Site icon InMarathi

विराटची आवडती ऑडी आज चक्क ‘पोलिसांच्या ताब्यात’ धूळ खात पडली आहे, कारण…

virat audi inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

कोणतंही वाहन हे वापरात असेपर्यंतच चांगलं असतं. तुमची गाडी जर पंधरा दिवसांपेक्षा जास्त बंद राहिली तर ती पुन्हा सुरू होण्यास नक्कीच त्रास देणार. ‘चालवत राहणे’ हेच प्रत्येक वाहनाला उत्तम ठेवण्याचा उपाय सगळे ऑटो एक्स्पर्ट सांगत असतात.

अशीच एक कार मुंबईच्या पोलीस स्टेशन समोर कित्येक वर्षांपासून बंद पडून आहे. तुम्हाला वाटेल, “त्यात काय एवढं?” अशा कित्येक गाड्या पोलीस स्टेशनमध्ये बंद पडून असतात. पण ही गाडी स्पेशल आहे. कारण, ही गाडी कोणतीही साधी कार नसून ‘ऑडी आर ८’ आहे आणि ही कार ‘विराट कोहली’ची आहे. मग काय? चर्चा तर होणारच.

 

 

आपल्या भारतीय क्रिकेट संघाचा हँडसम कर्णधार हा असे काही उद्योग करणार नाही, ज्यामुळे कार पोलीस स्टेशनला लावली असावी हा सर्वांना विश्वास आहे. पण, मग असं काय झालं? की ही कार अशी वर्षानुवर्षे धूळ खात पडली असेल. काय मॅटर आहे? जाणून घेऊयात.

विराट कोहलीचं विविध कारबद्दल असलेलं प्रेम हे नेहमीच त्याच्या ऑफिशियल अकाउंटवरून झळकत असतं. आपल्या घरात नेहमीच उच्च दर्जाच्या कार असाव्यात म्हणून आपला कर्णधार नेहमीच प्रयत्नशील असतो.

३२ वर्षीय विराट कोहली हा ‘ऑडी इंडिया’चा भारताचा ‘ब्रँड अँबेसेडर’ सुद्धा आहे. भारतात लाँच होणाऱ्या प्रत्येक नवीन ऑडी कार स्वतः चालवून बघणे आणि त्याचा फोटो टाकणे हा विराट कोहलीचा छंद आहे. आम्ही सांगत आहोत त्या गाडीचा सुद्धा एक फोटो अपलोड केलेला आहे.

 

 

मग गाडीचं काय झालं?

अनुष्का सोबत भांडण झालं आणि त्याचा राग कारवर निघाला असा विचार करत असाल तर तसंही काहीच झालं नाहीये.

 

 

२०१२ मध्ये विराट कोहलीने ही ऑडी कार विकत घेतली होती. २०१६ मध्ये एका नवीन कारला जागा व्हावी म्हणून, विराट कोहलीने आपली ‘ऑडी आर ८’ ही कार सागर ठक्कर नावाच्या एका ब्रोकरला विकली होती. सागरने ही कार आपल्या गर्लफ्रेंडला भेट म्हणून देण्यासाठी विकत घेतली होती. पण, कार विकत घेतली आणि सागर ठक्कर हा काही दिवसांतच एका आर्थिक घोटाळ्यात अडकला.

काही कर्जाचे हफ्ते न चुकवता आल्याने पोलिसांना सागरची सर्व मालमत्ता आणि ही कार जप्त करावी लागली होती. ‘कॉल सेंटर’चा संदर्भ असलेल्या या घोटाळ्यात सागर ठक्करला काही दिवसात अटक करण्यात आली होती.

विराट कोहलीकडून अडीच कोटी इतकी किंमत देऊन विकत घेतलेली कार सागर ठक्करला अडीच महिन्यातच पोलिसांना देऊन टाकावी लागली होती.

 

===

हे ही वाचा – पगडीवरून चिडवण्याचा बदला – त्याने घेतल्या पगडीला मॅचींग १५ रोल्स-रॉयस!

===

ही बातमी समोर कशी आली?

या कारचे फोटो मध्यंतरी अचानक व्हायरल झाले. ही ‘ऑडी आर ८ व्ही १०’ ही विराट कोहलीची जुनी कार आहे. सध्या ही ठाणे येथील एका पोलीस स्टेशनमध्ये अश्या अवस्थेत ५ वर्षांपासून पडून आहे. मुंबईच्या पावसात ही कार पाण्याखाली गेली होती. अशा आशयाची कॅप्शन्स या फोटोजमध्ये पाहायला मिळत होती.

एका बाजूने तर ही कार जमिनीला टेकायला आली आहे. इतक्या महागाच्या ऑडी कारला अशा अवस्थेत बघणं हे कार प्रेमींसाठी खूप त्रासदायक आहे. कितीही दुरुस्ती केली तरीही ही कार पूर्ववत होईल की नाही ही आता शंकाच आहे.

विराट कोहलीच्या ‘स्पोर्ट्स कार कलेक्शन’मधील ही त्याची सर्वात पहिली कार होती. दिल्लीत झालेल्या कित्येक आयपीएल सामन्यांना ही कार विराट कोहली स्वतः चालवून आणायचा. वेस्ट इंडिजचा लोकप्रिय खेळाडू क्रिस गेलला या कारमध्ये विराटने लिफ्ट सुद्धा दिली होती.

 

 

ऑडी कारसोबत असलेल्या करारामुळे विराट कोहलीकडे ऑडी आर ८ एलएमएक्स ही मर्यादित कालावधीसाठी तयार करण्यात आलेली कारसुद्धा आहे. याव्यतिरिक्त ऑडीच्या Q7, RS5, A8, S5 सारख्या महागड्या कार सुद्धा विराट कोहलीच्या घरातील गॅरेजमध्ये दिमाखात उभ्या आहेत.

ऑडी शिवाय ‘बेंटली स्पोर्ट्स’ या कंपनीच्या सुद्धा दोन कार विराटकडे आहेत. त्यापैकी एक दिल्लीला आहे आणि एक मुंबईला आहे.

 

 

विराट कोहलीने सदर कार विकतांना सर्व कागदपत्रांची व्यक्तिगतरित्या चौकशी केल्याने त्याची या कारच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची चौकशी झाली नव्हती. आपणही आपलं कोणतंही वाहन विकतांना योग्य त्या कागदपत्रांची काळजीपूर्वक देवाणघेवाण करावी हे आपण या प्रकरणातून शिकायला पाहिजे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version