Site icon InMarathi

गरजू मुलांना ऑनलाईन शिक्षण देऊन करोडोंचा व्यवसाय करणारा तरुण आहे तरी कोण?

upsc inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

एखादी व्यक्ती असते, अगदी वादळासारखी,
तिला फक्त पुढे जाणं इतकंच ठाऊक असतं,
मध्ये येणारे सगळे अडथळे पार करून ती व्यक्ती फक्त पुढे जात राहते आपल्या ध्येयाकडे.

भारतात सुद्धा अशा अवलियांची काहीच कमी नाही. कोणी अक्खा पहाड खोदून रास्ता बनवतं, तर कोणी नदीतून पोहून जाऊन शिक्षणाची तहान भागवतं, एक व्यक्ती अशी आहे जिने चक्क IAS सारख्या मोठ्या हुद्द्याची नोकरी सोडून, गरजू विद्यार्थ्यांकरिता त्यांना कमी दरात शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी स्वतःचा व्यवसाय सुरु केला, आणि आज ती कंपनी १४००० करोड इतक्या किमतीची झाली. कोण आहे ही व्यक्ती, काय आहे तिचा प्रवास, चला जाणून घेऊया –

 

jagran.com

 

रोमन सैनी असं या व्यक्तीच नाव आहे. रोमन हा लहानपणा पासूनच एक अत्यंत हुशार विद्यार्थी आहे. हुशारी बरोबरच रोमनमध्ये कठोर परिश्रम करण्याचासुद्धा गुण होता. ज्याच्या बळावर त्याने वयाच्या फक्त १८ व्या वर्षी AIIMS ची एंट्रन्स परीक्षा पास करून AIIMS मध्ये Mbbs साठी प्रवेश मिळवला.

भारतातून या इन्स्टिट्युट मध्ये प्रवेश मिळवणारा रोमन हा सगळ्यात लहान वयाचा विद्यार्थी आहे. रोमनने आपला MBBS चा अभ्यास पूर्ण करून डॉक्टर बनण्याचा मान मिळवला. अनेकांसाठी डॉक्टर बनणं एक मोठं आव्हान असतं, पण रोमन ने ते एका झटक्यात पार पडलं. त्या नंतर त्याने AIIMS च्या नॅशनल ड्रग डिपेंडेंस ट्रीटमेंट सेंटर (NDDTC) इथे काम करणं सुरु केलं.

 

India TV news

 

NDDTC मध्ये काम करणं हे अनेकांसाठी त्यांच्या जीवनाचं सर्वोच्च ध्येय असत, पण रोमन सैनीसाठी मात्र ही नोकरी फक्त एक पायरी होती. त्याने केवळ ६ महिन्यातच NDDTC ची नोकरी सोडली कारण त्याचं ध्येय हे यापेक्षा सुद्धा मोठं होतं. त्याने आपली उत्तम पगार असलेली नोकरी सोडून UPSC चा मार्ग निवडला.

MBBS सोडून UPSC? असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात येत असेल. पण रोमनच्या या मोठ्या निर्णयामागे सुद्धा एक गोष्ट आहे. तो जेव्हा MBBS इंटर्नशिपच्यावेळी हरियाणाच्या दयालपुर गावात पोस्टिंगवर असताना त्याला तिथल्या लोकांची परिस्थिती फार दयनीय वाटली.

तिथल्या लोकांची आर्थिक ओरिस्थिती, त्यांना सरकार कडून मिळणाऱ्या सुविधांचा अभाव हे सगळं पाहता, त्याला त्यांच्या सुख सुविधांची जबाबदारी त्याची स्वतःची वाटली. त्यामुळे त्याने UPSC चा अभ्यास सुरु केला. दिवस रात्र अभ्यास करून, UPSC ची परीक्षा वयाच्या २२व्या वर्षी उत्तीर्ण केली.

 

 

या वेळीसुद्धा रोमन हा भारतातून पुन्हा सर्वात कमी वयात UPSC उत्तीर्ण झालेला विद्यार्थी ठरला. सगळ्यात कमी वयात IAS अधिकारी बनणाऱ्यांच्या यादीत त्याच्या  नावाचा समावेश झाला.

पुढे कलेक्टरच्या रुपात त्याची पोस्टिंग मध्य प्रदेशात करण्यात आली. पण पुन्हा तसंच झालं. रोमन सैनीने अवघ्या ६ महिन्यातच ही सुद्धा नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या पुढल्या मोठ्या ध्येयाचं प्लॅनिंग करणं सुरु केलं.

रोमन सैनी आणि गौरव मुंजाल या दोन तरुणांनी मिळून unacademy ह्या online ज्ञान प्रदान करणाऱ्या कंपनीची स्थापना केली. २०१० साली एका youtube चॅनेलच्या स्वरूपात कंपनी सुरु झाली. UPSC च्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत ज्ञान देण्याचं कार्य सुरू झालं. आणि पाहता पाहता हे चॅनेल भारतात भरपूर लोकप्रिय झालं.

 

business today

 

२०१५ साली मुंजाल, सैनी आणि त्यांचे तीसरे सह-संस्थापक हेमेश सिंह या तिघांनी मिळून Unacademy या official कंपनीची स्थापना केली. अत्यंत कमी दरात UPSC च्या अभ्यासकांसाठी त्यांच्या ऍप द्वारे लाईव्ह क्लासेस, टेस्ट पेपर, मॉक टेस्ट या सगळ्याचा पुरवठा करण्यात येत होता.

Unacademy हा प्रोजेक्ट इतका जोरदार यश मिळवून देणारा ठरला की आता २०२० पर्यंत त्यांचं शिक्षकांच नेटवर्क वाढून त्यांना आता १८,००० शिक्षक जोडले गेले, ह्याच बरोबर रजिस्टर्ड युजर्सच्या संख्येतही वाढ झाली व ती वाढून २०२० मध्ये unacademy ची ऍक्टिव्ह युजर्सची संख्या ५ करोड इतकी झाली.

 

DNA

हे ही वाचा – भारतातील सर्वात तरुण आयएएस अधिकारी आहे महाराष्ट्राचा “हा” सुपुत्र!

मनुष्यबळ वाढत असतानाच त्यांच्या कंपनीची किंमत सुद्धा झपाट्याने वाढत गेली.  २०२१ पर्यंत ती वाढत वाढत २ अरब डॉलर म्हणजे जवळपास १४,८३० करोड रुपये इतकी झाली आहे.

रोमन सैनीला त्यांच्या इतका उत्तुंग यशाचं गुपित विचारलं तर ते नेहमी एकच गोष्ट सांगतात “कोणीही जिनियस बनून जन्माला येत नाही. आपल्या परिश्रमांना, कर्मांनी आपण आपलं भविष्य ठरवतो.

आपण सगळ्यांनी आपलं ध्येय निश्चित करून त्याकडे वाटचाल करणे सुरू करायला पाहिजे. तुम्हाला स्वतः वर आणि स्वतःच्या ध्येयावर जर पूर्ण विश्वास असेल तर कोण तुमच्या निर्णयावर काय मत मांडतंय, किंवा लोक काय म्हणतायत हा विचार पूर्णपणे डोक्यातून काढून टाकायला हवा. आपला समाज काय म्हणेल ही भीती तर अजिबात बाळगायला नको.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version