Site icon InMarathi

शेतीसाठी गुंतवले १० हजार, आता कमाई महिन्याला लाख रुपये, वाचा, तुम्हीही करा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

‘पच्चीस दिन मे पैसा डबल!’

फिर हेरा फेरी मधल्या राजूचा हा डायलॉग कोणाला माहीत नाही? नंतर  ते फसतो हे पण माहीतच असेल.

पण, कर्नाटकातल्या महेश कुमार या तरुणाने अशी ‘स्कीम’ शोधून काढली, की आता तो महिन्याला एक लाख कमवत आहे. आणि ही कोणती फसवण्याची युक्ती नसून, त्याच्या मेहनतीचं फळ आहे

होय मेहनत… अन ती म्हणजे ‘शेती.!’

फक्त दहा हजार रुपये गुंतवून महिन्याला एक लाख रुपयांचं उत्पादन महेश कुमार आज घेत आहे. आणि त्याच शेती उत्पादन आहे मशरूम म्हणजेच अळिंबे!

 

 

‘नोकरी सोडून स्वतःचा बिझनेस टाकायचा आहे!’ आज कित्येक तरुणांच्या डोक्यात असलेला विचार. पण प्रत्यक्षात उतरवतात त्यांची संख्या तशी कमीच.

महेश कुमार अशाच बिझनेस करण्याच्या मूड मध्ये असलेला तरुण. सात आकडी वार्षिक पगार, गाडी, घर सगळं म्हणजे एकूण छान आयुष्य होतं.

पण बिझनेस करण्याचं वेड काही स्वस्त बसू देईना. शेवटी २०१६ मध्ये नोकरी ला रामराम ठोकून आपल्या स्वप्नांच्या दिशेकडे निघाला. बागायती शेतीकडे!

नोकरी सोडण्याबद्दल महेश म्हणतो,

हैदराबादच्या रेप्युटेड फर्म मध्ये एचआर प्रोफेशनलिस्ट म्हणून काम करत होतो. वर्क प्रेशर आणि इतर गोष्टींमुळे पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफचा बॅलन्स बिघडला होता.

कुटुंबाला वेळ देता येईना. काही वेगळं करायच्या इच्छेने नोकरीचा राजीनामा देऊन टाकला.

बिझनेस साठी शेतीच का? तर या प्रश्नाचं उत्तर देताना महेश म्हणतो,

शेती मध्ये आजही प्रयोग करायला भरपूर वाव आहे. त्यात लहानपणापासून मी स्वतःची एक बाग तयार केली होती. कालांतराने त्याच बागेत आंब्याची झाडे लावली आणि ती सुद्धा तीन वेगवेगळ्या प्रकारची.

ऑनलाइन ‘कलम कसे करतात’ याचे ट्युटोरियल पाहून या आंब्याची लागवड केली.

आता महेश समोर दोन प्रश्न होते.

एक म्हणजे शेती साठी जागा आणि दुसरं म्हणजे दमट हवामानात कशाचं उत्पादन करायचं. भरपूर रिसर्च,अभ्यास,भेटीगाठी करून अंततः मशरूमचं उत्पादन घ्यायचं ठरलं/

मशरूमचं का?

 

 

मशरूम कोणत्याही प्रकारच्या वातावरणात वाढतात शिवाय कमीत कमी पाणी वापरून शिवाय, आंध्रप्रदेश मध्ये मशरूमचं उत्पादन एवढं घेतलं जात नाही. फक्त बटन मशरूम तेवढं माहीत असल्यामुळे त्याच उत्पादन घेतलं जातं.

मशरूम मध्ये व्हिटॅमिन बी, फायबर,प्रोटीन आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात आढळून येते.

महेशने बटन मशरूम व्यतिरिक्त इतर मशरूमचं उत्पादन घ्यायचे ठरवले. खास करून मिल्की मशरूम आणि ऑईस्टर मशरूम. पण, इंटरनेट वर या मशरूमच्या लागवडी साठी जास्त काही माहिती मिळाली नाही.

