अपघातामुळे आलेले नैराश्य ते ऐतिहासिक सुवर्णवेध, वाचा, जिद्द म्हणजे काय ते समजेल!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
आजचा दिवस तमाम भारतीयांसाठी सुवर्ण सकाळ घेऊन उजाडला आहे. पॅरालिम्पिकमधे भारताच्या अवनी लेखरानं सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. टोकियोत वाजलेल्या जनगणमनच्या सुरांनी इथे भारतीयांचाही ऊर अभिमानाने भरून गेला.
इथून पुढच्या भारतीय क्रीडा इतिहासात अवनी लखेरा हे नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल. टोकियो येथील पॅरालिम्पिकमधे भारताच्या अवनी लखेरानं १० मीटर्स एअर रायफलमधे सुवर्ण पदक जिंकून विक्रमांचा इतिहास निर्माण केला आहे.
अवघ्या १९ वर्षांच्या या मुलीनं केवळ सुवर्ण पदक जिंकलेलं नाही तर ती पॅरालिम्पिकमधे रायफलमध्ये सुवर्ण पटकविणारी ती पहिली भारतीय महिला बनली आहे तसेच २४९.६ पॉईंट्सह तिनं विश्वविक्रमाची बरोबरी केलेली आहे. स्पर्धेत पहिल्या फ़ेरीत दुसर्या स्थानावर असणार्या अवनीनं नॉक आऊट राउंडमधे प्रतिस्पर्ध्यांवर मात करत पदक जिंकलं आहे.
जयपूरवासी असणार्या अवनीनं कायद्याचं शिक्षण घेतलेलं आहे. २०१२ मधे झालेल्या एका दुर्दैवी अपघाताचं कारण होऊन मज्जातंतूचा एक आजार होऊन ती त्याच्याशी गेली काही वर्षं झुंज देत आहे.
२०१२ मधे अवनी वडील प्रवीण यांच्यासोबत धौलपूरला जात असताना गाडीला अपघात झाला आणि अपघातामुळे तिचे पाय निकामी झाले आणि केवळ व्हिलचेअरच्या मदतीनंच ती हालचाल करू शकत असल्याचं निष्पन्न झालं.
अपघातामुळे आलेल्या अपंगत्वानं सुरवातीच्या काळात ती निराश झालेली होती. स्वत:ला खोलीत कोंडून घेत तिनं जगाशी संपर्क तोडला होता. मात्र याच काळात तिच्या वाचनात अभिनव बिंद्राचं आत्मचरित्र आलं आणि तिला एक नविन प्रेरणा लाभली. नैराश्यातून सावरत तिनं शूटिंगचा सराव चालू ठेवला.
अवनीनं क्रिडा क्षेत्रात कामगिरी करावी हे तिच्या वडिलांचं स्वप्न होतं. तिला शुटिंग आणि तिरंदाजी या दोन्हीचं प्रशिक्षण दिलं गेलं मात्र अवनीची रुची शुटिंगमधे असल्यानं तिनं या क्रिडाप्रकाराचा सराव घेण्यास सुरवात केली. २०१५ पासून जयपूरमधील जगतपूरा क्रीडा संकुलात तिचा सराव चालू आहे.
२०१५ मधे तिनं सराव चालू केला आणि काही महिन्यातच राजस्थान स्टेट चॅम्पियनशिपमधे सहभागी होत सुवर्ण पदक जिंकलं. या स्पर्धेसाठी अवनीनं तिच्या प्रशिक्षकांची रायफल वापरली होती. यानंतर काही महिन्यात झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक मिळवलं.
२०१६ ते २०२० दरम्यान अवनीनं नॅशनल चॅम्पियनशिपमधे पाच वेळा सुवर्ण पदक जिंकलं आहे. याच वर्षी अमेरिकेत झलेल्या शुटिंग वर्ल्ड कपमधे तिनं रौप्य पदक पटकावलं होतं.
अभिनव बिंद्रामुळे प्रेरणा घेत अवनीनं सराव सुरूकेला आणि आज देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली या तिच्या यशाबद्दल अभिनवनं तिचं ट्विटरवरून अभिनंदन केलं आहे.
अवनीच्या धैर्याला, जिद्दीला इनमराठीच्या टिमकडून सलाम!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.