Site icon InMarathi

अविश्वसनीय पण खरं, टोकियो ऑलिंपिक मधील सर्व मेडल्स तयार झाली ई-कचऱ्यातून…

olympics medals e waste inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

नष्ट न होणारा कचरा ही आधुनिक मानवाची मोठी समस्या आहे. यावर उपाय म्हणून या कचर्‍याला पर्यावरणपूरक बनविण्यात येण्याची अनिवार्य धडपड, कचर्‍यावर प्रक्रिया करून त्यापासून पुन्हा काही निर्मिती करणं ही काळाची गरज बनली असून आधुनिक जगातील डिझायनर्स यावर सातत्यानं काम करत असतात.

 

 

ई कचरा ही समस्या अशीच आ वासून उभी असताना, चक्क एका डिझायनरनं यापासून पदक बनविण्याची कल्पना मांडली आणि ती सत्यात उतरत यंदाच्या जपान ऑलम्पिकमधे चक्क विजेत्यांच्या गळ्यातही रूबाबात मिरवली जात आहेत.

 

indiatoday.in

 

एकविसाव्या शतकात मानवानं आयुष्याला प्रचंड गती देणारे अनेक शोध लावले यापैकी काही शोध हे विविध इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत. जोवर वापरात असतात तोवर ही गॅजेट्स वरदान ठरत असली, तरीही ती खराब झाल्यावर मात्र त्यांची विल्हेवाट लावणं कठीण होऊन बसलं आहे.

ई कचर्‍याची समस्या ही आधुनिक जगातील सर्वात मोठी समस्या आहे. पर्यावरणाला हानिकारक आणि विघटन न होणारा हा कचरा दिवसेंदिवस राक्षसी प्रमाणात वाढत चालला आहे.

अलिकडेच पुन्हा एकदा हा विषय नव्यानं चर्चेला येण्याचं कारण म्हणजे, यावर्षीच्या ऑलम्पिकमध्ये विजेत्यांची पदकं.

५ हजार विजेत्यांच्या गळ्यात शोभतील अशी आणि जगालाही काही संदेश देऊ शकतील अशी पदकं बनविण्याचा आयोजन समितीचा विचार होता. यासाठी मग आयोजन समितीनं (TOCOG) एक पर्याय निवडला आणि तो म्हणजे जगासमोर समस्या म्हणून उभा असणारा ई कचर्‍याच्या रिसायकलिंगचा!

 

===

हे ही वाचा – पॅरालिम्पिकचा अज्ञात इतिहास आणि यंदाच्या सहभागी भारतीय खेळाडूंबद्दल जाणून घ्या!

===

ई कचर्‍यापासून विजेत्यांची पदकं बनवावीत हा विचारच सध्याच्या जागतिक पर्यावरण संवर्धन विषयासाठी महत्वाचा होता आणि ही संकल्पना राबवून मेडल कसं बनवता येईल यासाठी जपानमधे डिझायनर्सची स्पर्धा आयोजित केली.

व्यावसायिक डिझायनर्स आणि डिझाईनिंगच्या विद्यार्थ्यांसाठी असणार्‍या या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि पदकांच्या हजारो कल्पना, लाखो डिझाईन्स समितीकडे आली. एकाहून एक सरस संकल्पना असल्यानं कोणत्या संकल्पनेवर काम करावं हे निवडणं कठीण काम होतं. समितीलाही कळत नव्हतं.

जपान साईन डिझाईन असोसिएशनचे संचालक आणि ओसाका डिझाईनचे संचालक जुनिची कवानिशी यांनी ही अभिनव संकल्पना मांडली. ही निवड चारशे जणांच्या निवडसमितीच्या विशेष पॅनलनं एकमतानं संमती देत करण्यात आली.

जुनिची यांच्या डिझईनमध्ये खेळाडूचा प्रारंभिक ते चॅम्पियनपर्यंतचा प्रवास यांचं सिम्बॉल असणारं होतं. त्यांच्या या डिझाईनला मेडलमधे रूपांतरीत करण्यासाठी तब्बल ७९ हजार टन इलेक्ट्रॉनिक कचरा वापरण्यात आला. यात मोबाइल, लॅपटॉप, डिजिटल कॅमेरे अशा गॅजेटसचा समावेश आहे.

 

 

संपूर्ण जपानभर हा कचरा गोळा करण्याची एक विषेष मोहिम राबविण्यात आली होती. दोन वर्षं सातत्यानं हा कचरा जमा करण्यात येत होता.

यासाठी ७८ हजार ९८५ टन टाकून दिलेली उपकरणं गोळा करण्यात आली. या सर्व कचर्‍याचं वर्गीकरण, विघटन आणि वितळवणं उच्च प्रशिक्षित तंत्रज्ञांच्या देखरेखीखाली करण्यात आलं.

इंटरनॅशनल ऑलम्पिक कमिटीद्वारे निवड होणार्‍या या डिझाईनमधे काही गोष्टींचा अंतर्भाव बंधनकारक असतो. जसं की, ऑलम्पिकच्या कमेकांत अडकलेल्या पाच रिंग्ज, NIKE, विजेती ग्रीक देवता तसेच त्य त्या वर्षीच्या खेळाचं अधिकृत संबोधन – यंदाचं संबोधन होतं, THE GAMES OF THE XXXII 2020

ही ५ हजर पदकं बनविण्यासाठी याप्रमाणे अंदाजे धातू वापरण्यात आला- सुवर्ण- ३२ किलो, रौप्य- ३ हजार ५०० किलो आणि कांस्य- २ हजार २०० किलो. या पदकांना तोलणारी रिबिनही जपानच्या विविधतेत एकात्मता या लाकडी मेडल केसही देण्यात आली.

पुरस्कारप्रदान सोहळा ज्याठिकाणी साजरा झाला ते पोडियमही अशाच रिसायकल केलेल्या ४५ टन घरगुती प्लॅस्टिक कचर्‍यापासून बनविण्यात आले होते. एकूणच या ऑलम्पिकच्या निमित्तानं जपाननं टाकाऊमधून उत्तम निर्मिती करत जगापुढे एक आदर्श घालून दिला आहे.

 

 

सर्व प्रकारची विजेती पदकं पूर्नवापर करता येणार्‍या कचर्‍यातून करण्याची ही पहिलीच वेळ असली तरीही ही संकल्पना नवीन नाही. यापूर्वीच्या २०१६ च्या रियो ऑलंपिकमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदकं बनविण्यासाठी ज्या स्टर्लिंग सिल्व्हरचा वापर केला जातो त्यापैकी ३० टक्के चांदीची निर्मिती कारच्या बॉडीसाठी वापरला जाणारा धतू आणि आरसे या कचर्‍यापासून करण्यात आली होती.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version