Site icon InMarathi

स्त्रीच्या ‘त्या’ भागावर ‘शृंगारिक’ टिप्पणी करणाऱ्या या ‘बोल्ड’ गाण्यामागची मजेशीर गोष्ट…

baat thi ek bair ki featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

भारतीय सिनेमा गाण्यांशिवाय पूर्ण होत नाही हे तर सर्वश्रुत आहेच. आपल्या सिनेमात गाण्यांचं अनन्यसाधारण महत्व आणि संगीताचा इतिहास हा खूप जुना आहे.

सैगलपासून आरडी बर्मनपर्यंत, रफीपासून अरिजित सिंगपर्यंत, लतादिंपासून श्रेया घोषालपर्यंत आणि लक्ष्मीकांत-प्यारेलालपासून रेहमानपर्यंत अशा सगळ्यांनीच त्यांचं अमूल्य योगदान देऊन भारतीय फिल्मी संगीत हे एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे.

 

 

आपल्याकडे क्लासिकल म्युझिक ऐकणारे फार कमी श्रोते सापडतील पण फिल्मी संगीत सगळ्यांनाच आवडते. सध्याजरी आपल्याइथला सिनेमा संगीताचा दर्जा फारच घसरला असला तरी त्यातही अमित त्रिवेदि, शंकर-एहसान-लॉय सारखे गुणी कलाकार संगीताचा वारसा जपून आहेत.

आज नेहा कक्कर, टोनी कक्कर, बादशाह, हनी सिंग किंवा नुकताच लोकप्रिय झालेला ‘बसपन का प्यार’ फेम सहदेव कुमार यावरून आपल्याला अंदाज आला असेल की फिल्मी संगीताचा दर्जा किती खाली गेला आहे!

 

 

एक काळ असा होता जेव्हा फक्त गाणी ऐकण्यासाठी लोकं तिकीट काढून सिनेमा बघायला जायचे. त्या सुवर्णकाळातले संगीतकार, गायक हे तर अव्वल होतेच पण त्यावेळी सिनेमांची गाणी लिहिणारे गीतकारही एकाहून एक सरस होते.

शैलेन्द्र, कैफि आजमी, साहिर लुधीयानवी, असे एकाहून एक दिग्गज गीतकार आपल्या इंडस्ट्रीत होऊन गेले, म्हणूनच आज त्यांचीच गाणी रेटून सध्याचे कलाकार त्यांची पोटं भरू शकतायत! गुलजार, जावेद अख्तर यांची गीत अधूनमधून ऐकायला मिळतात.

त्याकाळचे गीतकारही इतके हुशार होते की त्यांच्या कुठल्याही काव्यात कुणालाच खोट काढता येणं निव्वळ अशक्य आहे, इतक्या बेमालूमपणे ते गीत रचायचे, त्यातलेच एक मोठे गीतकार म्हणजे मजरूह सुलतानपुरी!

 

दिलीप कुमारपासून शाहरुख खानपर्यंतच्या सगळ्या सुपरस्टार्सच्या फिल्म्ससाठी गाणी लिहिणाऱ्या मजरूह यांच्या कारकीर्दीचा अवाका केवढा आहे याचा अंदाज तुम्हाला आला असेलच.

कित्येक सिनेमे त्यांनी लिहिलेल्या गाण्यांमुळे हीट झाले, पण तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का की मजरूह यांनी लिहिलेलं आणि किशोर कुमार यांनी गायलेलं एक गाणं हे आजच्या काळाच्या मानाने बरंच अश्लील होतं, पण त्याकाळी लोकांच्या ती गोष्ट ध्यानात आली नाही.

होय होय चक्क मजरूह सुलतानपुरी यांनी हे गाणं लिहिलं होतं, डबल मीनिंग गाणं जरी असलं तरी या गाण्यात वापरलेले शब्द इतक्या खुबीने वापरले आहेत की आजही आपल्याला पटकन याचा खरा अर्थ समजत नाही.

हे गाणं आहे १९७५ सालच्या धरम करम या सिनेमातलं, राज कपूर, रेखा आणि रणधीर कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमाला लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. खुद्द रणधीर कपूर यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाला पंचम यांनी संगीत दिलं होतं आणि मजरूह सुलतानपुरी यांनी गाणी लिहिली होती.

