Site icon InMarathi

बॉलीवूडच्या या ६ बीभत्स सिनेमांची आजही लोकं प्रचंड टर उडवतात, कारण…

bold movies IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलीवूड सिने इंडस्ट्री हे नाव कानावर पडल्यावर आपल्यासमोर यश चोप्रा, करण जोहर, खान मंडळी, बच्चन साहेब, राजेश खन्ना (पहिला सुपरस्टार) रणबीर कपूर आणि कपूर खानदान अशी मोठमोठी नावं डोळ्यासमोर येतात!

पण यांच्याशिवायही कित्येक नावं आहेत जी बॉलीवूडमध्ये आदराने घेतली जातात पण या लोकांसारखं त्यांना वलय प्राप्त झालेलं नाही. सनी देओल, फिरोज खान, जॅकी श्रोफ, अनिल कपूर, मिथुन चक्रवर्ती सारखे अभिनेते किंवा कांती शाह, रामसे बंधु यांच्यासारखे फिल्ममेकर्स!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या लोकांनीसुद्धा बॉलीवूडमध्ये एक काळ गाजवला, पण यापैकी बहुतेक लोकांनी पडेल ते सिनेमे केले. ८० ते ९० चा एक काळ होता ज्या काळात लोकांची सिनेमा बघण्याची टेस्टच बदलली होती!

 

 

गोविंदा, जितेंद्र सारख्या नायकांचे उथळ पण तितकेच मनोरंजन करणारे सिनेमे लोकं डोक्यावर घेत होते, तिथेच अमिताभ सारख्या मेगास्टारचे अत्यंत हालाखीचे दिवस सुरू होते!

याबरोबरच या काळात बॉलीवूडमधल्या बी ग्रेड सिनेमात झपाट्याने वाढ झाली आणि उतरत्या वयातल्या राजेश खन्ना देव आनंदपासून मिथुन चक्रवर्तीपर्यंत प्रत्येक अभिनेता या अशा कोणत्या ना कोणत्या बी ग्रेड किंवा सी ग्रेड सिनेमात हमखास दिसत होता!

या अशा सिनेमात हिंसा, डबल मीनिंग डायलॉग, भडक दृश्य, अतरंगी फाईट सिक्वेन्स या सगळ्याचा मारा असायचा. आजही या अशा फिल्म्सना सोशल मीडियावर प्रचंड ट्रॉल केलं जातं, यात काम केलेल्या प्रत्येक अभिनेत्याला पश्चात्ताप होत असतो खरा पण या सगळ्या टीकेला त्यांना सामोरं जावंच लागतं!

याच लीगमधला एकदम हटके आणि युट्यूबवरचे सगळे रेकॉर्ड ब्रेक करणारा सिनेमा म्हणजे कांती शहा दिग्दर्शित गुंडा. हा सिनेमा सर्वात जास्त फेमस झाला तो यातल्या अत्यंत भयानक डायलॉगमुळे आणि मिथुन चक्रवर्ती, मोहन जोशी सारख्या बड्याबड्या कलाकारांनी त्यात केलेल्या कामामुळे.

 

 

आजही नेटकरी गुंडाचे मीम्स भरभरून शेयर करत असतात. यातले ते सी ग्रेड लेवलचे डायलॉग आणि हॉलीवूडला टक्कर देणारे अॅक्शन सीन्स साठी लोकं आजही हा सिनेमा युट्यूबवं बघतात आणि पोट धरून हसतात.

या सिनेमाने आजवर जेवढी कमाई केली नसेल त्यापेक्षा कैक पटीने जास्त कमाई युट्यूबवरून मिळालेली आहे.

आज आपण अशाच काही क्रिंज फिल्म्सविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांच्याकडे बघून आपण हा धडा नक्कीच घेतला पाहिजे की फिल्म कशी नसावी ते!

१) गुंडा :

 

 

या यादीत पहिलं नाव याच सिनेमाचं यायला हवंच. आधी म्हंटल्या प्रमाणे क्रींज सिनेमाचा एकमेव बादशाह कोण असेल तर हा गुंडा सिनेमा. १९९८ साली आलेल्या या सिनेमात मिथुनदा, मोहन जोशी, शक्ति कपूर सोबत कित्येक मातब्बर कलाकार आहेत.

पण केवळ “मेरा नाम ही बुल्ला, रखता हूं हमेशा खुलां” “मेरा नाम है पोते जो अपने बाप के भी नहीं होते” अशा अजरामर डायलॉग मुळे, भयावह अॅक्शन सीन्समुळे आणि विमानाची धावपट्टी म्हणजेच रनवे आणि एक आलीशान महाल या दोनच ठिकाणी हे कथानक घडत असल्याने या सिनेमाचा “ऑस्कर” हुकला असावा!

आजही मिथुनदा हे नाव आठवलं की समोर गुंडाच उभा राहतो. लोकांनी या सिनेमाला सध्या सोशल मीडियावर इतकं फेमस केलंय की आजही हा सिनेमा नेटवर ट्रेंडिंगमध्ये दिसेल!

 

२) जानी दुश्मन – एक अनोखी प्रेमकहाणी :

 

 

इच्छाधारी नाग आणि नागिण अशा जोडप्याची ही अफलातून कहाणी आजही बघताना नाक कान डोळे सगळीकडून रक्त येतं! सुनील शेट्टी, आफताब, आणि चक्क सोनू निगम यांनी या सिनेमात अभिनयाचा प्रयत्न केला आहे!

