' मोदीभक्त, माध्यमे व बुद्धिवाद्यांची ट्रोलिंग आणि विश्वासार्हता! – InMarathi

मोदीभक्त, माध्यमे व बुद्धिवाद्यांची ट्रोलिंग आणि विश्वासार्हता!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

उजव्या विचारसरणीच्या, अपरिवर्तनवादी किंवा मूलत्ववादी सत्ता ह्या त्या राष्ट्रातील माध्यमे आणि बुद्धिवादी लोकांना बदनाम करून त्यांची विश्वासार्हता संपवतात अशी काही लोकांची धारणा असते. थिअरी असते. भारतात सध्या नरेंद्र मोदी हुकूमशहा असून भाजप सरकार फॅसिस्टवादी आहे अशा प्रकारच्या आरोपांची चलती आहे.

नरेंद्र मोदी समर्थक आणि भाजपप्रणित “ट्रोल्स” तथाकथित बुद्धिवादीना किंबहुना वेगळ्या मताच्या प्रत्येकाला छळतात, शिवीगाळ करतात असे म्हणले जाते. त्याचप्रकारे पत्रकारांना बदनाम करून, इतर पक्षीय नेत्यांचे चारित्र्यहनन करून त्यांची विश्वासार्हता कमी करतात असाही आरोप होतो.

हा आरोप खरा आहे का? हो! खरा आहे. पण सोबतच तार्किकदृष्ट्या एक गोष्ट म्हणावी लागेल, ह्या सर्व गोष्टी केवळ भाजप समर्थक/हिंदुत्ववादी/उजव्या विचारसरणीचे करत नाहीत. आणि ह्याबद्दल न बोलता केवळ भाजपलाच एकटे पाडून टीका करणे म्हणजे नैतिक दृष्ट्या गैर आहे आणि असे करणाऱ्यांना “दांभिक पुरोगामी” म्हणलं तर राग येण्याचे कारण नाही. उदाहरणे पाहूया…

पुरोगाम्यांचा आणि विरोधकांचा सर्वात पहिला आरोप हा आहे की भाजप समर्थक ‘ट्रोल्स’ पत्रकारांना बदनाम करतात. त्यांची विश्वासार्हता संपवतात. तसं पाहता ही गोष्ट खरीच आहे. जगात कुठेही तर्काला तर्काने उत्तर देता येईनासे झाले किंवा एखाद्याबद्दल आकस असला की वैयक्तिक हल्ले चढवले जातात. हे करणाऱ्या लोकांत केवळ भाजप समर्थक नव्हे तर इतर सर्वच पक्षांचे समर्थक येतात. इतकेच काय? खुद्द तथाकथित पुरोगामी देखील हेच करताना दिसतात.

उदाहरणार्थ, भाजपचे ट्रोल पत्रकारांना आणि बुद्धिवाद्याना बदनाम करतात असे म्हणणारे पुरोगामी दुसऱ्याच वाक्यात “मिडीया भाजपला विकला गेलाय” म्हणतात! इतका प्रचंड विरोधाभास ‘बुद्धिवादी’ खचितच नव्हे. भाजप समर्थक पत्रकारांना बदनाम करतात म्हणणारे बुद्धिवादी स्वतःदेखील हीच गोष्ट करत नाहीत काय?

 

trolling-marathipizza01
बूमबर्ग व्ह्यू आणि बिजनेस स्टॅंडर्ड इंडियाचे स्तंभकार

 

trolling-marathipizza02
पत्रकार आणि “i am a troll”च्या लेखिका

 

प्रसिद्ध पत्रकार

 

trolling-marathipizza04
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिकृत प्रवक्त्या

 