 

 

यातलं मुकेशच्या आवाजातलं ‘एक दिन बिक जायेगा’ हे गाणं लोकांनी खूपच डोक्यावर घेतलं, मुकेशला या गाण्यासाठी फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळाला.

यातलंच रणधीर कपूर आणि रेखा यांच्यावर चित्रीत झालेलं आणि किशोर यांनी गायलेलं “बात थी यार एक बैर की” हे गाणं आणि त्याचा अर्थ आजही वाचला तरी तो सहसा कुणाला कळणार नाही, पण मजरूह यांनी त्या काळातही बेमालूमपणे इतकं बोल्ड गाणं लिहिलं हे कोणालाच समजलं नाही.

आज याच गाण्याविषयी आपण या लेखातून जाणून घेऊया. सिनच्या परिस्थितिप्रमाणेच त्याला अनुसरून गाणं लिहिणाऱ्या मजरूह यांनी नेमकी काय कमाल केली ती बघूया तरी!

गाण्याची पार्श्वभूमी अशी आहे की रेखा एका शिंप्याच्या मागे हात धुवून लागली आहे, आणि तो शिंपी रणधीर कपूरपाशी येतो तेव्हा रेखा रणधीरला सांगते की याने मी दिलेल्या कापडात माझे कपडे शिवलेच नाहीत, त्यावर शिंपी रणधीरला सांगतो की “रेखा आता तरुण (जवान) झाली आहे” त्यामुळे तिचे कापड कमी पडत आहे.

खरंतर हे सगळं संभाषण स्त्रीचे स्तन (ब्रेस्ट) याबाबत सुरू असते आणि यावेळेस रणधीर कपूर रेखाला समजवायला हे गाणं म्हणायला सुरुवात करतो.

 

 

या गाण्याचे शब्द, आणि व्हिज्यूअल्ससुद्धा तितकेच बोल्ड आणि त्याचप्रकारे हे गाणं सादर केलं गेलं होतं, पण त्यावेळेस या शब्दांच्यामागचा हा अर्थ कोणालाच समजला नव्हता, पण आज बारकाईने ते गाणं ऐकलं पाहिलं की समजतं अश्लील गोष्टीसुद्धा किती शृंगारिक पद्धतीने मजरूह यांनी काव्यातून मांडल्या होत्या!

या गाण्याचे कडवे आणि वरील परिस्थिति आणि रेखाच्या जवानीविषयी केलं गेलेलं भाष्य या कडव्यातून समजतं, नेमकं ते शब्द काय आहेत ते बघूयात तरी!

जैसे कैरी से आम बन बढ़ने के बाद,
जैसे बढ़ती है गेंद हवा भरने के बाद,
जैसे एक बून्द उठे लिए मौज़ो की शान,
जैसे एक बुलबुला बड़े गुम्बद सामान,
जैसे निकले है बम्ब कोई धरती को फोड़,
जैसे ज्वालामुखी उठे पर्वत को तोड़,
जैसे आँचल तले जले दो दो मसाल,
जैसे बदल के बीच दो दो चंदा के थाल,
नहीं डोली समाये वैसे गोरी का अंग नहीं चोली समाये
हे बात थी यार एक बेर की!

 

खरंतर किशोर कुमारने गायलेलं हे गाणं आणि याचा अर्थ एवढा गहन असेल याचा कुणीच विचार केला नाही, पण मजरूह सुलतानपुरी यांनी खूप विचार करून एवढं गाणं लिहिलं हे त्याकाळी समजून घ्यायला लोकांची तेवढी वैचारिक कुवतच नव्हती!

शिवाय या गाण्याच्या शेवटी रेखाचे व्हिज्यूअल्स बघितली तर हे अगदी स्पष्ट होतं की असाच विचार करून हे गाणं लिहिलं गेलेलं आहे!

आज सर्रास रॅपच्या नावाखाली बोल्ड शब्द आणि अश्लील गोष्टी प्रमोट केल्या जातात पण ही गोष्ट त्या काळात इतक्या सराईतपणे केली गेली की त्यामागचा अर्थ आत्ताकुठे आपल्याला समजतोय!

 

 

हे गाणं अगदीच अश्लील नसलं तरी women objectifying आहे यात काहीच वाद नाही, पण ते ज्या पद्धतीने सादर केलं गेलं ते सादर करण्याचं कसब सध्या कोणत्याच कलाकारात किंवा गीतकारात तुम्हाला सापडणार नाही!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version