' “या” कैद्यांना पत्नी फक्त एकदाच भेटतात आणि ‘संबंध’ न ठेवताही मातृत्व घेऊन जातात… – InMarathi

“या” कैद्यांना पत्नी फक्त एकदाच भेटतात आणि ‘संबंध’ न ठेवताही मातृत्व घेऊन जातात…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

इस्त्राइलमधील एक विस्तीर्ण तुरुंग, स्वतःच्या कृत्याची शिक्षा भोगतानाही विरोधी देशाला धुळ चारल्याचा आनंद व्यक्त करणारे अनेक निगरगट्ट दहशतवादी कैदी, आणि महिन्याभरात केवळ एकदाच आपल्या पतीच्या भेटीसाठी आतुरलेल्या त्यांच्या पत्नी… हे दृश्य इस्त्राईलच्या कारागृहात नेहमीच दिसतं. कैद्यांच्या पत्नींना आपल्या पतीला भेटण्यासाठी काही ठराविक दिवशी नियोजत वेळ दिली जाते.

 

dahshatwadi inmarathi

 

महिन्यातील केवळ याच दिवशी कैद्यांना घरचं जेवण चाखता येत असल्याने कारागृहातील विविध खोल्यांमध्ये अनेक खाद्यपदार्थांचा सुगंध दरवळतो. मात्र वरकरणी भावनिक दिसणाऱ्या या भेटीत नेमकी कोणता कट शिजतोय याची तुम्हाला कल्पनाही नसेल.

जगातील एका धगधगत्या देशात स्मगलिंगचं एक भयावह वास्तव ऐकल्यानंतर तुम्हाला स्मगलिंग या विषयाची दाहकता अधिक जाणवेल. आपल्या कल्पनेपलिकडील एक वर्तमान, एक असं सत्य ज्यावर एकीकडे विश्वास ठेवणंही कठीण होत असताना दुसरीकडे त्याचे भेदक परिणामही दिसून येत आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

अनेकांना ही चित्रपटाची कथा वाटेल, काहींना रहस्यमय कादंबरी तर काहींना आंतरराष्ट्रीय राजकारणाला ढवळून काढणारा मास्टरप्लॅन… मात्र हे वास्तव अंगावर शहारे आणत हे मात्र नक्की.

दहशतवादी संघटनांसाठी काम करणा-या कैद्यांना इस्त्राइलच्या तुरुंगात डांबून ठेवले आहे. घरापासून दूरावलेल्या आपल्या पतीला घरचं जेवण घेऊन येणाऱ्या कैद्यांच्या पत्नी जाताना मात्र डब्यासह आपलं मातृत्वही घेऊन जातात, यातही अजब बाब ही आहे की या भेटीदरम्यान त्या पतीपत्नींचा कोणताही शारिरीक संबंध येत नाही.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे नेमकं घडतं कसं? तर याचं उत्तर आहे इस्त्राइलमध्ये वाऱ्याच्या वेगाने फोफावणारा स्पर्म स्मगलिंगचा काळा धंदा.

कानांना खटकणारी ही बाब इस्त्राइलमध्ये प्रत्यक्षात घडतीय. अर्थात बुद्धीला न पटणारा हा अजब प्रकार करणारे हे कैदी कोण? इस्त्राईलच्या तुरुंगात त्यांना का डांबण्यात आलंय? असं विचित्र साहस त्यांच्या पत्नी का करतात? या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकवावं लागेल.

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांचं शत्रुत्व जगाला नवीन नाही. मागील अनेक दशकांपासून दोन देशांमध्ये लढाई सुरु आहे. ही लढाई कधी धर्माची कास धरते तर कधी जागेच्या मालमत्तेची. मुळात हा संघर्ष दोन देशांतील राजकारणाचा नसून पॅलेस्टिनी अरब आणि इस्त्राइलमधील ज्यु यांच्यातील आहे. पश्चिम आशियातील प्रदेशावर ज्यु धर्मिय आणि अरब या दोघांनी दावा केल्याने दोन्ही धर्मात यावरून तेढ निर्माण झाली.

 

flag inmarathi

 

पहिल्या महायुद्धानंतर हा प्रश्न सुटेल अशी आशा व्यक्त करत ब्रिटनने पॅलेस्टिनवर ताबा मिळवला खरा, मात्र प्रत्यक्षात हा गुंता अधिकच वाढला. यातून सुवर्णमध्य काढत यहुदी नागरिकांसाठी इस्रायल या देशाची स्थापना करण्यात आली. परंतु पॅलेस्टाईनला मान्यता देण्यात आली नाही.

