' प्राण्यांची हत्या नं करता मांसाहार – भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचा अचाट शोध – InMarathi

प्राण्यांची हत्या नं करता मांसाहार – भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचा अचाट शोध

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

अनेक शाकाहाऱ्यांच्या “मांसाहार नं करण्यामागे” प्रमुख कारण असतं – प्राण्यांची केली जाणारी कत्तल आणि त्यांच्यावर केले जाणारे अत्याचार.

एका भारतीय वंशाच्या अमेरिका स्थित शास्त्रज्ञाने ही अडचण सोडवली आहे – टेस्ट ट्यूब मीट – बनवून ! त्यामुळे काही वर्षातच मांसाहार करण्यासाठी कुठलीही हिंसा करण्याची गरज उरणार नाही.

हा पहा जगातल्या पहिल्या वहिल्या कृत्रिम मांसाचा फोटो :

टेस्ट ट्यूब मधे बनवलेला “मीट बॉल”

 

meat outside animal body marathipizza 00

 

उमा वलेती नावाच्या, विजयवाडा (आंध्रप्रदेश) इथे वाढलेल्या “cardiologist turned entrepreneur and a food producer” नी ही किमया साधली आहे.

त्यांनी Memphis नावाची कंपनी स्थापन केली आहे. त्या मार्फत, ते पुढील ३ वर्षात कृत्रिम मांस निर्मिती मोठ्या प्रमाणावर सुरु करणार आहेत.

उमा वलेती, Memphis च्या co-founder, Nicholas Genovese बरोबर :

 

meat outside animal body marathipizza 01

 

कृत्रिम मांस निर्मिती कशी होते?

प्राण्यांमधील वाढ होण्याची क्षमता असणाऱ्या पेशींना काढून त्यांना ऑक्सिजन, साखर, minerals असे वाढीस आवश्यक ते सर्व घटक पुरवून कृत्रिम मांस बनवलं जातं. ह्या संपूर्ण प्रक्रियेत प्राण्यांना कुठलीही हानी पोहोचवली जात नाही. फक्त गर्भाशयात असलेल्या प्राण्यांच्या रक्तामधून bovine serum काढलं जातं, ज्याचा उपयोग पेशींची कृत्रिम वाढ होण्याची प्रक्रिया सुरु करण्यासाठी होतो.

शोधाचे आणखीही फायदे !

ह्या शोधामुळे केवळ हिंसा टाळली जाणार आहे असं नाही. ह्याचे पर्यावरणावर सुद्धा सकारात्मक परिणाम होणार आहेत.

सामान्य मांस तयार करण्याच्या प्रक्रियेत जेवढे पर्यावरणास घातक वायू – greenhouse gases – तयार होतात त्यापेक्षा ९०% कमी प्रमाणात कृत्रिम मांस तयार करण्याच्या प्रक्रियेमधून होतात.

शिवाय, मांस निर्मितीसाठी प्राण्यांना वाढवण्यात, पोसण्यात २३ कॅलरीज लागतात. ह्या कृत्रिम प्रक्रियेमधे केवळ ३ कॅलरीज लागतात.

ह्या कारणांमुळे सामान्य मांस निर्मितीत पर्यावरणावर पडणारा प्रचंड ताण ह्या कृत्रिम पद्धतीद्वारे कमी होणार आहे.

 

ही सर्व माहिती ऐका, स्वतः उमा वलेतींकडून :

 

 

लवकरच पृथ्वीवरील खाद्य संस्कृती बदलणार आहे !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?