आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
मागचं वर्ष करोनामुळे मनोरंजन क्षेत्रासाठी काहीसं वाईट गेलं. नवीन शूटींग थांबली तर तयार चित्रपट थिएटर बंद असल्यानं प्रदर्शनाविनाच अडकून बसले. यावर उपाय निघाला, ओटीटी प्लॅटफॉर्मचा!
आजवर आधी प्रदर्शित झालेले सिनेमे आणि वेबसिरीजसाठी या माध्यमाचा वापर केला जात असे, आता मात्र या माध्यमातून नवीन सिनेमे प्रदर्शित होत आहेत. येत्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेबसिरीज आणि सिनेमांचा धमाका होणार आहे.
मोठे बॅनर, दिग्गज कलाकार यांचा फौजफाटा तुमचं मनोरंजन करायला सज्ज आहे. पाहुया या यादीत कोण कोणते चित्रपट आहेत…
१. पृथ्वीराज
अक्षय कुमारची मुख्य भूमिका असणारा यशराज बॅनर्स अंतर्गत बनणारा पृथ्वीराज हा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. वर्षात चार चित्रपट करणारा अक्षय त्याच्या सुपरफास्ट कामासाठी ओळखला जातो. मात्र पृथ्वीराज हा अक्षयच्या कारकिर्दीतील असा चित्रपट आहे ज्याच्या निर्मितीसाठी आजपर्यंतचा सर्वात जास्त वेळ त्यानं दिलेला आहे.
या चित्रपटातील युध्दप्रसंग चित्रीत करण्यासाठी परदेशातून खास घोडेस्वार आमंत्रित केले गेले होते. यातल्या युध्द प्रसंगाच्या सीनमधे अक्षय कुमारनं २ किलोचा कॉस्च्युम परिधान केलेला आहे.
अक्षयसोबत संजय दत्त, मनुषी चिल्लर, सोनू सूद यांच्याही यात मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख सध्यातरी ५ नोव्हेंबर २०२१ सांगितली जात आहे.
२. तख्त
शहाजहानचे दोन पूत्र, औरंगजेब आणि दारा. औरंगजेबाच्या कथांनी इतिहासाची पानंच्या पानं भरलेली आहेत मात्र दाराविषयी फारसं लिहिलं, बोललं गेलेलं नाही.
दारा औरंगजेबासारखा सत्तालोलूप, योध्दा नव्हता. उलट औरंगजेबाच्या विरुध्द स्वभावाचा म्हणजेच धर्मशास्त्री, सुफी, विविध कलांमध्ये पारंगत असा कोमल ह्रदयाचा होता.
त्याला युध्दनिती, सैन्य अशा विषयात रूची नसल्यानं शाहजाननही त्याला रणनीतीत पारंगत केलं नाही, की फारसं कधी युध्द भूमीवर पाठवलं नाही. अगदी लहान वयापासून औरंगजेबाला त्यानं युध्दात उतरविलं तर दाराला कायमच आपल्यासोबत ठेवलं.
औरंगजेब आणि दारा यांच्या नात्याची गोष्ट सांगणारा तख्त हा चित्रपट करन जौहर घेऊन येत आहे. विकी कौशल, रणवीर सिंह, करीना कपूर, अनिल कपूर, अलिय भट्ट, भूमी पेडणेकर आणि जान्हवी कपूर यांच्या भूमिका असणारा हा भव्यदिव्य मल्टिस्टारर सिनेमा असणार आहे. करोनाच्या पाश्वर्भूमीवर या चित्रपटाचं चित्रीकरण तात्पुरतं पुढे ढकलण्यात आलं आहे.
३. आरआरआर
या सिनेमात स्वातंत्र्यपूर्व काळातील हिंदुस्थानचं चित्रण असणार असून दोन क्रांतिकारक अल्लुरी सीताराम आणि कोमाराम भीम यांची गोष्ट सांगण्यात येणार आहे.
