Site icon InMarathi

ओमिक्रॉनची धास्ती; तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याचे ५ संकेत!

omi 1 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

आपल्या शरीराला जडणाऱ्या विविध व्याधी, प्रामुख्याने बाहेरुन शरीरात येणारे व्हायरस तसेच विविध प्रकारच्या संसर्गाने होणारे आजार याचे मुख्य कारण असते आपल्या शरीरातील कमी झालेली रोगप्रतिकारकशक्ती.

नेहमी आजारी पडणे, सततच्या कुरबुरी, विविध प्रकारच्या अँलर्जी, हाडं मजबूत नसणे अशा अनेक विविध व्याधींनी जर आपण त्रासलेले असू आणि सतत आपल्याला डॉक्टरांची, औषध-गोळ्यांची गरज पडत असेल, तर ही चांगली गोष्ट नव्हे.

कमी वयापासूनच सतत औषधे व गोळ्यांची सवय लागणे यामुळे सुद्धा लवकरच शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची होण्याची दाट शक्यता असते.

 

 

गोळ्या तसेच सिरप किंवा इंजेक्शनच्या माध्यमातून वापरली जाणारी केमिकल्स ही सतत आपल्या शरीरात जात असतील, तर काही काळाने शरीर कोणत्याच उपचारांना प्रतिसाद देईनासे होते.

 

यामुळे आपली नैसर्गिक रोगप्रतिबंधक क्षमता तर संपुष्टात, येतेच मात्र लहान वयातच शरीराची मोठी हानी होण्याचीही शक्यता असते. जसे की, दृष्टी कमजोर होणे, सांधेदुखी, वाताचे विकार, एखादा अवयव लवकर निकामी होणे इ….

हे ही वाचा –      जाणून घ्या ‘गोल्डन मिल्क’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीच्या दुधाचे ७ फायदे!

 

                   –  येणारा काळ धोक्याचा, इम्युनिटी वाढवण्यासाठी आहारात या 14 पदार्थांचा समावेश करा!

सध्या तर गेले सहा महिने आपण सगळेच… हे अख्खं जगच एकाच गोष्टीसाठी झगडतंय.. ते म्हणजे काहीही करुन आपली रोगप्रतिकारक शक्ती नेहमी उत्तम असावी.

त्यासाठी प्रत्येक देशातील लोक आपापल्या हवामानानुसार, उपलब्ध साधनांनुसार, खाण्या-पिण्याच्या सवयींनुसार आपापली रोगप्रतिकारक शक्ती संतुलित ठेऊन उत्तम आरोग्य राखण्याचा प्रयत्न करत आहेत.

तुमच्या लक्षात आलं असेलच, की आपण बोलतोय ते नोव्हेल कोरोना विषाणुच्या वाढत्या संसर्गाबद्दल..

मंडळी जर तुम्ही गेल्या सहा महिन्यात एक गोष्ट जर जाणीवपूर्वक आणि लक्ष देऊन पाहिली असेल, तर तुमच्या लक्षात येईल की, हा कोरोना विषाणूचा संसर्ग बहुतेक सगळ्यांनाचा होतोय किंवा होऊन गेलाय.

 

 

मात्र याची गंभीर लक्षणे त्यांनाच दिसली आहेत, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली होती किंवा अन्य काही रोग संबंधितांच्या शरीरात होते.. उदा.. मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, श्वसनाचे रोग इ.

भारताच्या काही मोठ्या शहरांतील सिरो सर्व्हे सांगतात, की त्या शहरातील ५५ ते ६५ टक्के लोकांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे, मात्र त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसलेली नाहीत. त्यांच्या रक्तात आपोआपच अँटिबॉडीज तयार झालेल्या आढळल्या.

मग आता हे कशामुळे झाले… तर सोपे आहे, की त्या लोकांच्या शरीरात रोगप्रतिबंधक क्षमता ही आधीच विकसित झालेली असल्याने जेव्हा या विषाणुचा संसर्ग त्यांना झाला असेल, तेव्हा लगेचच त्याला लढा देण्यासाठी कोरोनाविरोधी अँटिबॉडीज तयार झाल्या.

 

 

म्हणजेच, जी गोष्ट लसीने किंवा औषधाने साध्य होते, ती शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीने साध्य झाली.

थोडक्यात काय, तर आपली रोगप्रतिकारक क्षमता ही नेहमीच उत्तम राखणे हे आपल्या हातात आहे. मात्र रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली तर काही लक्षणे दिसतात का.. आणि ती कोणती..

आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याचे काही संकेत पुढीलप्रमाणे ….

१ – सातत्याने आजारी पडणे आणि बरे होण्यास जास्त काळ लागणे

 

 

कमकुवत प्रतिकारशक्तीचे सर्वात स्पष्ट चिन्ह म्हणजे बर्‍याचदा आजारी पडणे. यामुळे आपले शरीर हानिकारक जीवाणू, बुरशी तसेच व्हायरस नष्ट करु शकत नाही, परिणामी आपल्याला बाह्य रोगांचे संक्रमण होण्याची अधिक शक्यता असते.

