' असाही “घोळ” : मासेमारीला गेला, परत येऊन समुद्र किनारीच करोडपती झाला… – InMarathi

असाही “घोळ” : मासेमारीला गेला, परत येऊन समुद्र किनारीच करोडपती झाला…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘देनेवाला जब भी देता देता छप्पर फाड़ के’ हेराफेरीमधलं हे गाणं अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी यांच्यावर चित्रित केलेलं आठवत असेलच, पैसे मिळण्याच्या आधीच आपली स्वप्न रंगवतात असं सिनेमात दाखवलं होतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

माणूस खरंतर आयुष्यभर आपल्या नशिबाला दोष देत असतो, एखादी गोष्ट मिळाली नाही की त्यावर नशिबाला दोष देत बसतो पण ती गोष्ट का मिळाली नाही त्यासाठी आपण काही प्रयत्न केले का? असे प्रश्न खूप कमी माणसांना पडतात कारण माणूस कधी विचारच करत नाही. मात्र पालघरच्या एका कोळी बांधवाचं नशीब मात्र चांगलंच फळफळलं आहे.

 

heraferi inmarathi

पावसाळ्याचे काही दिवस सोडले तर हे कोळी बांधव अथांग पसरलेल्या समुद्रात मुशाफिरी करत असतात. रोज खोलवर समुद्रात जाऊन मासे पकडत असतात तेही आपल्या जीवाची बाजी लावून, अशाच एका कोळी बांधवाने काही कोटींमध्ये असलेले मासे विकले. चला तर मग काय आहे नक्की प्रकार जाणून घेऊयात..

कोण आहे तो कोळी बांधव?

हा कोळी बांधव पालघर तालुक्यातील मुरबे तालुक्यातील आहे. चंद्रकांत तरे असं त्याच नावं आहे. हरबा देवी नावाच्या बोटीने चंद्रकांत आपल्या काही मित्रांसोबत पालघर परिसरातील खोल समुद्रात नेहमीप्रमाणे मासेमारी करण्यासाठी गेला होता. वागरा पद्धतीचे एक विशिष्ट जाळे असते ते त्यांनी समुद्रात टाकले. जाळे जड झाल्यासारखे वाटल्यावर त्यांनी ते बोटीत ओढले तर तब्बल दीडशेहून अधिक घोळ जातीचे मासे जाळ्यात आढळून आले.

 

fish inmarathi 1

 

या माशांची एवढी किंमत का? 

या जातीच्या माशांचे वजन हे जवळजवळ १८ ते २५ किलोपर्यंत असते. या माशाच्या पोटातील पिशवीचा वापर वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होतो. अनेक औषधं, सौंदर्य प्रसाधने यासारख्या गोष्टी बनवण्यात या माशांचा उपयोग होतो. इतकच नव्हे तर या माशांची निर्यात जपान हॉंगकॉंग, थायलंडसारख्या देशात होते.

 

generic-medicine-inmarathi

 

मासे कितीला विकले गेले?

एका माशाची किंमत ८५ हजार इतकी असते. चंद्रकांत तरेने सर्व मासे  १.३३ करोड रुपयाला विकले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार यूपी बिहारच्या एका ट्रेडरने ते विकत घेतले आहे.

 

ghol fish inmarathi

 

इतिहासात प्रथमच घडले :

दररोज कोळी बांधव मोठ्या आशाने मासेमारीसाठी निघत असतात. कधी मोठ्या प्रमाणावर मासे मिळतात तर कधी खूप कमी प्रमाणात मिळतात. आजवरचा एकूण इतिहास बघता इतक्या मोठ्या प्रमाणावर या जातीचे मासे मिळाले नव्हते.

 

fish maha inmarathi

 

नारळीपोर्णिमेपासून पुन्हा एकदा कोळी बांधव मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाऊ लागले आहेत. दरवर्षी पावसाळ्यातील काही काळ हा त्यांच्यासाठी एक प्रकारचा लॉकडाउन असतो. आणि अशा लॉकडाऊन नंतर पदरात इतकी मोठी रक्कम  मिळाली तर कोळीबांधव नक्कीच खुश होईल.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?