आता हा झाला राजकीय प्रश्न, मात्र याचा संबंध आतंकवादी रुप मिळाले ते एका घटनेने. १९८० साली पॉप्युलर फ्रंट ऑफ द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाइन या संघटनेने इस्राईल सैनिकाचं अपहरण करत त्याची हत्या केली. पेटून उठलेल्या सैनिकाने या घटनेचा विरोध करत पेलेस्टाईनमधील अरब नागरिक वालिद डक्का याला अटक करून दहशतवादी हल्ल्याच्या गुन्हांतर्गत त्याला आजन्म कारवास ठोठावला.

israel war inmarathi

 

कारागृहात कैद्यांचा अभ्यास करायला येणारी महिला पत्रकार साना हिच्याशी वालिदने सुत जुळवलं. अनेकांच्या मते हा पेलेस्टाईनसाठी रचलेला मास्टरप्लॅन होता. वालिदच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सानाने त्याला होकार देत मातृत्वाची इच्छा व्यक्त केली मात्र त्यावेळीही कैद्यांना पत्नीसह एकत्र वेळ घालवण्यास असलेली बंदी त्यांच्यासाठी अडथळा ठरली.

तेव्हापासून स्पर्म स्मगलिंगची संकल्पना विकसित झाली असा समज आहे. अर्थात त्याकाळी हे धाडस करण्याचे बळ महिलांमध्ये नव्हते, मात्र सध्या इस्त्राईलच्या तुरुंगात असे प्रकार सर्रास घडतात.

अर्थात हा प्रकार नेमका घडतो कसा? हा प्रश्न अस्वस्थ करतो. तर त्याचं उत्तर त्याहूनही भयानक, भेदक आहे. ही माहिती आपल्यासारख्या सामान्यांचं मन विचलित करणारी असली तरीही हे वास्तव नाकारता येणार नाही.

काळ बदलला तसा दहशतवादही बदलला, अधिक तीव्र, आक्रमक झाला. काळाने आपल्याला दिलेलं तंत्रज्ञानाचं वरदान दहशतवादानेही आपलंस केलं. याच तंत्रज्ञानाने स्पर्म स्मगलिंगलाही बळ दिलं.

 

sperm 1 inmarathi

 

सध्या इस्त्राईलच्या कुरुंगात अनेक कैदी खितपत पडले आहेत. ज्यांचा भविष्यकाळ अंधःकार असल्याची पुर्ण कल्पना आहे तरी आपल्या दहशतवादी संघटनेसाठी काम करण्याचा अभिमान आहे, त्यामुळे स्वतःची सुटका होऊ शकत नसली तरी आपला वंश वाढावा, आपल्याप्रमाणेच आपल्या मुलानेही दहशतवादी संघटनेत सहभागी होत आपलं काम पुढे न्यावं ही क्रुर मानसिकता या कैद्यांमध्ये वेगाने फोफावत आहे.

आपली ही इच्छा पूर्ण करण्यासाठी स्पर्म स्मगलिंग हा एकमेव पर्याय शिल्लक आहे. अर्थात कैदेत असलेल्या आपल्या पतीसाठी वाटेल ते करण्याची तयारी असलेल्या त्यांच्या पतीव्रता पत्नी यासाठी होकार देतात. अर्थात हे सगळं त्या जमवून आणतात हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

महिन्यातील एक दिवस कैद्यांना भेटण्याची कुटुंबियांना परवानगी असते. यापुर्वी या भेटीत पत्नी पत्नीला काही काळ एकांत दिला जायचा. मात्र या भेटीमुळे कैद्यांच्या पत्नी गरोदर रहात असून दहशतवादी चळवळीस बळ मिळत असल्याची जाणीव सरकारला झाली. त्यामुळे या पतीपत्नींना दिली जाणारी सुट रद्द होत केवळ जेवण पोहोचवण्याची सवलत दिली गेलीय.

मात्र आता या भेटीतूनही मातृत्व मिळवण्याचा मार्ग कैद्यांच्या पत्नींनी शोधला आहे. या भेटीत कोणताही शारिरीक संबंध न येताही पुढील नऊ महिन्यात या महिला आपल्या नव-याच्या आपत्याला जन्म देतात. कारण याच भेटीत स्पर्म स्मगलिंग केलं जातंं.

