शोर बाजार ते चोर बाजार – ‘स्वस्तात मस्त’ शॉपिंग डेस्टिनेशनचा इतिहास माहित हवाच!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई जगभरातल्या पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिली आहे.
‘ड्रीम सिटी’ आणि ‘बॉलीवुड सिटी’ म्हणून ओळखले जाणाऱ्या मुंबई शहराला अजून आकर्षक बनवतात त्याची पर्यटन स्थळे.
तुम्ही कधी मुंबईच्या चोर बाजाराविषयी ऐकले आहे? तुम्हाला माहिती आहे की या चोर बाजाराला दीडशे वर्ष जुना इतिहास आहे?
तुम्हाला हे माहित आहे का की या चोर बाजाराच्या नावाचे अनेक रंजक किस्से आहे? जर तुम्हाला माहित नसेल असेल तर या सर्व प्रश्नांचा उलगडा आम्ही आज करणार आहोत.
चोर बाजार :
जर तुम्ही मुंबईत राहणारे असाल आणि तुम्हालाही शॉपिंगची ची आवड असेल तर चोर बाजार हा प्रत्येक शॉपिंग लवर साठी उत्तम डेस्टिनेशन आहे.
इथे विविध वस्तू मिळतात तेही एकदम स्वस्त दरात! त्यामुळे तुम्हालाही ही ‘लो कॉस्ट शॉपिंग’ करायची असेल तर तुम्ही चोर बाजाराला भेट दिली पाहिजे.
चोर बाजाराला चोर बाजार हे नाव कसे पडले?
चोर बाजाराला चोर बाजार हे नाव पडण्याचा किस्सा दिडशे वर्षं आधीचा आहे जेव्हा मुंबईवर ब्रिटिशांची राजवट होती. त्याकाळात व्यापाऱ्यांमध्ये हे बाजार प्रसिद्ध होते.
विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहक याच बाजारात येत असत आणि त्या काळात या बाजाराला चोरबाजार नव्हे तर ‘शोर बाजार’ म्हटले जायचे. हिंदी मध्ये शोर चा अर्थ आवाज होतो, हे आपणा सर्वांना ठाऊक असेल.
ब्रिटिश राजवटीत गर्दीमध्ये होणाऱ्या ग्राहकांच्या आणि विक्रेत्यांच्या गोंधळातून सारा बाजार गजबजून जात असे त्यामुळेच याला शोर बाजार म्हटले जाई.
ब्रिटिश राजवटीत मुंबई पोर्ट भागात राणी विक्टोरिया भेट द्यायला आली असताना तिचे वायोलिन आणि आणि अन्य महत्त्वाच्या वस्तू चोरी झाल्या आणि त्यानंतर त्या वस्तू या बाजारात सापडल्या.
असे काही किस्से या बाजाराशी संबंधित आहेत. पण तरीही ही या बाजाराला चोर बाजार होण्याचे कारण काही वेगळे आहे.
ते म्हणजे ब्रिटिशांनी या बाजाराचे उच्चारण शोर बाजाराच्याऐवजी चोर बाजार असे केले. त्यामुळे या बाजाराला चोर बाजार हे नाव पडले.
या बाजाराचा उल्लेख अनेक प्रसिद्ध कादंबऱ्यांमध्ये झाला आहे उदाहरणार्थ रोहिंतोन मिस्ट्री यांच्या ‘सच अ लॉन्ग जर्नी’ या कादंबरीत चोर बाजाराचा नॉट अ नाईस प्लेस असा उल्लेख करण्यात आला आहे.
डॅनियल इफांस यांची चोर बाजारावर आधारित ‘द स्फूल मेन’ ही शॉर्ट डॉक्युमेंटरी २०१६ साली आली होती. जीची पॅरिसमध्ये आयोजित इथनोग्रा फिल्म फेस्टिवल २०१९ साठी निवड झाली होती.
इकडचे स्थानिक रहिवासी म्हणतात की जर मुंबईमध्ये तुमची कोणतीही गोष्ट हरवली असेल तर ती चोर बाजारात सापडते. पण आता असे दिसत नाही.
पण जर तुम्ही चोर बाजाराला भेट द्यायला जात असाल तर खिसेकापूची काळजी नक्कीच घ्या!
चोर बाजारातून कोणत्या वस्तूंची खरेदी करावी?
