Site icon InMarathi

१ सप्टेंबरपासून चेक क्लियर होण्यासाठी लागू होणारे नवे नियम तुम्हाला माहित आहेत का?

cheque inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आज एनइएफटी किंवा आरटीजीएस या ऑनलाईन पेमेंटच्या काळात ही अनेक ठिकाणी चेकने पेमेंट करण्याची पद्धत पाहायला मिळते. अनेक लोकांचा आजही चेक पेमेंटवरच विश्वास आहे. अशाच चेकने पेमेंट करणाऱ्या लोकांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन नियम आणला आहे. जो येत्या १ सप्टेंबर पासून लागू होईल. या नियमच नाव आहे ‘पॉजिटीव्ह पे सिस्टिम’.

 

Internet Banking Online Payment Technology Concept

 

काय आहे नेमकं पॉजिटीव्ह पे सिस्टिम?

या नियमाअंतर्गत चेक जारी करणाऱ्या व्यक्तीने आपल्या बँकेला इलेक्ट्रॉनिक माध्यमातून चेकची तारीख, ज्याच्यानावाने चेक दिलाय त्याचे नाव, रक्कम या सर्वांची परत एकदा माहिती द्यावी लागेल. परंतु यात महत्वाची बाब अशी आहे की यात एक रक्कम ठरवण्यात आली आहे. त्यापेक्षा जास्त रक्कम असेल तरच हे चेक जारी करणाऱ्या व्यक्तीला करावे लागेल.

 

affairscloud.com

 

रिझर्व्ह बँकेने ५०,००० च्या पुढील रकमेसाठी ही सिस्टीम ठरवून दिली आहे. पण एक्सिस बँकेतील खातेधारकांना ५ लाखापेक्षा जास्त रक्कम असल्यास हा नियम लागू होईल. ऍक्सिस बँकेने ही माहिती आपल्या खातेधारकांना दिली आहे.

यातील ५ लाखापेक्षा जास्त रक्कमेचा चेक देणाऱ्या व्यक्तीने पॉजिटीव्ह पे सिस्टिम मधील माहिती न दिल्यास, बँक तो चेक परत पाठवेल.

यात एक नियम असाही आहे की ही माहिती बँकेत देण्यासाठी काही काळ ठरवण्यात आला आहे. म्हणजे चेक दिल्यानंतर लगेच ही माहिती बँकेत देणं महत्वाचं आहे. नाहीतर बँक तो चेक परत पाठवू शकते.

 

livemint.com

हे ही वाचा – तुम्हाला माहित आहे का बँकचे चेक तब्बल ८ प्रकारचे असतात!

चेक पेमेंट संदर्भातील घोटाळे कमी होण्यासाठी व रिझर्व्ह बँकेतील चेक क्लिअरिंगचे काम सोप्पे करण्यासाठी ही सिस्टीम सुरु करण्यात आली आहे. यासाठीच त्याची रक्कम ही ठरवण्यात आली आहे. यातील चेक जारी करणाऱ्याने दिलेली चेक संदर्भातील सर्व माहिती आणि चेकवरील माहिती तपासली जाईल.

ही माहिती बँकेच्या वेबसाईट, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग या मार्फत द्यावी लागेल. यात एखादी व्यक्ती इलेक्ट्रॉनिक बँकिंगचा वापर करत नसेल तर ती व्यक्ती बँकेत जाऊन ही वरील माहिती देऊ शकते.

 

banking finance

 

काही बँकांनी त्यांच्या ग्राहकांना या नवीन सिस्टीम बद्दलची माहिती दिली आहे. खाजगी बँकेतील आईसीसीआय बँकेने त्यांच्या ग्राहकांना ही  सेवा २०१६ पासूनच देण्यात सुरुवात केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने ही सिस्टीम १ जानेवारी २०२१ पासून सुरु केली आहे.

तुम्ही चेक पेमेंटसाठी ५० हजार पेक्षा जास्तची रक्कम पाठवत असाल तर लवकरच आपल्या बँकेकडून ही माहिती जाणून घ्यावी.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version