अर्णब गोस्वामीचं नवीन चॅनेल येण्याअगोदरपासून काँग्रेस पक्षाने केवळ काँग्रेसपक्षा विरुद्ध बातम्या दिल्या म्हणून times nowवर बहिष्कार घातला. इतकंच नव्हे तर काँग्रेसच्या नेत्यांकडून, राष्ट्रीय प्रवक्त्यांकडून अर्णबला लक्ष्य करणे सुरू झाले. लक्ष्यात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हेच लोक ओळख लपवून पत्रकारांना नावे ठेवणाऱ्या लोकांना ‘ट्रोल’ म्हणतात. ही एक अत्यंत गंभीर बाब आहे. औपचारिकरित्या एखादा पक्ष जेंव्हा माध्यमांवर बहिष्कार घालून पत्रकारांना बदनाम करतो तेंव्हा पुरोगामींच्या मते हा फॅसिस्टवाद असतो. मग काँग्रेसदेखील फॅसिस्ट नाही का? भाजप समर्थक ndtv बद्दल असाच आकस बाळगून आहेत मात्र भाजपने ndtvवर बहिष्कार घातला नाहीय किंवा प्रत्यक्ष पक्ष प्रवक्त्याने पत्रकारांचे नाव घेऊन अशी भाषा वापरलेली दिसण्यात नाही. अरविंद केजरीवालनी तर भर सभेत सरकार स्थापन झाल्यास मीडियावर बंदी घालून पत्रकारांना तुरुंगात डाम्बण्याची भाषा केली होती.

 

trolling-marathipizza05
indianexpress.com

 

पत्रकारांचे चारित्र्य हनन करण्यात स्वतः अरविंद केजरीवाल देखील मागे नाहीत. शेखर गुप्ता, राजदीप सरदेसाई इत्यादी अनेक बड्या पत्रकारांवर केजरीवालनी घाणेरडे आरोप on record करुन झालेत.

trolling-marathipizza06
अरविंद केजरीवाल एका बड्या पत्रकारांची विश्वासार्हता घालवताना

 

trolling-marathipizza07
अरविंद केजरीवाल राजदीपवर काँग्रेसची बाजू घेण्याचा आरोप करताना

 

वरच्या उदाहरणांवरून पुरोगामी आप आणि काँग्रेस ह्या पक्षांना उजव्या विचारसरणीचे, अपरिवर्तनवादी, फॅसिस्ट पक्ष म्हणतील का? नाही तर का नाही? जे नियम भाजपला तेच नियम इतर पक्षांना का नाही?

“एबीपी माझा” ह्या मराठी माध्यमाविरुद्ध “बीजेपी माझा” असा ट्रेंड चालवणे, झी न्यूजला छी न्यूज संबोधणे हा मिडीयाविरुद्ध अपप्रचार करून विश्वासार्हता घालवण्याचा प्रकार नाही का?

भाजपने मिडीया विकत घेतल्याचे आरोप होतात. ह्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे? अर्णब गोस्वामी भाजपला विकला गेला असता तर सलग 22 दिवस सुषमा स्वराज विरुद्ध “ललितगेट” चालवलं असतं का? व्यापम प्रकरणावर प्राईमटाइम घेतला असता का? गोमांसबंदीवरून रान उठवलं असतं का?

एखादा पत्रकार आपल्याला न आवडणाऱ्या बातम्या देतो म्हणून त्याला नावे ठेवणे ही गोष्ट सगळेच करतात. ती उजव्यांची मक्तेदारी ठरवून दांभिक पुरोगामीत्व कुरवाळत बसणे म्हणजे शुद्ध मूर्खापणाच म्हणावा लागेल. माध्यमांमध्ये काम करणारी देखील माणसेच आहेत. त्यांचीही मते मतांतरे असू शकतात. मात्र मिडीयामध्ये काम करताना तार्किक आणि निरपेक्ष वागणे ही किमान अपेक्षा असली पाहिजे. पुरोगाम्यांच्या मते, जर काही माध्यमे मोदींकडून निघून बोलतात म्हणून विकली गेली असली तर मग मोदींविरुद्ध खोटारडेपणा करणाऱ्यांना ह्याच न्यायाने मोदी समर्थकांनी नावे ठेवली तर मोदी नेमके कसे फॅसिस्ट ठरतात?