तेलगू सिनेमामधील रामचरण आणि ज्यु. एनटीआर हे दोन दिग्गज कलाकार या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत.
याशिवाय आणखी एक दिग्गज नाव या चित्रपटाशी जोडलं गेलेलं आहे, बाहुबलीचे दिग्दर्शक एस एस राजामौली! हा चित्रपट देशभरातील प्रेक्षकांना आपलासा वाटावा यासाठी बॉलिवुडमधील अजय देवगण आणि अलिया भट्ट हे दोन कलाकार यात हजेरी लावणार आहेत. हा चित्रपट थिएटरमधे प्रदर्शित होणार असल्याच्या बातम्या आहेत.
४. मक्कर
ऐंशीच्या दशकापासून लोकप्रिय असणारी दिग्दर्शक-अभिनेता जोडगोळी म्हणजे प्रियदर्शन-मोहनलाल. याच प्रियदर्शन यांचा अगामी चित्रपट मक्कर त्यांचा ड्रीमप्रोजेक्ट आहे. १९९६ पासून ते या चित्रपटावर काम करत आहेत. काही ना काही कारणानं या विषयाच्या निर्मितीला मुहूर्त लागत नव्हता.
आज मल्याळम सिनेमा भारतीय सिनेमाचं अविभाज्य अंग बनला आहे. अशा बदलत्या पार्श्वभुमीवर हा चित्रपट नक्कीच जास्तीतजास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. आजवरच्या सर्वात मोठ्या बजेटचा म्हणजे १०० कोटीचा हा चित्रपट आहे.
५. ब्रह्मास्त्र
हा भारतीय पौराणिक कथा विषयावरचा सायफाय चित्रपट आहे. गेली दोन तीन या चित्रपटाची चर्चा जोरदार आहे. रणवीर कपूर, अलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जून, शाहरूख खान अशा एकाहून एक दिग्गजांच्या भूमिका आहेत. अयान मूखर्जीचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट असणारा हा चित्रपट या वर्षाअखेरीपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी चर्चा आहे.
६. पोनिईन सेलवन
दक्षिणेकडील आणखी एक दिग्गज नाव, मणी रत्नम यांचा पोनिईन सेलवन हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. खूप वर्षांपूर्वी म्हणजे १९५८ साली एमजीआर यांनी काल्की कृष्णमूर्ती यांच्या याच नावाच्या कादंबरीवर हक्क चित्रपट बनविण्यासाठी म्हणून विकत घेतले होते. त्या काळातही हा ड्रीम प्रोजेक्ट असणार होता.
या चित्रपटात एमजीआर यांच्यासमवेत वैजयंतीमाला, जेमिनी गणेशन, पद्मिनी यांच्या भूमिका असणार होत्या. या चित्रपटाचं शूटींग मात्र कधीच झालं नाही आणि अखेरीस हा प्रकल्प गुंडाळण्यात आला.
मणी रत्नम पुन्हा एकदा हा चित्रपट घेऊन येत आहेत. दक्षिणेकडील सर्वात ताकदवान असा चोल साम्राज्याचा राजा, अरुलमोलीच्या अवतीभवती याचं कथानक असल्याचं सांगितलं जातं. यात ऐश्वर्या राय नकारात्मक छटेच्या भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटांव्यतिरिक्त दोन भव्यदिव्य वेबसेरीजही भेटिला येणार आहेत. द एम्पायर हा भारतीय GOT चा अवतार समजला जात आहे. यात मुख्य भूमिकेत आहे, कुणाल कपूर. जहीरूद्दीन मोहम्मद बाबरच्या भूमिकेत तो दिसणार आहे. कुणाल व्यतिरिक्त, दिनो मारियो, शबाना आझमी यांच्याही भूमिका यात आहेत.
काय मग मंडळी, तुम्ही सुद्धा यातल्या एखाद्या तरी चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत असालच ना? मग सांगा बरं पटापट, तुम्ही कुठल्या चित्रपटाची वाट बघताय ते?
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.