Site icon InMarathi

४० हून अधिक vaccine चा जनक; वाचवतोय दरवर्षी ८० लाख लोकांचा जीव

moris 1 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

हॉलिवुडच्या मार्वल, डिसी पटांतून जगाच्या रक्षणार्थ जसे सुपरहिरो आपापली शस्त्रं घेऊन येतात तसाच आधुनिक जगत विविध आजारांचा सामना करण्यासाठी एक सुपर हिरो लसरुपी शस्त्र बनवून मानवाचं आयुष्य अधिकाधिक निरोगी करुन गेला. आधुनिक लसींचा जनक म्हणून ज्यांची ओळख आहे अस डॉ. मॉरिस हिलेमन यांचं नाव म्हणूनच कृतज्ञतापूर्वक उच्चारलं जातं.

 

 

विसाव्या शतकातला चमत्कार म्हणजे मानवाने विविध रोगांवर प्रतिबंधक उपाय म्हणून लावलेला लसींचा शोध. आज कोविडमुळे लस किंवा लसीकरण हा शब्द अक्षरश: घराघरात जाऊन पोहोचला आहे. कदाचित आयुष्यभर ज्यांनी एकही लस घेतली नाही असे काही कोविडमुळे लसीकरणात सहभागी झाले असतील.

पूर्वी अनेक आजारांवर प्रतिबंधक उपायही करता येऊ शकतात या गोष्टीच्या अज्ञानापोटी अनेक रुग्ण मत्यूमुखी पडत असत. जस जसं या क्षेत्रातलं संशोधन होत गेलं तसंतसं रोगावरच्या इलाजापेक्षाही तो होऊच नये म्हणून जर उपाय योजना केल्या तर त्या जास्त फायद्याच्या असल्याचं लक्षात आलं आणि विविध रोगांवरच्या लसींचा शोध लागला.

 

 

लस ही इतिहासातील सर्वात मोठी अशी सार्वजनिक आरोग्य यशाची गाथा आहे. डॉ. मॉरिस हिलेमन यांनी चाळीसहून अधिक लसींचा शोध लावून लसींचे जनक अशी पदवी प्राप्त केली. डॉ. मॉरिस हे अमेरिकेतील प्रख्यात सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (मायक्रोबायोलॉजिस्ट) होते ज्यांनी इम्युनोलॉजिच्या रहस्याची उकल केली. साधारण सहा दशकांत चाळीस लसी विकसीत करून एक प्रकारे विक्रमच स्थापित केला. आज जगभरात ज्या चौदा लसी नियमित केल्या गेल्या आहेत त्यापैकी आठ लसींचा शोध मॉरीस यांनी लावलेला आहे.

३० ऑगस्ट १९१९ साली माईल्स, मॉण्टाना येथे रॉबर्ट आणि एडिथ दांपत्याला झालेले आठवे अपत्य होते. मात्र मॉरिसच्या जन्मानंतर त्याची आई मरण पावली आणि इतकं मोठं कुटुंब एकट्यानं सांभाळणं त्याच्या वडिलांना शक्य होत नव्हतं. त्यानं आपल्या मुलांना जवळच्याच गावातील एका नातेवाईकांकडे त्यांच्या शेतात राहण्यास पाठवून दिले.

 

farms and dairy

इतर भावंडांसोबत मॉरिसही आला आणि शेतीकाम, कुक्कुटपालन यात रमला. पुढे जाऊन त्यानं आपल्या लसींचे श्रेयही या कोंबड्यांना आणि लहानपणी केलेल्या शेतीकामाला दिले. या शेतातच त्यानं आपली पहिली प्रयोगशाळा उभारली. घरी असणार्‍या अठराविश्वे दारिद्र्यामुळे महाविद्यालयात जाऊन शिकणं त्याला शक्य होत नव्हतं.

१९४१ साली मात्र मॉण्टाना स्टेट विद्यापिठातून तो प्रथम आला. यानंतर त्याला शिकागो विद्यापिठाची फेलोशिप मिळाली. १९४४ साली क्लॅमिडिया या रोगावर पुरस्कारप्राप्त प्रबंध लिहिला आणि त्याला सूक्ष्मजीवशास्त्रातील डॉक्टरेट मिळाली.

ई.आर. स्क्विब ॲण्ड सन्समधे काही काळ नोकरी केल्यानंतर मॉरिसनं जॅपनिज बी एन्सेफलायटिसवरची लस निर्माण केली. दुसर्‍या महायुध्दादरम्यान अमेरिकन सैन्याला या रोगानं धोका निर्माण केला होता. या लसीमुळे अमेरिकन सैन्याची खूप मोठी हानी होण्यापासून बचाव झाला.

