Site icon InMarathi

5G च्या नावाने दिशाभूल!? 5G फोन घ्यायचा की नाही, हे ठरवण्याआधी या गोष्टी वाचा…

5 g technology inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

नवीन फोन विकत घेतांना 5G घ्यावा की 4G ? हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडत असेल. आकर्षक जाहिरात, फोनचे फायदे इतक्या छान पद्धतीने आपल्याला सांगितले जातात, की असं वाटतं थोडे जास्त पैसे गेले तर चालतील पण फोन हा सर्व फंक्शन्सनी परिपूर्ण असा भारीच असला पाहिजे. पण, खरंच 5G फोनची भारतात गरज आहे का? जाणून घेऊयात.

 

 

5G चा वेग

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनपेक्षा जास्त म्हणजे १ गिगाबाईट प्रति सेकंद (Gbps) इतक्या गतीने मोबाईलवर डेटा डाउनलोड करता येईल असा दावा 5G फोन तयार करणाऱ्या ‘क्वॉलकॉम’ या कंपनीने केला आहे.

5जी फोनबद्दलची माहिती ग्राहकांना सांगण्यात, त्याबद्दल आकर्षण निर्माण करण्यात ‘क्वॉलकॉम’ कंपनीचा सिंहाचा वाटा मानला जातो.

4G फोन हे सध्या आपल्याला ‘लो किंवा मिडल बँड’ नेटवर्कचा वापर करून आपलं काम करत असतात. हा स्पीड खूप चांगल्या नेटवर्क असलेल्या भागात १०० ते २०० मेगाबाईट्स प्रति सेकंद इतका असतो.

5G  फोन हे ‘मल्टि बँड’ क्षमतेचे असतात. ‘हाय बँड’ म्हणजेच 4G मोबाईलपेक्षा ५ पट गतीचा, नेटवर्क कॅच करण्याचा दावा केल्याने या फोनबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

 

हे दावे खरे आहेत का?

भारतात तरी याचं उत्तर सध्या ‘नाही’ किंवा ‘कदाचित’ असं द्यावं लागेल. नवीन फोन घेतांना तो 5G आहे की नाही ? हे का महत्वाचं नाहीये याची ही ५ कारणं आहेत…

१. नेटवर्क

5G नेटवर्क भारतात सुरू होण्यासाठी अजून काही महिने लागणार आहेत. नेटवर्क स्पेक्ट्रम हे भारतात लिलाव पद्धतीने वाटप केले जातात. 5G स्पेक्ट्रमचा अजून कोणताही लिलाव भारतात झालेला नाही.

केंद्रीय दूरसंचार विभागाने अजून याबद्दल निर्देश देणारं कोणतंही पत्रक अजून सादर केलेलं नाही. लिलाव होईल, नेटवर्क कंपनी 5G नेटवर्क स्पेक्ट्रमचा वापर करतील आणि मग त्याचा फायदा ग्राहकांना उपलब्ध करून देतील. मग, 5G फोनला आवश्यक 5G नेटवर्क संपूर्ण भारतात उपलब्ध नसेल, तर त्याचा फोनचा ‘पूर्ण फायदा’ सध्या तरी ग्राहकांना होणार नाही, हे नक्की.

 

 

२. प्रस्थापित कंपनींचा 5G ला असलेला विरोध

जियोने भारतात आपली सेवा अगदी स्वस्त दरात सुरू केल्यापासून एअरटेल, बीएसएनएल, विआय या कंपन्यांना आपले सेवा दर कमी करणं क्रमप्राप्त झालं होतं. यामुळे जियो सोडून इतर सर्व कंपन्यांचं मागील दोन वर्षात आर्थिक गणितं बिघडली आहेत.

 

 

5G नेटवर्क स्पेक्ट्रमची सुरुवात करणं आणि त्यातून फायदा होण्यासाठी पुन्हा दोन वर्षांची वाट बघणं हे कर्जबाजारी झालेल्या बहुतांश कंपन्यांसाठी अवघड जाणार आहे. हेच कारण आहे ज्यामुळे 5G बद्दल या कंपन्यांमध्ये तितका उत्साह दिसत नाही.

===

हे ही वाचा – बाजारात 5G फोन्स आलेत खरे, पण 5G म्हणजे काय आणि खरच ते आवश्यक आहे का?

===

३. किंमत जास्त

स्मार्टफोन तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हे फोन महाग असणार आहेत. ‘स्नॅपड्रॅगन 865’ या चिपसेटची आवश्यकता असणाऱ्या 5G स्मार्टफोनची किंमत जास्त आहे.

‘स्नॅपड्रॅगन 865’ हे चिपसेट असं आहे, की ते असल्यावर 4G नेटवर्कमध्ये तुमचा फोन काम करू शकणार नाही ही सध्याची स्थिती आहे. 4G चा फोन हा 5G नेटवर्कमध्ये काम करण्यासाठी अपडेट केला जाऊ शकतो. पण, 5जी चा फोन ला 5जी नेटवर्क अपेक्षित असतं.

‘स्नॅपड्रॅगन 865’ हेच कारण आहे ज्यामुळे मोबाईल तयार करणाऱ्या सर्व प्रमुख कंपन्यांनी मागच्या वर्षीपेक्षा २० % किंमत वाढवली आहे.

 

 

४. बॅटरी

सतत चार्जिंग पॉईंटच्या शोधात असलेलो आपण 5G फोनमुळे अजूनच त्रस्त होऊ शकतो. कारण 5G फोनला इतर फोनपेक्षा जास्त बॅटरी लागते. 5G फोनमधील बॅटरी ही 4G आणि 5G नेटवर्कचे सिग्नल्स मिळवण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळेच बॅटरी सतत कार्यरत राहते आणि लवकर संपते.

 

 

५. टॉवर उभारणी

अमेरिकेत सर्वात आधी सुरू झालेल्या 5G सेवा या अजूनही सुद्धा तिथल्या सगळ्या शहरांमध्ये उपलब्ध झालेल्या नाहीत. न्यूयॉर्क, वॉशिंग्टन सारख्या प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध असलेली 5G सेवा ही इतर शहरांपर्यंत पोहोचवण्यासाठी टेलीफोन कंपन्यांनी अजून काही काळ मागितला आहे.

अमेरिकेतील 5G फोन वापरणाऱ्या कित्येक ग्राहकांनी त्याच्या स्पीडबद्दल आपली नाराजी इंटरनेटवर व्यक्त केली आहे. ‘हाय बेल्ट’ नेटवर्क म्हणजेच ‘mmWave’ मध्ये अजूनही सातत्य नाही, असं तज्ज्ञांनी मान्य केलं आहे.

 

 

5G फोन विकत घेण्याआधी प्रत्येकाने या मुद्द्यांचा नक्कीच विचार केला पाहिजे. कारण, योग्य नेटवर्क हे आजकाल प्रत्येक फोन सुस्थितीत चालण्यासाठी अत्यावश्यक गोष्ट आहे. ते उपलब्ध नसेल तर स्मार्टफोन हा फक्त एक नवीन ‘हँडसेट’ असेल.

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version