' या मंदिरात श्रीकृष्णाबरोबर राधा नव्हे तर चक्क मीराची पूजा केली जाते!! वाचा – InMarathi

या मंदिरात श्रीकृष्णाबरोबर राधा नव्हे तर चक्क मीराची पूजा केली जाते!! वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

भगवान श्री कृष्ण हे आपल्या पराक्रमांसहित आपल्या भक्तवत्सलतेसाठी सुद्धा ओळखले जातात. सगळ्यात प्रेमळ देव म्हणून लोक कृष्णाला अगदी आपला सखा सुद्धा मानतात. अर्जुनाने कृष्णाला बंधू, गुरु आणि सखा म्हणून पाहिलं, रुक्मिणीने पती म्हणून, राधेने प्रेमी म्हणून आणि मीरा? मीरेने त्यांना आपलं सर्वस्वच बनवलं.

कृष्णासाठी आपलं घरदार, पती, मोठा राजवाडा, तिथला अराम सगळं सोडून मीरा हातात एकतारी घेऊन कृष्ण भजनात विलीन असायची. कदाचित भक्तश्रेष्ठ म्हणून सुद्धा, कृष्णाच्या भक्तांच्या यादीत अव्वल क्रमांक हा मीराचाच असेल.

 

krishna morpis inmarathi

 

कसलीही परवा न करता मीरा कृष्णस्तुती करत गावो गावी भटकायची. तिच्या प्रेमात हाकेने देव सुद्धा तिला भेटायला आवर्जून यायचे. तशीच राधाही होती. कृष्णाच्या सहवासाला जरी एका काळानंतर ती मुकली असली तरी कृष्णाची सावली म्हणून त्याच्या सोबत सतत असायची. याचाच परिणाम म्हणजे कृष्णाचं नाव घेतलं, की ते नुसतंच नाही तर राधेकृष्ण असं आपण घेतो.

प्रत्येक मंदिरात सुद्धा कृष्णासोबत रुक्मिणीला नाही तर राधेला पुजलं जातं. पण तुम्हाला ठाऊक आहे का, भारतात एकमात्र असं ठिकाण आहे जिथे कृष्णासोबत राधा किंवा रुक्मिणी नसून मीरा आहे? तिची तिथे कृष्णासोबत पूजा केली जाते? नव्हतं माहिती ना₹ हरकत नाही. आज आपण याच एकमेव आणि निराळ्या मंदिराबाबत जाणून घेणार आहोत.

 

meera inmarathi
vedifeed

राजस्थानच्या आमेर जिल्ह्यातील “जगत शिरोमणि” हे एकमेव असे मंदिर आहे जिथे श्री कृष्णाबरोबर मीरा बाईची पूजा केली जाते. त्याच्या या  निराळेपणामुळे जगातील हे एकमेव मंदिर आज मोठं पर्यटन स्थळ आहे. देश-विदेशातून पर्यटक या मंदिरात भक्त आणि देव यांचं नातं जाणून घेण्यासाठी, त्यांची कहाणी जाणून घेण्यासाठी येत असतात.

या मंदिराचं निर्माण महाराजा मानसिंह यांच्या प्रथम पत्नीने, म्हणजेच महाराणी कनकवती ने करून घेतलं होतं. आपले पुत्र जगतसिंह यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृतीत हे मंदिर बनवण्यात आलं होतं. या मंदिराच्या निर्मितीला सन १५९९ ई. मध्ये सुरुवात करण्यात आली होती.

 

meera 2 inmarathi

 

मंदिर पूर्णपणे तयार होऊन सन १६०८ ई. मध्ये त्याच लोकार्पण करण्यात आलं होतं. आपल्या पुत्राला, म्हणजे जगतसिंह यांना जगाने अनादी अनंत काळापर्यंत आपल्या स्मरणात ठेवावं म्हणून महाराणी कनकवती यांनी हे मंदिर मोठ्या प्रेमाने बनवून घेतलं होतं.

या मंदिराचं वैशिष्ट्य तिच्या मूर्तीत दडलेलं आहे. या मंदिरात, खुद्द मीरा बाई ज्या कृष्णाच्या मूर्तीची पूजा करत, तिच मूर्ती स्थापित केलेली आहे. तिचीच नित्य नियमाने आजही पूजा केली जाते.

या मंदिराशी निगडित राजस्थानात अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक अशी आहे की मुघल सैनिकांना ह्या मंदिरातील मूर्ती खंडित करायची होती, पण राजपुतांनी मोठ्या शूरतेने ह्या मंदिराचं रक्षण केलं. ही केवळ एक आख्यायिका नसून सत्य घटना आहे असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे.

दरवर्षी कृष्ण जन्माष्टमीला ह्या मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. मोठी जत्रा भरते. आणि दुरून दुरून अनेक भाविक आणि पर्यटक या मंदिरातील भक्तांचा उत्साह, तिथलं प्रसन्न वातावरण व तिथल्या उत्सवाच्या अविस्मरणीय क्षणांचा साठा करून घेण्याचा इच्छेने तिथे हजेरी लावतातच.

 

meera inmarathi 2
patrika

हे ही वाचा – खुद्द ब्रह्मदेव जेव्हा साक्षात भगवान श्रीकृष्णाची परीक्षा घेतात…!

कोण होती मीरा?

मीराबाई हे एक संपूर्णपणे अजब रसायन होतं असं म्हणायला हरकत नाही. एक राजपुती राजकन्या असल्याने मिराबाईचा, राजा भोज नामक राजपूत शासकाशी विवाह करण्यात आला. राजा भोज हे मेवाडचे राजपुत्र होते. पण मीराबाईचं श्री कृष्णावर इतकं प्रेम होतं, की मिराबाईने त्यांना आपलं पतीच मानून घेतलं. आणि त्यांच्या ह्या कृष्ण प्रेमामुळे, ते कोणीच समजून न घेतल्याने त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण अशा कठोर संकटातून सुद्धा मीराबाई कृष्णाला कधीच विसरली नाही, किंवा तिने कृष्णावर कधीच संशय घेतला नाही.

त्याच्यावर निस्सीम श्रद्धा ठेवली व सगळी संकटं पार करत गेली. पण असं म्हणतात ना, देव सुद्धा आपल्या मनुष्य जन्मातील भोगांना टाळू शकत नाही.

 

meera inmarathi 1
Templepurohit

 

१५२१ साली एका युद्धात राजा भोज हे वीरगतीस प्राप्त झाले. आणि या  नंतर मीरा बाई विधवेचं जीवन जगू लागल्या. त्या आपला पूर्ण वेळ श्रीकृष्णाच्या भक्तीत देऊ लागल्या. गावोगाव भटकून श्रीकृष्णाची स्तुती करू लागल्या. त्यांना परत आणण्यासाठी म्हणून त्यांच्या कुटुंबाने काही लोक तिथे पाठवले. पण मिराबाईंनी त्यांच्यासोबत आपल्या राजवाड्यात परतण्याला नकार दिला.

यावर ती माणसं, “तुम्ही येणार नाही तोवर आम्ही उपोषण करू” असं म्हणाली. मीराबाईंचा निर्धारतर पक्का होता. त्यामुळे, त्यांनी आपले आराध्य श्री कृष्णाशी विचार विनिमय करायला वेळ मागितला व त्या मंदिरात शिरल्या. तिथून त्या कुठे लुप्त झाल्या हे कोणालाच ठाऊक नाही. असं म्हणतात, की भगवान श्रीकृष्णांनी त्यांना स्वतःमध्ये सामावून घेतलं आणि मुक्ती प्रदान केली.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?