सनी देओल, अक्षय कुमार, मनीषा कोयराला सारख्या अभिनेत्यांनी हा सिनेमा वाचवायचा पुरेपूर प्रयत्न केला पण शेवटी कचऱ्याची जागा ही केराच्या टोपलीतच असते त्याप्रमाणे प्रेक्षकांनी या सिनेमाला केराची टोपलीच दाखवली!

आजही हा सिनेमा आणि यातले हास्यास्पद सीन्स बघितले तरी कित्येकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुमचं मन कमकुवत असेल तर तुम्ही अजिबात या सिनेमाच्या वाटेला जाऊ नका!

३) राम गोपाल वर्मा की “आग” –

 

 

शोले सारख्या अजरामर सिनेमाचा रिमेक करायचा विचार ज्या वेळेस एखाद्या फिल्ममेकरच्या मनात येतो तेंव्हा त्याने समजून घ्यावं की त्याचे पापाचे घडे आता भरले आहेत, आणि आपण इंडस्ट्रीमधून आता गाशा गुंडाळायला हवा!

अशीच काहीशी अवस्था एक गुणी दिग्दर्शक राम गोपाल वर्माची झाली असावी जेंव्हा त्याने आग हा सिनेमा करायचा विचार केला असेल!

एकतर शोले सारख्या सिनेमाची भ्रष्ट कॉपी आणि त्यातून अमिताभ बच्चनला यात व्हिलन आणि अजय देवगणला हीरो दाखवणं इथेच रामु ने सगळी माती खाल्ली, आणि भूत, रंगीला, सत्या, सरकार सारखे सिनेमे देणारा रामु सगळ्यांच्याच मनातून पार उतरला!

रामुच्या ह्या “आग” मध्ये त्याने स्वतःच्या करियरला आहुती दिली आणि या सिनेमाबरोबर रामुच्या करियरचीही राख रांगोळी झाली!

 

४) सेन्सॉर :

 

 

एक दशक लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यावर आपला काळ गेला हे सत्य पचवणं अत्यंत कठीण असतं! देव आनंद आणि राजेश खन्ना या दोघांनाही ते कधीच जमलं नाही. दोघांनी त्यांच्या उतारवयात इतके टुकार सिनेमे केले की ज्यामुळे नंतर लोकांनी त्यांना साफ रिजेक्टच करायला सुरुवात केली!

देव आनंद दिग्दर्शित सेन्सॉर हा २००१ चा असाच एक सिनेमा जो का केला याचं उत्तर खुद्द देव आनंदसुद्धा देऊ शकले नाहीत. एकंदरच फिल्मी दुनियेतल्या सेन्सॉर बोर्ड आणि त्या प्रक्रियेसंदर्भाशी निगडीतच हा सिनेमा होता!

पण खुद्द देव आनंद, हेमा मालिनी, जॅकी श्रॉफ, रेखा, शम्मी कपूर अशी अभिनेत्यांची फौज असूनसुद्धा हा सिनेमा पार आपटला!

काश खऱ्याखुऱ्या सेन्सॉरची कात्री या संपूर्ण सिनेमावरच फिरली असती तर लोकांचा किती त्रास कमी झाला असता नाही का?

 

५) खिलाडियों का खिलाडी :

 

 

खिलाडी कुमार अक्षय कुमार जेंव्हा WWE चॅम्पियन अंडरटेकरची नक्कल करत जी माता दी म्हणत संपूर्ण सिनेमाभार उलटसुलट मारामारी करतो तेंव्हा आपल्याला अंदाज येतो की हा सिनेमा कितपत चालणार ते!

अक्षय कुमार आजजरी एक मोठ नाव असलं तरी त्याने एकेकाळी केलेले सिनेमे बघून त्याच्या घरचे तोंड लपवत फिरतील!

या सिनेमात गुलशन ग्रोवर सोबत त्याचे सीन्स आणि आपल्या आईच्या वयाची असलेल्या रेखा सोबत दिलेले हॉट सीन्स खूप लोकप्रिय झाले, पण हा सिनेमा एवढ्यापुरताच मर्यादित राहिला!

आजही यातलं रेखा आणि अक्षयवर चित्रित झालेलं ते गाणं बघताना डोळे बंद करावे का समोरची स्क्रीन बंद करावी हा प्रश्न सगळ्यांना पडतो!

 

६) बूम :

 

 

उतारवयात फक्त देवसाब किंवा काका यांनीच चुका केल्यात असं नाही. तर आजही बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या शहनशहा बच्चनने सुद्धा कित्येक घोडचूका केल्या आहेत!

त्यापैकी सर्वात महत्वाची चूक म्हणजे २००३ सालचा सिनेमा बूम! अंडरवर्ल्ड रॅकेट आणि ह्युमन ट्राफिकिंग हा विषय असला तरी हा सिनेमा इतका भरकटलेला होता की आजही हा सिनेमा का काढला असं कित्येक लोकं विचारतात?

जावेद जाफरी, गुलशन ग्रोवर, जॅकी श्रॉफ, बच्चन, सीमा बिसवास, बमन इराणी सारखे कलाकार असूनही हा सिनेमा इतका आपटला की यात काम करणाऱ्या लोकांनाही त्याचा खूप त्रास झाला!

हा सिनेमा बॉलीवूडमधली सध्याची मोठी अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यासाठी मोठा ब्रेक ठरला. या सिनेमातल्या अत्यंत बोल्ड सीन्स आणि लुकमुळे तिचं नाव चर्चेत आलं आणि यानंतरच तिला पुढे सगळे ब्रेक मिळाले!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version