
चला तर आम्ही तुम्हाला पहिले दाखवतो एस. राजामौली बाहुबली मध्ये कुठे लपले आहेत ते , मग तुम्ही त्यांना दाखवा.
महत्वाची गोष्ट आपण इथे ज्या बाहुबलीची चर्चा करतोय तो पहिला पार्ट आहे बरं का…म्हणजे- ‘Baahubali – The Beginning’. नाहीतर उगाच तुम्ही दुसऱ्या पार्टमध्ये शोधायला जालं.
खाली दिलेला हा फोटो बाहुबलीच्या पहिल्या पार्टमधील आहे. ओळखलंत का या माणसाला? अहो हेच आहेत एस. राजामौली आणि त्यांनी हे मद्य विक्रेत्याचं पात्र वठवले होते.
महिष्मती साम्राज्याचा सम्राट कोण होणार हे ठरवण्यासाठी एका स्पर्धेअंतर्गत बाहुबली आणि भल्लालदेवा दोघेही आपल्या राज्यापासून दूर यात्रेसाठी जातात. तेव्हा ते तावेर्ण नावाच्या जागी थांबतात आणि तेव्हा या मद्य विक्रेत्याच्या पात्राचा प्रवेश होतो. आता तुम्हाला हळूहळू आठवत असेल, नसेल आठवत तर परत एकदा बाहुबलीचा पहिला पार्ट नक्की बघा.
एस. राजामौली याचं हे पात्र शोधायची एक सोप्पी ट्रिक म्हणजे- थेट ‘मनोहारी’ गाण्यावर जा
आणि पुन्हा मागे या, हे ‘मनोहारी’ गाणं सुरु होण्यापूर्वीच एस. राजामौली यांनी रंगवलेले मद्य विक्रेत्याचे पात्र तुमच्या नजरेस पडते.
यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की एस. राजामौली हे केवळ सर्वोत्तम दिग्दर्शक नसून एक उत्तम पठडीतले अभिनेते देखील आहेत.
आता तुम्हीही हे आर्टिकल जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या मित्रांना हा प्रश्न विचारा आणि मारा की जरा इम्प्रेशन!!!
हे देखील वाचा : (‘बाहुबली’ ची जीवापाड मेहनत – तुम्हाला नक्कीच विचारात पाडेल!)
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.