तज्ञांच्या मते, जर आपल्याला वर्षात तीन पेक्षा जास्त वेळा ताप आला असेल आणि बरे होण्यासाठी जास्त वेळ लागला असेल तर, रोगप्रतिकारक शक्ती उत्तम प्रकारे कार्य करत नाही हे सूचित होते.

अमेरिकेतील एका इम्युनोलॉजीच्या अहवालानुसार, जर आपल्याला एका वर्षामध्ये प्रतिजैविक औषधांचा दोन पेक्षा जास्त डोस घ्यावा लागला आणि अगदी साध्या विषाणूचा संसर्ग आपल्यासाठी गंभीर होत असेल, तर आपणास इम्युनोलॉजी डिसऑर्डर झालेली आहे.

 

२ – सतत थकवा जाणवणे

 

 

ठराविक किंवा गरजेपुरत्या तासांच्या झोपेनंतरही जर थकवा जाणवत असल्यास, तुमची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत झाली आहे.

शरीरास आवश्यक तेवढी उर्जा मिळत नसून आवश्यक सामान्य पातळीपेक्षा उर्जा खूप कमी झाल्याने तुम्ही सर्वकाळ थकल्यासारखे वाटू शकता.

 

३ – पोटाचे वाढलेले विकार

 

 

एका विद्यापीठाच्या अहवालानुसार, आपल्या रोगप्रतिकारक शक्तीचा एक मोठा भाग आपल्या आतड्यात सामावलेला आहे.

आपल्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅकमध्ये चांगले बॅक्टेरिया असतात, जे संसर्गाशी लढण्यासाठी कायम सज्ज असतात. जर त्यांच्यात काही असंतुलन निर्माण झाले तर, आपल्याला विविध रोगांचे संक्रमण लवकर होण्याची अधिक शक्यता असते.

आतड्यांतील चांगले बॅक्टेरिया हे पचनाच्या क्रियेत मध्ये मोठी भूमिका बजावतात. म्हणूनच जर वारंवार अतिसार किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या पोटातील समस्या उद्भवू लागल्यास रोगप्रतिबंधक शक्ती कमकुवत झाली असल्याचे समजावे.

हे ही वाचा –  कोरोनाला घाबरण्यापेक्षा रोगप्रतिकारक शक्ति वाढवण्यासाठी “आयुष मंत्रालयाने” सांगितलेल्या या टिप्स फॉलो करा

 

                –    रोज नियमित जॉगिंग-चालण्याचे हे आहेत ८ आश्चर्यकारक फायदे

४ – तोंडातील वाढलेले अल्सर

 

 

काही जणांना सतत तोंडात दाताने स्वत:च्या जीभेला किंवा गालाला चावत राहायची सवय असते. यातून तोंडाचे अल्सर होऊ शकतात. तथापि, अशा व्यक्तींच्या तोंडातील अल्सर कमकुवत प्रतिरक्षा प्रणालीचे संकेत असू शकतात.

अति ताणतणावामुळेही तोंडात अल्सर होऊ शकतात, जे पुन्हा दुर्बल प्रतिरक्षा प्रणालीचे लक्षण आहे. त्यामुळे जीभ आणि गाल चावायची सवय तातडीने मोडणे गरजेचे आहे.

 

५ – शरीरावरील जखमा लवकर न भरणे

 

 

जर कधी भाजले, कापले किंवा शरीरावरील एखादी खोल जखम भरण्यास खूप जास्त वेळ लागत असेल, तर त्याचे प्रमुख कारण म्हणजे कमकुवत रोगप्रतिबंधक शक्ती.

कोणत्याही कारणाने झालेली जखम भरुन काढतानाच आपले शरीर त्या ठिकाणी नवीन त्वचेच्या पुनरुत्पादनास मदत करते. त्यासाठी जखमेत पोषक व समृद्ध रक्त पाठवून जखमेचे रक्षण करण्याचे कार्य करते.

ही उपचार प्रक्रिया निरोगी रोगप्रतिकारक पेशींवर अवलंबून असते. परंतु आपली रोगप्रतिकार शक्ती सुस्त असल्यास या प्रक्रियेला खुप जास्त वेळ लागू शकतो.

अशा रेंगाळलेल्या जखमा पुढे जाऊन गंभीर स्वरुप धारण करू शकतात. प्रामुख्याने मधुमेह असलेल्यांना याचा त्रास होऊ शकतो.

वरील पाच महत्त्वाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मोठ्या संकटाला आपणच आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे त्याकडे कधीही दुर्लक्ष न करता, संबंधित कोणतेही लक्षण दिसल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा व त्यांच्या सल्ल्याने योग्य उपचार घ्यावेत.

===

हे ही वाचा  –   रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यामध्ये सकारात्मकतेचा देखील आहे मोठा हात…!!

 

                   –  सावध व्हा! रोजच्या खाण्यातले “हे” पदार्थ रोगप्रतिकारक शक्ती झपाट्याने कमी करतात!

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version