फक्त दोन पत्ते (address) मिळाले.

एक म्हणजे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्हलपमेंट,हैदराबाद आणि दुसरं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ होर्टीकल्चर रिसर्च, बंगळूर.

या इन्स्टिट्यूट मधल्या ट्रेनिंग सेशन मधून मशरूमच्या लागवडीसाठी लागणारी इत्यंभूत माहिती मिळाली.

महत्त्वाचे म्हणजे या मशरूमची लागवड घरात सुद्धा केली जाऊ शकते, ही लाख मोलाची गोष्ट त्याला इथून समजली.

 

 

१०,००० रुपये गुंतवणूक करून महेश ने सर्वप्रथम बंगळूरच्या इन्स्टिट्यूट मधून ऑईस्टर मशरूमच्या बिया, पॅडी मशरूमच्या स्ट्रॉ आणि लोकल मार्केट मधून खोली मध्ये दमटपणा निर्माण करण्यासाठी ह्युमिडीफायर घेतलं.

स्ट्रॉ ची वाढ थांबवण्यासाठी महेश कडे काही वेगळी व्यवस्था नव्हती. त्यामुळे गरम पाण्यात ते स्ट्रॉ साफ करून मग वाळवून बियांसोबत त्याला पिशवीत ठेवून सात दिवसांसाठी त्यांना अंधाऱ्या खोलीत ठेवले.

सात दिवसानंतर नको असलेला भाग कापून मशरूम तयार.

महिन्याभरात महेश ने ५० ते ६० किलो ऑईस्टर आणि मिल्की मशरूम चं उत्पादन घेतलं आणि लोकल मार्केट मध्ये विकायला काढले. पण हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने प्रॉफिट मिळवणे अवघड झाले.

त्याप्रमाणे महेशने स्ट्रेटेजी वापरून आपल्या प्रोडक्टचे मार्केटिंग सुरू केले. पण, मिल्की आणि ऑईस्टर मशरूम बद्दल माहिती नसल्या कारणाने सुपर मार्केट स्टोर हे मशरूम घ्यायच्या भानगडीत पडत नव्हते.

अन पुन्हा महेशला अपयश पाहावं लागलं.

काही तरी वेगळं करून आपलं उत्पादन मार्केट मध्ये उतरवायचं या इर्षेने उठलेल्या महेशने आपल्या शेतीचा व्हिडीओ बनवून आपल्या उत्पादनाचे फायदे तो व्हिडीओच्या माध्यमातून स्टोअर मालकांना सांगू लागला.

आपल्या उत्पादनाचे पॅमप्लेट बनवून तो मार्केट मध्ये वाटू लागला.

शेवटी व्हिडीओ आणि महेशची त्यामागील मेहनत बघून काही स्टोअर मालकांनी मशरूमसाठी होकार दिला. पण एका अटीवर. जनतेचा प्रतिसाद मिळेपर्यंत मशरूम स्टोअर मध्ये एकही रुपया न घेता येणार.

या अटीमुळे जवळपास पाच लाख सॅम्पल मशरूम त्याने हैदराबाद मधल्या दुकानांमध्ये फुकट वाटले.

 

 

२०१७ चा शेवट येईपर्यंत हैदराबादच्या प्रत्येक लहान-मोठ्या शॉप-स्टोअर मध्ये मिल्की आणि ऑईस्टर मशरूम दिसू लागले. आणि महेशला मशरूमच्या ऑर्डर्स यायला लागल्या.

‘स्वस्तिक मशरूम’ नावाने आपला बिझनेस रजिस्टर करून महेश आपलं उत्पादन मार्केट मध्ये उतरवू लागला. हैदराबाद पर्यंत मर्यादित असलेलं महेशचं डिस्ट्रिब्युशन २०१८ च्या मध्यापर्यंत पूर्ण आंध्रप्रदेश मध्ये पसरलं.

