Site icon InMarathi

केस धुताना हमखास होणाऱ्या या चुका टाळा, अन्यथा होईल नुकसान!!

hair wash im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गोरा रंग, सुंदर डोळे, गोबरे गाल, कमनीय सुडौल बांधा ही सर्व साधारण सौंदर्याची लक्षणे मानली जातात.लांब ,काळे,मऊ केस ही सौंदर्याची अतुलनीय कल्पना म्हणता येईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सर्वांना ही भेट मिळत नाही. ही एक दैवी देणगीच मानावी लागेल.

भारतीय संस्कृतीत १४ विद्या अन् ६४ कला प्रसिद्ध आहेत. त्यात केशरचना करणं ही एक कला मानली जाते. सुंदर दाट लांब केस असलेली सुकेशिनी सौंदर्याचं प्रतिकच होती!!!

असे लांब केस स्त्रीचं सौंदर्य वाढवतात. पूर्वी बहुतांश स्त्रीयांचे केस लांब दाट नी जाड असायचे. केस कापणं हा अपशकून समजला जायचा.

मुली किंवा विवाहित स्त्रिया यांचा सुंदर केशकलाप नाना प्रकारच्या केशरचना करुन बांधला जाई. बटवेणी, तिपेडी वेणी, पाचपेडी वेणी, अंबाडा, खोपा अशा हर तऱ्हेने केसांची रचना केली जाई.

 

 

मूळचे केस दाट, मोठे असल्याने त्यांच्या वेण्या, खोपे, अंबाडे अशा सुंदर केशरचना काळानुरूप केल्या जात. \पूर्वी मुलीचं न्हाणं हा एक वेगळा कार्यक्रमच असायचा. सहसा रविवारी हे साग्रसंगीत न्हाणं व्हायचं.

त्याच्या आदले दिवशी आई, आजीच्या हाताने खोबरेल तेलाचा मसाज होत असे. चांगलं अर्धी वाटी तेल डोक्यात जिरवले जायचे.

शिकेकाई, आवळा, रीठा आई भिजवून ठेवी. त्यातही संत्र्याची, लिंबाची वाळवलेली सालं टाकून उकळलेले शिकेकाईचं पाणी केसांसाठी वापरलं जाई.

 

 

गरम पाण्याने आईच न्हाऊ घाली. त्यात रिठा शिकेकाई यांमुळे केस स्वच्छ होत, तर लिंबाची सालं केसात कोंडा होण्याला रोखत असत. अशाप्रकारे केसांची निगा राखल्याने केस लांब, काळे, मऊ होत.

याचा परिणाम म्हणून कितीतरी वर्षं केस काळेभोर रहात. एक पिढी अशीही होती, की पन्नास वर्षे झाली तरीही त्यांचे केस पिकलेले नसायचे. याचं कारण होतं सकस आहार आणि केसांची उत्तम निगा!!!

काळ बदलला, जग गतिमान झाले. स्त्रिया नोकरीसाठी बाहेर पडू लागल्या. कुटुंबाकडे लक्ष देताना स्वतःकडे दुर्लक्ष होऊ लागले. वेणी घालण्यात वेळ जातो हे लक्षात आलं. मग महिलांनी केस आखूड ठेवण्याचे धोरण स्विकारले.

आता ७० ते ७५% स्त्रियांचे केस छोटे असतात. “अजिबात वेळ मिळत नाही” या सबबीवर केसांचे काम तमाम झाले.

काळ बदलला. कामाचे स्वरूप बदलले. स्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करु लागली. स्पर्धा वाढली. ताणतणावाचे जीणे होऊ लागले.

घरचा, कामाचा, कामाच्या जागेवरचा, मुलांचा ताण यामुळे त्यांची ओढगस्ती होऊ लागली. त्यामधून केसांच्या समस्या वाढीस लागल्या.

केस गळती, कोंडा, अकाली केस पांढरे होणे या गोष्टींनी त्रस्त होऊन बायका छोटे केस ठेऊ लागल्या.

 

===

===

सौंदर्यापेक्षा तिने सोय बघितली. तिला प्रवासात, कामाच्या ठिकाणी केस विंचरणे शक्य होऊ लागले.आठवड्यातून ती दोनदा केस धुवू लागली. यामुळे काही गोष्टी साध्य झाल्या तर काही फसल्या.

वास्तविक लांबसडक काळेभोर केस हा स्त्रीयांचा आवडीचा मुद्दा आहे. त्यांचं सौंदर्य लागावं याकरिता आजही ती प्रयत्नशील असतेच, तरीही काही गोष्टी लक्षात न घेतल्यामुळे केसांची हानी होते.