कित्येक उदाहरणे देता येतील.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्यावेळी दिल्ली-आग्रा परिसरात काही चर्चवर हल्ले झाले. मिडीया आणि पुरोगामींसह विरोधकांनी मोठ्याप्रमाणावर हा मुद्दा उचलून धरला! मोदी सरकार आल्यामुळे चेकाळलेले हिंदुत्ववादी अल्पसंख्याकांवर हल्ले करत असल्याचा बनाव रचण्यात आला. नंतर चौकशीअंती एकही हल्ल्यात कुठल्याही हिंदू संघटनेचा हात नसल्याचे स्पष्ट झाले. हा भाजपविरुद्ध अपप्रचार नव्हता का?

कलकत्त्यात एक चर्चमध्ये एक ननवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. नेहमीप्रमाणे हिंदुत्ववादी शक्तींना आणि पर्यायाने भाजप-संघाला जबाबदार धरण्यात आले. राणा अय्यूबने (पत्रकार व लेखिका “गुजरात फाईल्स”) हे भलंमोठं आर्टिकल लिहून हा सगळा दोष मोहन भागवतांवर ढकलला. शेवटी आरोपी मुंबईत पकडले गेल्यावर ते बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झालेआर्च बिशप आणि इतरही ह्या प्रोपागंडाला बळी पडले. हा अपप्रचार नव्हता का?

रेल्वेने 972 रुपयात शंभर ग्राम दही आणि अडीच हजार रुपायात एक लिटर तेलाची खरेदी केल्याची बातमी काही माध्यमांनी दाखवल्यानंतर भ्रष्टाचाराच्या आरोळ्या उठल्या. रेल्वे मंत्र्यालयाने थेट खरेदीचे इनव्हॉईस प्रदर्शित केल्यानंतर शंभर ग्राम दही 8 रुपये 58 पैसे देऊन खरेदी करण्यात आल्याचे दिसले.

 

trolling-marathipizza08
रेल्वे मंत्रालयाने दिलेले स्पष्टीकरण

मोदींचा सूट दहा लाखांचा आहे हे कोणी कोणाला सांगितलं? माध्यमांना, विरोधकांना किंवा बुद्धिवंत पुरोगाम्यांना सूटची किंमत कुठून कळली? प्रत्यक्षात अशा प्रकारचा सूट सर्वप्रथम इजिप्तचे नेते होसनी मुबारक ह्यांनी परिधान केला होता. ह्याबद्दल मार्च 2011 साली ‘डेक्कन हेराल्ड’ नामक ब्रिटिश वर्तमानपत्रात बातमी होती.

लंडनच्या सवाईल रॉ मधल्या “हॉलंड अँड शेरी” ह्या कपडे बनवणाऱ्या कंपनीने होसनी मुबारकच्या सूटच्या किमतीचा अंदाज 10,000 पौंड असा वर्तवला होता. मोदींच्या सूट बाबत देखील “लंडन इव्हनिंग स्टॅंडर्ड”मध्ये बातमी छापून आली की मोदींचं सूट *बहुधा* हॉलंड अँड शेरीने बनवला असावा आणि अडीच ते तीनहजार पौंड प्रति मीटर त्याची किंमत असावी.

झालं, सगळीकडे मोदींच्या दहा लाखांच्या सूटची चर्चा सुरू होऊन अपप्रचार व्हायला लागला. टाइम्स ऑफ इंडियाने हा सूट भारतीय ‘जेड ब्लु’ कंपनीने बनवल्याची थाप हाणली. सगळ्या देशात मोदींच्या सूटवरून हाहाकार उडाला! विरोधकांपासून बुद्धिवंतापर्यंत सर्वांनी मोदींना अनेक विशेषणे लावली.

