Site icon InMarathi

‘IIT केलं की करोडो रुपयांचं सॅलरी पॅकेज मिळतं’ जाणून घ्या खरंखुरं वास्तव!

money im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

टीप: या लेखाचा उद्देश आयआयटी बद्दल गैरसमज पसरवून विद्यार्थ्यांचे मनोधैर्य कमी करण्याचा नसून त्यांना आयआयटीशी संबंधित काही अफवांबद्दल माहिती करून देणे आहे, जेणेकरून वास्तविक परिस्थिती त्यांच्या नजरेसमोर येईल.

===

तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की तुमच्या ओळखीतल्या कोणीतरी आयआयटीमधून शिक्षण घेतलं आणि त्याला अगदी रग्गड पगाराची नोकरी मिळाली आहे. अश्या वेळेस जर तुमची नोकरी आणि पगार दोन्ही सामान्य असेल तर मात्र त्या व्यक्तीचा हेवा वाटायला लागतो. असं वाटतं की “आपणही आयआयटी केलं असतं, तर आपल्यालाही करोडो रुपयांचं सॅलेरी पॅकेज मिळालं असतं.”

अनेक जण याच हाय सॅलेरी पॅकेजेसचं स्वप्न पाहून आयआयटी अतिशय मेहनतीने पूर्ण करतात, मात्र जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की, जसं आपण समजत होतो तसं काहीच नाही, तेव्हा मात्र ते डोक्यावर हात मारून घेतात.

आज आम्ही तुम्हाला आयआयटीमधील याच हाय सॅलेरी पॅकेजेस मागचं सत्य दाखवणार आहोत, जे पाहून तुम्ही देखील म्हणालं की हे म्हणजे “नाव सोनाबाई आणि हाती मात्र कथलेचा वाळा.”

indianexpress.com

सगळ्यात पहिली ही गोष्ट लक्षात घ्या की, आयआयटीमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना हाय सॅलेरी पॅकेजेस मिळतात ही देखील एक अफवाच आहे. काही प्रतिभावंत विद्यार्थ्यांना जगातील प्रसिद्ध कंपन्या आपल्या कंपनीमध्ये करोडो रुपयांचे सॅलेरी पॅकेजेस देऊन नोकरी ऑफर करतात आणि आता तर नवीन फॅड आलंय की अश्या एखाद्या विद्यार्थ्याला रग्गड सॅलेरी पॅकेज मिळालं की मिडियावाले त्याची न्यूज बनवतात, त्यामुळे समाजामध्ये असा गैरसमज निर्माण झालाय की “आयआयटी केलं की करोडो रुपयांचे सॅलेरी पॅकेज मिळतं.”

पण असं मुळीच नाही आहे, अगदी ६०० मुलांमध्ये ५-१० मुलंच इतकी नशीबवान असतात की त्यांना करोडो रुपयांची सॅलेरी पॅकेजेस ऑफर केली जातात, पण त्यामागचं वास्तव देखील वेगळ आहे.

ही खालची इमेज बघा, म्हणजे सर्व गोष्टी तुम्ही स्वत:च समजून जाल.

youtube.com

आता आपण इथे वरील इमेजनुसार फेसबुकच उदाहरण बघू,

समजा फेसबुकने कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये आयआयटीमधील एका विद्यार्थ्याला १.४२ करोड रुपयांचं सॅलेरी पॅकेज ऑफर केलंय. आता वरील इमेज मध्ये बघा, त्यात बेसिक पे आहे फक्त – ६५ लाख, म्हणजे वर्षाला त्या विद्यार्थ्याच्या हातात पगार म्हणून फक्त ६५ लाख रुपयेच येणार.

त्यानंतर खाली दिलेला जॉईनिंग बोनस जो आहे १५.४५ लाख रुपये, जो फक्त एकदाच मिळतो, दरवर्षी किंवा दर महिन्याला नाही.

त्या खाली दिलेले स्टॉक ऑप्शन्स जे ६२ लाखांचे आहेत ते देखील एकदाच मिळतात आणि त्यात देखील अनेक टर्म्स आणि कंडीशन्स असतात.