आधीच सांगितल्याप्रमाणे चोरबाजार हे मुंबईतील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, अँटिक वस्तू, शूज, चप्पल, कपडे अशा नगण्य वस्तू तुम्हाला इथे सापडतील.
असे म्हटले जाते की जर तुमचे एखादे वाहन चोरीला गेले असेल तर तुम्ही चोर बाजाराला नक्कीच भेट दिली पाहिजे. कारण अशा सर्व चोरीच्या वस्तू इथे पोहोचतात आणि विक्रेते त्याचे भाग डिसमेंटल करून इथे विकतात.
आम्ही तुम्हाला चोरबाजारात सापडणाऱ्या काही रंजक वस्तूंची माहिती देणार आहोत!
ऑटोमोबाईल संबंधित गोष्टी :
जर तुम्ही चोर बाजारात प्रवेश केलात तर तुम्हाला सर्वप्रथम ऑटोमोबाईलशी निगडीत दुकाने दिसू लागतील. गाडीचे विविध पार्ट्स, वाहनांची संबंधित विविध इलेक्ट्रॉनिक आयटम्स इ. तुम्हाला इथे दिसतील.
जर तुम्हाला वाहनांचे स्पेअर्स पार्ट खूप कमी दरात हवे असतील तर तुम्ही चोर बाजारात जायला हवे.
अँटिक वस्तू :
जुने पुतळे, तांब्याचे आर्टिकल्स, जुनी नाणी, आजोबांच्या काळातील घड्याळं, टाईप राईटर, विंटेज कॅमेरा आणि यांसारख्या कितीतरी जुन्या अँटिक वस्तू तुम्हाला या बाजारात मिळतील.
महत्त्वाचे म्हणजे अनेक मूवी प्रोडक्शन कंपनींना त्यांच्या चित्रपटात जुना काळ उभारायचा असेल तर ते जुन्या वस्तू याच भागातून मिळवतात.
चप्पल शूज आणि बूट :
आधीच सांगितल्याप्रमाणे या चोरबाजारात तुम्हाला विविध चोरी केलेल्या वस्तू मिळतील. या चोरबाजारात देड गल्ली नावाची जागा आहे.
या देड गल्लीमध्ये दर शुक्रवारी सकाळी चार ते आठ वाजेपर्यंत बाजार भरतो आणि त्यात तुम्हाला चोरी केलेले उत्तम उत्तम ब्रँडेड शूज स्वस्त दरात मिळतात.
मूवी पोस्टर शॉप :
मुंबईला बॉलीवूड सिटी म्हणून ओळखली जाते. पूर्वी बॉलीवूड मध्ये येणाऱ्या चित्रपटाचे पोस्टर या चोर बाजारात मिळायचे.
जर तुम्ही चित्रपट प्रेमी असाल तर तुम्हाला आजही जुन्या काळातील चित्रपटांचे पोस्टर चोर बाजारात मिळतील.
जर तुम्ही चोर बाजाराला भेट देणार असाल तर काही लक्षात घेण्यासारख्या गोष्टी :
हे मार्केट शनिवार ते गुरुवार सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरू असते. या बाजारातील ९० टक्के विक्रेते मुस्लिम असल्यामुळे शुक्रवारी या बाजारातील बरीच दुकाने बंद असतात.
या बाजारापर्यंत कसे पोहचावे?
चोरबाजार हे दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार जवळ मटन स्ट्रीटवर आहे. लिंकिंग रोड, भेंडीबाजार आणि मुंबई मेंट ही काही लँडमार्क आहेत.
मुळात चोर बाजार हे खूप प्रसिद्ध आहे त्यामुळे तिथवर पोहोचण्यासाठी तुम्हाला कोणत्याही लँडमार्क ची गरज लागणार नाही. तुम्ही मुंबईत कोणत्याही टॅक्सी ड्रायव्हरला सांगितले तर तो तुम्हाला इथवर सोडेल.
या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या पुढ्यात बी एसटीचा पर्यायसुद्धा आहे. मुंबईतील कितीतरी बस स्टॉपवरून तुम्हाला चोर बाजारात पोहोचण्यासाठी अनेक बस मिळतील.
जर तुम्हाला ट्रेनने जायचे असेल तर तुम्हाला सेंट्रल रेल्वे च्या ग्रँट रोड स्टेशन वर उतरावे लागेल आणि आणि तिथून थोडे चालल्यावर तुम्ही चोर बाजारात पोहोचू शकता.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.