मुळात हा सूट मोदींना “रमेश भिकाभाई विराणी” नामक प्रवासी भारतीय उद्योजकाने, आपली मुलातर्फे भेट म्हणून दिला होता. रमेश विराणी मोदींचे 40 वर्षांपासूनचे पारिवारिक मित्र आहेत. त्यांनी स्पष्ट केले की मोदींच्या सूटच्या किमतीबद्दल अत्यंत अतिशयोक्ती अंदाज लावलेले गेले!

पुढे ह्या सूटचा लिलाव करून रक्कम ‘नमामी गंगे’ ह्या अभियानासाठी दान करण्यात आली. ह्यापुर्वीही मोदींनी स्वतःला आलेल्या भेटवस्तूंचा लिलाव करून कन्या प्रशिक्षण अभियानासाठी 95 कोटी रुपये उभे केले होते.

हा कोणत्या प्रकारचा अपप्रचार म्हणायचा?

आजकाल प्रत्येक घटना हिंदूंच्या माथी मारली जाते! कधी कधी तर काल्पनिक घटना सुद्धा…का? कारण ती काल्पनिक घटना भाजपशासित राज्यात घडलेली असते म्हणे…!

 

गोमांस खाल्ल्याबद्दल “हिंदू गँग” ने बलात्कार केल्याची सनसनाटी घटना!

वरील भडक बातमी बघितली? आता बघा त्यावर पोलीस काय म्हणतात –

 

trolling-marathipizza10
जी प्रत्यक्षात घडलीच नाही…!

हे असं आहे…!

राहता राहिला प्रश्न उजव्या, फॅसिस्टवादी समर्थकांनी केलेल्या सायबर बुलीयिंग आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारण्याचा! जेंव्हा सायबर विश्वात तुम्ही एखादे मत व्यक्त करता तेंव्हा तुमच्या मतांशी सहमत नसणारे लोक शिवीगाळ करतात, तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात, उद्धट बोलतात, चिडवतात. आशा लोकांना ‘ट्रोल’ अशी उपाधी दिली जाते! हल्ली प्रत्येक पक्ष, नेता, अभिनेता स्वतःची एक सोशल मिडीया टीम बनवतो आहे. त्यामार्फत विरोधकांविरुद्ध किंवा प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध अपप्रचार करवला जातो. पैसे देऊन कामावर खास ह्या गोष्टींसाठी माणसे नेमली जातात. ही माणसे खोट्या ओळखी वापरून, फेक अकाउंट काढून प्रॉपगंडा रेटत राहतात. शाहरुख खान पासून अखिलेश यादवपर्यंत सर्वजण हे करतात. भाजप देखील ह्याला अपवाद नाहीच. पण केवळ भाजपला सिंगल आऊट करून ह्या गोष्टीचं स्तोम माजवण्याच्या सलेक्टिव्हपणाला केवळ आणि केवळ दांभिकपणा म्हणावा लागेल. आणि हा दांभिकपणा करणारे जेंव्हा स्वतः असे वागतात तेंव्हा काय म्हणावे? विरुद्ध मत व्यक्त करणाऱ्यांना नावे ठेवणे, शिवीगाळ करणे जर ‘ट्रोलिंग’ असेल तर आपले कथित बुद्धिवादी देखील मागे नाहीत.

 

अरविंद केजरीवाल समर्थक मिका सिंग ची भाषा बघा –

 

trolling-marathipizza11
प्रसिद्ध गायक आणि अरविंद केजरीवाल समर्थक मीका सिंह.

तेच मिका सिंग – जे — !

 

trolling-marathipizza12
मीका सिंह अरविंद केजरीवालचे मोठे समर्थक आहेत

रोडीज वाला रघु राम तर आपण ओळखतोच…

 

trolling-marathipizza13
रघू राम अरविंद केजरीवाल समर्थक असून ‘आप’साठी प्रचार करतात.

“I am a Troll” नावाचं पुस्तक लिहिणाऱ्या स्वाती चतुर्वेदी खुद्द कश्या वागतात बघा –

 

trolling-marathipizza14
पत्रकार स्वाती चतुर्वेदी. दुर्दैवाने ह्यांनीच ‘i am a trol’ नावाचे पुस्तक लिहिलेय.