म्हणजे विचार करा जो विद्यार्थी हे स्वप्न बघतो की आपल्याला १.४२ करोड रुपये वर्षाला मिळणार आहेत, त्याला वर्षाला केवळ ६५ लाख रुपये मिळतात. आता तुम्ही म्हणालं ६५ लाख म्हणजे पण भरपूर झाले की…पण तुम्ही एक गोष्ट विसरताय ती म्हणजे- फेसबुक मध्ये कामाला असल्याने त्या विद्यार्थ्याला कामानिमित्ताने अमेरिकेत राहावं लागणार.

म्हणजे इकडचे ६५ लाख जर डॉलर मध्ये कन्व्हर्ट केले तर होतात अंदाजे १,००,००० डॉलर! त्या विद्यार्थ्याला मिळणाऱ्या १,००,००० डॉलर वर अमेरीकेमध्ये अंदाजे ३०-३५% टॅक्स देखील लागणार. म्हणजे त्या विद्यार्थ्याला वर्षाला मिळणार अंदाजे ७०,००० डॉलर्स!

आता जर आपण या ७०,००० डॉलर्सना रुपयांमध्ये कन्व्हर्ट केलं तर होतात जवळपास ४५ लाख रुपये!

बघितलं १.४२ करोडचं सॅलेरी पॅकेज अवघं ४५ लाखांवर येऊन आदळलं, तरीही तुम्ही म्हणत असाल की हे ४५ लाख पण रग्गड झाले, तर आता अमेरिका आणि भारतामधील आर्थिक परिस्थितीकडे एकदा लक्ष द्या. तुम्हाला हे वेगळ्याने सांगायची गरज नाही की भारतातील महागाई आणि अमेरिकेतील महागाई मध्ये किती फरक आहे तो!

आपल्याकडे १००० रुपयात कितीतरी वस्तू येतील, तिथे मात्र १ किंवा २ चं वस्तू येतील. तेथे प्रत्येक गोष्ट भारताच्या तुलनेने भरपूर महाग आहे. म्हणजे हे ४५ लाख जेवढे जास्त वाटतायत तेवढे ते अमेरीकेत राहणाऱ्या माणसासाठी जास्त नाहीत. अमेरिकेमधील हे ४५ लाख म्हणजे भारतातील अवघे १०-१२ लाख रुपये (अंदाजे)!

हा जर सगळा हिशोब मांडला तर हे लक्षात येतं की फेसबुकचं १.४२ करोडचं सॅलेरी पॅकेज म्हणजे प्रत्यक्षात भारतातील १०-१२ किंवा जास्तीत जास्त १५ लाख रुपयांचं सॅलेरी पॅकेज आहे.

वरील इमेज मधील ऑरेकेल या कंपनीच उदाहरण देखील पाहून घ्या. त्या खाली लिहिलेलं देखील आहे की,

जो बेसिक पगार आहे तोच विद्यार्थ्याला मिळणार आहे आणि इतर सर्व आर्थिक फायदे हे केवळ एकदाच मिळणार आहे आणि त्यातही अनेक अटी लागू आहेत.

ही खालची इमेज म्हणजे आयआयटी कानपूर मधील प्लेसमेंट आणि सॅलेरी डिटेल आहे. या इमेज मध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्वात कमी, सरासरी आणि सर्वात जास्त किती सॅलेरी दिले जाते ते सांगितले आहे. (हा सर्व पगार लाखांमध्य आहे.)

entrance-exam.net

हे सर्व वाचून पालकांच्या देखील लक्षात येईल की ज्या आशेने ते आपल्या मुलाला आयआयटीमध्ये पाठवतात, ती रग्गड पगाराची आशा चुकीची आहे. त्यांना वाटत आयआयटीमध्ये मुलगा शिकला म्हणजे त्याला महिन्याला किमान १ लाख रुपये तरी पगार मिळेलच, पण सहसा सुरुवातीला एवढा पगार सगळ्यांनाच मिळतो असं नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version