 

medagadget

१९४८ ते १९५७ दरम्यान त्यांनी आर्मी मेडिकल सेंटर (सध्याचे वॉल्टर रीड आर्मी इस्न्टिट्यूट ऑफ़ रिसर्च) मधे श्वसन रोग विभाग प्रमुख म्हणून काम केले. इन्फ्लूएन्झाच्या विषाणूत होणार्‍या जनुकीय बदलांवर (शिफ्ट ॲण्ड ड्रिफ्ट) त्यांनी संशोधन केलं. या संशोधनामुळे १९५७ साली हॉन्ग्कॉन्ग येथे इन्फ्लूएन्झाचा उद्रेक होऊन महामारि येऊ शकण्याची शक्यता त्याच्या लक्षात आली.

या शक्यतेवर काम करत असताना त्याला आणि त्याच्या सहकार्याला असं लक्षात आलं की हा फ्लूचा नवा स्ट्रेन असून जो लाखो, करोडो लोकांना मरणपंथाला नेऊ शकतो. यानंतर याला प्रतिबंध करू शकणारे ४० दशलक्ष डोस बनवून ते वितरीत केले. ही लस वितरीत होईपर्यंत अमेरिकेत ६९ हजारावर लोक मृत्यूमुखी पडले होते मात्र ताबडतोब लस घेतली तर भविष्यातील मृत्यूचं प्रमाण कमी होऊ शकतं हे लक्षात घेत या लसीकरणावर भर देण्यात आला.

१९६३ सालातली गोष्ट, त्याची मुलगी जेरी हिला गलगुंड झाले. त्यानं याचा प्राथमिक सामग्री म्हणून वापर करून घेत यावरच्या लसीच्या निर्मितीसाठी त्याचा वापर केला. गालगुंड लसीचा जेरिल लिन स्ट्रेन अजाही वापरला जातो. त्यानंच विकसित केलेल्या त्रिकोणीय लसीत (गोवर, गालगुंड आणि रुबेला) एमएमआर या लसीत याचा वापर होतो.

 

 

अनेक लाईव्ह व्हायरस स्ट्रेन समाविष्ट करून बनविलेली आणि तिला मंजूरी मिळालेली ही पहिली लस आहे. याशिवाय मॉरिस यांनी बॅक्टेरियल मेनिंजायटिस, फ्लू अणि हिपॅटायटस बी यांच्यावरच्या लसीही विकसित केलेल्या आहेत. १९७१ साली त्यानं विकसित केलेल्या आणखी एका लसीनं क्रांतिकारक बदल केला. एमएमआर वन शॉट इंजेक्शनमुळे एकाच डोसमधे संपूर्ण संरक्षण मिळू लागलं.

प्रगत देशातील करोडो बालकांचं बाल्य निरोगी आणि हसतं, खेळतं करण्याचं श्रेय पूर्णपणे या लसीच्या जनकाला, डॉ. मॉरिस हिलेमन यांना जातं.

एका बाजूला मनुष्यजातीसाठी लसींचा शोध लावण चालू असतानाच दुसरीकडे डॉ. मॉरिस यांनी पोल्ट्री क्षेत्रासाठीही लस विकसित केली. १९७१ साली मारेक रोगावरची लस आणली. एक विशिष्ट विषाणूमुळे कोंबड्यांना लिम्फोमा होऊन पोल्ट्रि उद्योजकांचे लाखो डॉलर्सचे नुकसान होत असे. या लसीमुळे कोंबड्या रोगमुक्त झाल्या आणि उद्योजकांनाही दिलासा मिळाला.

 

smithsonian magzine

हे ही वाचा – कोव्हीशील्ड आणि कोवॅक्सीन लशींचे कॉकटेल अधिक प्रभावी आहे का? वाचा

निवृत्तीनंतर डॉ. मॉरिस जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार म्हणून कार्यरत होते. मृत्यूसमयी त्यांचं वय होतं ८५ आणि त्यावेळेस ते फिलाडेल्फिया येथील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात बालरोग शास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक होते. डॉ. मॉरिस यांनी आपली प्रयोगशाळा कायमच एखाद्या लष्करी तुकडीप्रमाणे चालवली. प्रकल्पाचे सर्व टप्पे बारकाईनं निरिक्षण करणे, मूलभूत सांशोधन, क्लिनिकल संशोधन आणि विकास, उत्पादन यावरही त्यांच बारीक लक्ष असे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version