तथाकथित विचारवंत, पुरोगाम्यांच्या लाडक्या NDTV ने, गुरमेहर कौर वर टीका करणाऱ्यांवर ट्रोलिंग करत काय भाषा वापरली बघा –

 

trolling-marathipizza15
गुरमेहर कौरशी असहमती दर्शविणाऱ्या रणदीप हुडा आणि वीरेंद्र सेहवागसाठी ndtvच्या औपचारिक हँडलवरून केली गेलेली ‘ट्रोलिंग’

अर्थात – त्यांना नंतर माफी मागावी लागली –

trolling-marathipizza16
NDTVने व्यक्त केलेली दिलगिरी

आणखी एक “उच्च” ट्रोल –

 

trolling-marathipizza17
रणदीप आणि सेहवागची बदनामी करणारे NASSCOM चे प्रसंतो रॉय

 

तथाकथित पुरोगाम्यांचे “लाडके” राजदीप आई वर शिव्या देताना…

 

trolling-marathipizza18
शिवीगाळ करणारे राजदीप सरदेसाई

असे अनेक आहेत…

trolling-marathipizza19
ABP NEWSचे अभिसार शर्मा देखील शिवीगाळ करतात.

 

trolling-marathipizza20
अर्वाच्य भाषा वापरण्यात सागरिका घोसही कमी नाहीत

 

trolling-marathipizza21
गौतम गंभीरशी सहमत नसणाऱ्या राणा अय्यूब, ट्रोलिंग करताना.

 

trolling-marathipizza22
सागरिका घोस ट्रोलिंग करताना.

 

ही गंभीर बाब आहे. नाव लपवून ओळख बदलून शिवीगाळ करणारे वेगळे आणि लोकांना प्रभावित करू शकण्याची क्षमता बाळगून असणारे प्रस्थापित बुद्धिवादी वेगळे! आशा गोष्टी जेंव्हा पत्रकार आणि पुरोगामी करतात तेंव्हा ह्या गोष्टी जास्त गंभीर असतात. अशी अनेक शेकडो उदाहरणे देता येतील. शेकडो.

ह्या सर्व गोष्टी दाखवून भाजप च्या ट्रोल धाडीचं समर्थन करण्याचा अजिबात प्रयत्न नाही. मुद्दा एवढाच आहे की एका तोंडाने उजवे पक्ष मिडीयाची विश्वासार्हता कमी करतात म्हणायचं, त्याच तोंडाने मोदींनी मिडीयाला विकत घेतले म्हणायचं! बुद्धिवादाच्या नावाखाली हा तद्दन मुर्खपणा आहे. एकीकडे भाजप समर्थकांना ट्रोल म्हणून हिणवणारे स्वतःदेखील तसेच वागतात तरीही बुद्धिवादी म्हणवतात.

(जाताजाता एक गोष्ट आवर्जून नमूद करायला हवी – ह्या मोठ्या पत्रकार, राजकारणींना तुम्ही एखाद्या महत्वाच्या विषयाबद्दल प्रश्न विचारणारी, माहिती देणारी किंवा लक्ष वेधणारी ट्विट केली तर ते दुर्लक्ष करतात. परंतु ट्रोल जेव्हा फालतू कमेंट्स करतात तेव्हा आवर्जून रिप्लाय देतात आणि मग व्हिक्टीम कार्ड खेळतात…! ह्यांच्या प्राथमिकता काय आहेत हे ह्यावरून कळतं. असो.)

विश्वासार्हता वर्तनात असते! जर वर्तन ठीक असेल तर बुद्धिवादी आणि माध्यमे – दोघेही आपली विश्वासार्हता गमावणार नाहीत.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Suraj Udgirkar

A small town person who loves to write, read & then wrangle about it. usual business.

suraj has 23 posts and counting.See all posts by suraj

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?