' अजित डोवालांचं लेटेस्ट टार्गेट – अफगाणिस्तानातील “इस्लामिक स्टेट खुरासान” – InMarathi

अजित डोवालांचं लेटेस्ट टार्गेट – अफगाणिस्तानातील “इस्लामिक स्टेट खुरासान”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

लेखक – तुषार दामगुडे (२०१७ मधील हा लेख पुनःप्रकाशित करत आहोत, आजही तो महत्वाचा आहे आणि समजून घ्यायला हवा.)

अजित डोवाल यांनी मागच्या आठवड्यात अत्यंत तातडीने अफगानिस्तान दौरा केला.

सध्या अफगानिस्तानात तालिबान, नॉर्दन अलायन्स , पाकिस्तान , चिन, रशिया , अमेरिका , इराण, भारत इ. प्रत्यक्ष active आहेत. नुकतीच अमेरिका, तालिबान, अफगान सरकार , चीन, पाकिस्तान यांची मस्कत येथे तडजोडी साठी प्राथमिक बैठक झाली.

भारत या घटना फक्त दुर राहून बघू शकत नाही कारण आर्थिक गुंतवणूक, सामरीक महत्व याव्यतिरीक्त एक मोठे वादळ अफगानिस्तानात घोंगावत आहे.

हे वादळ म्हणजे “इस्लामिक स्टेट खुरासान.” म्हणजेच I. S. K.

इसिस म्हणजे इस्लामिक स्टेट ऑफ सिरीया. त्याची एक शाखा म्हणजे I.S.K. !

 

Islamic-State-Khorasan-province-inmarathi
longwarjournal.org

इथे एक लक्षात घ्या – तालिबान जर साप असेल तर इस्लामिक स्टेट म्हणजे किंग कोब्रा आहे. किंग कोब्रा हा अत्यंत विषारी आणि सर्पभक्षक असतो. त्याच प्रमाणे इस्लामिक स्टेट काफीरांबरोबरच तालिबान, अल कायदाचा सुद्धा शत्रू आहे. देश वगैरे संकल्पना त्यांना अजिबात मान्य नाही. हदीस मध्ये मोहम्मद पैगंबर यांनी जे आदेशवजा सुचना केल्या आहेत त्यावर मार्गक्रमण करुन सर्व पृथ्वीवर खिलाफत राज्य आणणे हेच त्यांचे उद्दिष्ट आहे असा यांचा दावा आहे.

प्रेषित हदिस मधे म्हणतात –

“निवाड्याच्या दिवसाअगोदर “माहदि”चा जन्म होईल (हिंदुंच्या कलि अवतारा प्रमाणे) तुमचा एक गट भारताला (हिंद) ताब्यात घेईल आणि त्यांच्या (भारताच्या) राजाला साखळदंडाने बांधुन आणले जाईपर्यंत अलाह त्यांचि वाट पाहिल.निवाड्याच्या दिवसाआधि प्राचिन “खुरासन”भुमि मध्ये इराण, अफ़गाण, पाकिस्तान (तत्कालीन हिंद) काळाच्या शेवटासाठी प्राथमिक युद्ध होईल. काळ्या झेंड्याच्या निशाणाखाली मुजाहदिन सैन्य ही लढाई जिंकुन माहदी फ़ौजांना सामिल होतील. ते परततील तेव्हा त्यांना सिरियामध्ये इब्न मरयम (येशु ख्रिस्त) भेटेल आणि पॅलेस्टाईनच्या मुक्तिसाठी पाश्चिमात्यांच्या फ़ौजांशी लढतील.

मागे एकदा अजित डोवाल यांनी “मुस्लिम तरुणांमध्ये सलाफी विचारांचा वाढत असलेला प्रभाव चिंताजनक आहे” असे म्हटले होते. (सलाफींवर पुन्हा कधीतरी सविस्तर!)

ajit-doval-marathipizza05

अमेरिकने अफगानिस्तानातुन हळूहळू आपली माघार घ्यायला सुरुवात केल्यावर तिथे जी पोकळी निर्माण होईल ती कोण भरून काढणार हा महत्त्वाचा विषय आहे. I.S.K. त्यासाठी दबा धरून बसली आहे. काश्मीर मध्ये हे काळे झेंडे फडकलेले दिसले तेव्हाच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर खुरासान नावाच्या धार्मिक भुताची कमीत कमी झळ लागू देणे हे भारतीय गुप्तहेर एजन्सी साठी आव्हान असणार आहे.

तुम्ही youtube वर माहदीच्या विषयावरील विडीओ खालील प्रतिक्रिया बघितल्यावर या भविष्यवाणीचे खुळ आणि या काळ्या झेंड्याचे समर्थक कुठे कुठे बसले आहेत ते तुमच्या लक्षात येईल.

 

islamic states worldwide inmarathi

सध्या या विषयावर फार माहिती Public source मध्ये उपलब्ध नाही. जेव्हा जेव्हा माहिती उपलब्ध होत राहिल त्या त्या वेळीअपडेट करत राहूच.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?