आणि महिनाकाठी लाख भर रिटर्न त्याला यामधून मिळू लागला.

हैदराबाद, बंगळूर मध्ये ट्रेनिंग मधून मिळालेल्या माहितीमधून आणि स्वतः मशरूम उगवण्यासाठी तयार केलेलं मशीन महेश इतरांना सुद्धा देऊ लागला.

 

 

ही जी मशीन आहे ती मार्केट मध्ये ‘ऑटोक्लेव मशीन’ म्हणून उपलब्ध आहे. ज्याची किंमत पन्नास हजार ते एक लाखाच्या घरात आहे.

थोडं रिसर्च आणि जुगाड करून महेशने हीच मशीन ८५०० रुपयांमध्ये उपलब्ध करून दिली. मशरूमचे उत्पादन घेण्यासोबत महेश इतरांना याचे ट्रेनिंग सुद्धा देऊ लागला.

बेरोजगार असलेल्या तरुणांना, गृहिणींना आणि शेती मध्ये रस असलेल्या इतरांना रोजगाराचा मार्ग उपलब्ध व्हावा हा या मागचा हेतू.

छोटीशी इन्व्हेस्टमेंट करून बियाणे पासून इक्विपमेंट पर्यंत सगळ्या गोष्टी महेश कडून घेता येतात.

आजपर्यंत जवळपास ५००० जणांना महेशने ट्रेनिंग दिलं आहे.  त्यापैकी ३० पेक्षा जास्त जणांनी स्वतःचा मशरूमचा व्यवसाय महेशच्याचं देखरेखीखाली सुरू केला आहे.

महेश बद्दल ऐकल्यानंतर अनिता रेड्डी या अकाउंटट असलेल्या महिलेने सुद्धा नोकरी सोडून मशरूमच्या बिझनेस मध्ये उतरण्याचा निर्णय घेतला.

अनिता म्हणतात,

“ऑक्टोबर २०१९ मध्ये मी महेश यांचा ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड केला. त्यानंतर महेश यांनी स्वतः सेटअप माझ्या घरी उभारून दिला. गरज असलेले रॉ मटेरियल सुद्धा त्यांनीच पुरवले.

उत्पादन व्यवस्थित येईपर्यंत काही आठवडे महेश नियमित भेट देत राहायचे.मिळालेल्या यशामुळे आयुष्यात स्वतः काही करू शकू असा आत्मविश्वास निर्माण झाला.”

अनिता रेड्डी आठवड्याला १० किलो मशरूमचं उत्पादन घेतात आणि त्यामार्गे महिना रुपये २५००० पेक्षा जास्तचं त्यांची कमाई आहे. 

महेश फक्त मशरूम वरचं नाही थांबला. तर मशरूमचं बायप्रोडक्ट सुद्धा त्याने सुरू केलं. मशरूम लोणचे, सूप पावडर,नूडल्स वगैरे. आणि हे सर्व FSSAI अप्रूव्ह प्रोडक्ट आहेत.

 

 

‘भगवतीमहिमा ऍग्रो टेक एलएलपी’ नावाची कंपनी सुद्धा महेश ने रजिस्टर केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून ऑरगॅनिक शेतीच्या माध्यमातून विविध उत्पादन घेणे, महेशचा हेतू आहे.

त्यासाठी हैदराबाद पासून १०० किमी लांब असलेल्या शमशाबाद येथे महेशने ८० एकर जमीन सुद्धा घेतली आहे. या शेतीच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या मधाचे उत्पादन घेतले जाणार आहे.

२०१६ साली नोकरी सोडणारा एचआर कर्मचारी त्याच्या आताच्या यशाबद्दल तेव्हा विचार करू शकत होता? तर नाही! पण नोकरी सोडल्याचा निर्णय योग्यच होता हे आजच त्याचं यश सांगतंय.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version