या भेटीदरम्यान जेवणाचा आस्वाद घेताना त्याच डब्यातून आपले वीर्य अर्थात स्पर्म कैद्यांकडून आपल्या पत्नीला सोपवलं जातं. काही महिने हा प्रयोग यशस्वी होत होता. त्याकाळात अनेक महिलांनी आपल्या पतीकडून मिळालेल्या स्पर्मच्या सहाय्याने आपल्या मुलांना जन्म दिला.

 

pregnant woman inmarathi

 

मात्र ही बाब लक्षात येता आता अनेक तुरुंगामध्ये कैद्यांचे डबे परत नेताना तपासले जातात. त्यामुळे काही तुरुंगात आता डब्यातून वीर्याची देवाणघेवाण करता येत नाही अशावेळी प्रशासनाहूनही चलाख असलेल्या दहशतवाद्यांनी चॉकलेटचे आवरण, रिकामे सिगरेट लायटर, अर्धवट कापलेली फळे अशा माध्यमातून वीर्य पत्नीपर्यत पोहोचवले जाते.

यावेळी कैद्यांपेक्षाही अधिक जोखमीचं काम त्यांच्या पत्नीकडून पार पाडलं जातं, कारण हे वीर्य तुरुंगाबाहेर सुरक्षितरित्या घेऊन जाण्यासाठी प्राणांची बाजी लावली जाते.

त्यानंतर यावर वैद्यकीय प्रक्रिया होऊन त्याचा वापर करण्यासाठी डॉक्टरदेखील यामध्ये सहभागी होतात. इस्रायलविरोधात विद्रोह म्हणून डॉक्टर यामध्ये आपला सहभाग नोंदवत अशा IVF करण्यासाठी महिलांकडून अत्यल्प शुल्क घेतात.

 

sperm_egg_illustration.inmarathi

सर्वात महत्वाची बाब म्हणजे या प्रक्रियेसाठी या महिलांना प्रमाणपत्रक दिले जातेे, यामध्ये आपल्याच पतीच्या वीर्याने आपण गर्भवती झालो असून हे मुलं आपल्याच पतीचे आहे असं नमुद केलं जात असल्याने या कायदेशीर प्रमाणपत्रकामुळे त्यांना समाजात विरोध होत नाही.

पॅलेस्टाईनमधील दहशतवाद्यांना इराणचा पाठिंबा असल्याने बहुतांश वेळा ही प्रक्रिया इराणमधील इंफर्टिलिटी क्लिनिक केली जाते. आश्चर्याची बाब म्हणजे यासाठी अरब देश देखील त्यांना पाठिंबा देत इज्राईलला ते आपला सर्वात मोठा शत्रू समजतात.

ज्या डॉक्टरांकडून ही प्रक्रिया केली जाते त्या वैद्यकीय टीमकडून या वीर्याला आणि त्यातूून जन्मणा-या जीवाला  ‘हीरोज ऑफ द फ्यूचर’ म्हटले जाते कारण त्यांतून देशासाठी बलिदान देणारी दहशतवाद्यांची नवी फळी आकार घेते.

 

dahaashtwadi 2 inmarathi

 

सामान्यांच्या कल्पनेेपलिकडील ही संकल्पना आजही इस्त्राईलमध्ये घडत आहे. काही ठिकाणी छुप्याने तर काही ठिकाणी अनेकांच्या साक्षीने. या सगळ्याला जबाबदार कोण? दहशतवादी? त्यांना चिथवणा-या संघटना, आंधळ्या प्रेमाखातर भयावह स्मगलिंग करणा-या त्यांच्या पत्नी? त्यांच्यावर प्रक्रिया करणारे डॉक्टर्स? त्यांना आर्थिक बळ देणारे देश? की इस्त्राईल, पॅलेस्टाईनचे प्रत्यक्ष सरकार?

 

jail inmarathi

 

कदाचित या साखळीतील अनक दुवे अजूनही अज्ञात असतील. मात्र एकीकडे आधुनिकीकरण, पुरोगामी तत्व, आर्थिक वाटचाल यांच्याकडे धावणा-या जगात अशा भीषण घटनाही घडत आहेत, आणि त्या ठाऊक असूनही त्यांना रोखण्याचा फारसा प्रयत्न केला जात नाही हे धोरण दहशतवाद्यांच्या खुल्या हल्ल्यांपेक्षा जास्त भयावह नाही का?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?