बघू या कोणत्या गोष्टींमुळे, चुकांमुळे केसांचे सौंदर्य बिघडते आणि कोणत्या गोष्टी करणे गरजेचे आहे :

 

१) डोके खाजवणे

 

 

कधीकधी डोक्याला खूप कंड सुटते. कदाचित खूप घाम आल्याने, धूळ, माती, प्रदूषण यामुळे असे होत असावे. अशावेळी डोक्याकडे हात जातो, आपल्याला थोडे बरे वाटते. पण ते दिसायला फार वाईट दिसते. केसांची हानीही होते.

असे न करता बोटे केसातून फिरवली तर खाज थांबते, केसांच्या मुळांना इजा न होता इलाज होतो.

 

२) ओले केस विंचरणे

 

 

ओले केस विंचरणे हे केस गळतीचे मोठे कारण आहे. केस धुतल्यावर ते एकमेकांत गुंततात अन् विंचरले की तुटतात. म्हणून थोडे सुकले, की छोटे छोटे भाग करुन विंचरावेत. तरच ते न तुटता, न अडकता सुटुन मऊ मोकळे होतात.

 

३) कडक गरम पाण्याने केस धुणे

 

 

केस धुताना अगदी कडक पाणी वापरु नका. यामुळे तुमच्या शरीराला बरे वाटेल, ताजेतवाने व्हाल. पण केसांना ते धोकादायक ठरेल. केसांमधील आर्द्रता नाहीशी होईल.

कोमट पाणी वापरल्याने केसांच्या मुळांची मृत त्वचा निघून जाईल व केस मऊ रेशमा सारखे सुंदर होतील.

 

४) अयोग्य शांपू केसांना लावणे

 

 

केस सुळसुळीत करणारा, मंद सुगंध असणारा शांपू हा वेळेची बचत करणारा शोधच म्हणावा लागेल. त्यातही विविध प्रकार आहेत. त्यातील योग्य शांपूची निवड..आपल्या केसांच्या प्रकारानुसार शांपू निवडावा.

बाथरूममध्ये गेल्यावर डोके चांगले ३० सेकंद पाण्याने भिजवा. मग त्यावर शांपूचा वापर करा. आता कोमट पाण्याने डोके स्वच्छ धुवा. शांपू राहणार याचा याची काळजी घ्या.

शांपूमध्ये खूप केमिकल्स असतील, तर केसांची हानी होईल.

 

५) टॉवेलचा केस पुसण्यासाठी वापर करणे/ ड्रायरचा वापर करणे

 

 

ओले केस टॉवेलने खसाखसा पुसू नयेत. कारण एक तर ते तुटतात.

केस दोन‌ कारणांनी तुटतात. एक ओले असताना विंचरले तर आणि दुसरे टॉवेलने खसाखसा पुसल्याने. हे होऊ नये यासाठी तुम्ही केस टिपून घ्या.

केस ओले असताना एखादे सुती मऊ कापड केसांना गुंडाळा. टॉवेलचा वापर शक्यतो टाळा. म्हणजे नैसर्गिक रित्या ते वाळू द्या.

ड्रायरने सतत केस सुकवणं हेही केसांसाठी घातक असतं. म्हणून ड्रायरचा वापर कमीत कमी करा.

हे करा 

६) एकदाच शांपूचा वापर –   

 

 

केस धुवून चार पाच दिवस झाले,की परत डोकं खाजू लागतं. म्हणजेच केस घाण होतात. प्रवासामुळे धूळ माती केसांवर बसते. घाम येतो त्यामुळे केस चिकट होतात.

म्हणजे काय होतं? तर प्रत्यक्षात तेल, घाम, धूळ हे केसांच्या मुळाशी साचत जाऊन त्याचा थर जमा होतो. अशावेळी शांपूचा वापर करुन ही घाण काढण्यास मदत होते.

अशावेळी योग्य शांपू किंवा शिकेकाई वापरुन मुळांपर्यंत केस चोळून धुवावेत. केस स्वच्छ होतात.

 

७) शांपूचा ३० सेकंद फेस करा

शांपू डोक्यावर ३० सेकंद चांगला चोळा. सर्व बाजूला चांगले चोळून डोके धुवा. यामुळे शुद्ध रक्त पुरवठा होईल. केसांना पोषक द्रव्ये मिळतील व केस आरोग्यदायी होऊन छान वाढतील.

 

 

अशी काळजी घेतली तर केस गळती कमी होऊन ते वाढीला लागतील.

===

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version